जालना : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मैदानात उतरले आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंबलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांत त्यांनी पाण्याचा थेंब देखील घेतला नसल्याने आणि उपचार घेण्यास नकार दिल्याने कालपासून त्यांची तब्येत देखील खालावली आहे. अमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे यांच्या आरोग्य तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना जरांगेंनी उपचार न घेता माघारी पाठवले. कोणत्याही प्रकारचा उपचार घेणार नसल्याच्या निर्णयावर ते उपोषणाच्या…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मुसळी फाटा जवळील पुलावर जळगावकडून येणारा ट्रक क्रमांक एम. एच.४० वाय १३०८ व एरंडोलकडून येणारा कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याची घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना नागरिकांनी कॅबिनचा पत्रा तोडून बाहेर काढण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल कडून येतांना डाव्याबाजूला रस्त्याचे काम सुरु होते त्यामुळे उजव्या बाजूने येणारे व जाणारे दोन्ही कडचे वाहने जात असतांना दोन्ही गाड्या एकमेकांवर धडकल्यामुळे हा अपघात झाला होता. दरम्यान अपघात झाल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत दोन्ही वाहनांच्या चालकांना बाहे काढून रुग्णवाहिकेला पाचारण करून उपचारासाठी जळगाव येथे हलविले असून पाळधी…
पाचोरा : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध वाळू वाहतूकीचे वाहन सुरु असल्याची माहिती महसूल व पोलीस विभागाला मिळताच कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच पाचोरानजीक वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी जप्त केला. दरम्यान घटनेनंतर मालक फरार झाला असून पोलिसांनी डंपरचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोऱ्यात अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू असून, दररोज शंभरहून अधिक वाहने गिरणा नदीपात्रातील वाळू उपसा करीत आहेत. तहसीलदार नसल्याने पाचोरा महसूल विभाग वाऱ्यावर आहे. कारवाई होत नाही. उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी दि. ९ रोजी मध्यरात्री १:३०च्या सुमारास गस्तीवरील पोलिसांना इंपरविषयी माहिती दिली. त्यावेळी (एमएच ४६ बीएफ ५०२१)…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिलगाव येथील शिवारात सुरू असलेल्या हातभट्टीवर पहूर पोलिसांनी छापा टाकत कच्चे रसायन नष्ट केले. या प्रकरणी गावठी दारूची विक्री करणाऱ्याविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिलगाव येथे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील, गणेश सुस्ते, गोपाळ माळी, शशिकांत पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी या दारुअड्ड्यावर छापा टाकत २ हजार ४०० लीटर कच्चे २४ इम गावठीचे रसायन नष्ट करून हुसेन तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी येथील बंडू सुपडू तडवी याच्याविरुद्ध या प्रकरणात २० गुन्हे दाखल होते. अखेर त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करून अमरावती सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अनेक छोट्या मोठ्या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरु असतांना दि.९ रोजी शहरातील रिंग रोड परिसरातील एका बँकेसमोर रस्ता ओलांडणाऱ्या संगीता महेश लढे (वय ५४) या महिलेला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी शनिवार, १० फेब्रुवारी रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रिंग रोड परिसरातील रहिवासी संगीता लढे (वय ५४) या शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी रात्री रिंग रोडवर रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी एका खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या कंपनीच्या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार…
एरंडोल : प्रतिनिधी कासोदा येथील स्व. सौ.शोभाताई अशोकराव पाटील प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक प्रवीण ज्ञानेश्वर मराठे सर यांना नुकताच राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग यांच्यामार्फत महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रवीण मराठे सर यांना हा पुरस्कार माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, जि.प.अध्यक्ष नामदार धरती ताई देवरे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सत्यजित तांबे, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव महाराष्ट्र ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य व जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक हा पुरस्कार राजश्री शाहू महाराज नाट्यगृह धुळे या ठिकाणी प्रदान करून सन्मानित…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील जामनेर येतील एका ३१ वर्षीय इसमाची टास्क पूर्ण करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या गौरव गौतम बर्मन (२४, रा. राजरहाट, गोपालपपरा, कोलकाता) याला जळगाव सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोलकाता येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन कन्हैया फिरके (३१, रा. जामनेर) यांची आठ लाख ७५ हजार १७५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला. गौरव गौतम बर्मन याने हा गुन्हा केल्याचे समोर आले होते. त्यानुसार जळगाव…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी संगणकशास्त्र विभागातर्फे राज्यस्तरीय iNOVA 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये पोस्टर प्रेझेन्टेशन व ब्लाइंड कोडींग (C Language) या स्पर्धा पदवी व पदव्युत्तर गटातून घेण्यात आल्या. राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. पंकज अत्तरदे (CEO, Heuristic Technopark, Pune) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना “लेटेस्ट टेक्नॉलॉजी इन आयटी इंडस्ट्रीज” या विषयावर मार्गदर्शन केले. सदर सेमिनार मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सध्या वापरात असलेल्या क्लाऊड कॉम्प्युटिंग, क्वाँटम कॉम्प्युटिंग, डाटा सायन्स, इंडस्ट्री रेव्होल्युशन 1.0 ते 4.0 याबाबत सखोल…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार अज्ञात वाहनांला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे कारमधील एअरबँग उघडून फाटल्या, पण कुणाचाही जीव वाचला नाही. राहुल आनंद निकम (वय ४७), शिवाजी वामनराव थोरात (वय ५८) आणि अण्णा रामराव मालोदे (वय ७१) अशी मृतांची नावं आहेत. मृत व्यक्ती छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकच्या दिशेने जात होते. शनिवारी (१० फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची कार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरात चौघांकडे गावठी कट्टा आढळून आल्याप्रकरणी, तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणात चौघांना सुनावण्यात आलेल्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन रमेश सुशीर (१९, रा. पिंप्राळा हुडको), लखन दिलीप मराठे (३०, रा. शिवाजीनगर हुडको), सोनू उर्फ ललित गणेश चौधरी (२९, रा. ईश्वर कॉलनी), अतुल क्रिष्णा शिंदे (२५, रा. रामेश्वर कॉलनी) यांचा समावेश आहे.स्वातंत्र्य चौक परिसरात गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी चार जण वाद घालत असताना पोलिस त्या ठिकाणी पोहचले होते. त्या वेळी पोलिसांना चौघांनी धक्काबुक्की करत धमकी दिली होती. त्या वेळी त्यांच्याकडे गावठी कट्टा आढळून आला होता.

