Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी समाजातील शेवटच्या घटकालाही समान आणि मानाची वागणूक देणं, म्हणजे रामराज्य अशी संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली होती. या संकल्पनेला जागत माझ्या आमदारकीच्या पहिल्या वर्षात मी त्या पद्धतीने काम करत लोकांना उत्तरदायी राहण्याचा प्रयत्न केला, अशी भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. चार दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आलेल्या आ. तांबे यांनी बुधवारी पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी आमदारकीच्या पहिल्या वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडणारी ‘आरंभ’ या पुस्तिकेचे अनावरण केले. सरसकट सर्व मुलींना मोफत शिक्षण द्या! सध्या राज्यात आठ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं. अनुसूचित जाती व जमाती आणि…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी (प्रा. जितेश चव्हाण) नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (National Assessment and Accreditation Council) नुकतीच दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी येथे भेट देऊन मूल्यांकन केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 13 व 14 फेब्रुवारी रोजी नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय अमळनेर येथे राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने (National Assessment and Accreditation Council) समितीचे अध्यक्ष डॉ. अंबिका दत्त शर्मा प्रोफेसर डॉ. हरसिंग गौर विश्वविद्यालय सागर (म.प्र.) समन्वयक डॉ. सुधीर कुमार जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली, सदस्य प्राचार्य डॉ. सर्वनन थर्मलिनग्राम भारतीय कॉलेज ऑफ एज्युकेशन विलुपुरम तामिळनाडू आदी मान्यवरांचे महाविद्यालयाचे प्राचार्य व…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महामार्ग ओलांडणाऱ्या महिलेसह पुरुषास धडक दिली. या अपघातात महिला जागीच ठार झाली, व पुरुष गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. साकेगाव बस स्टॅण्डच्या पुढे समांतर रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. या महिलेसह इसमाची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, साकेगावातील थांबवली, अन्यथा अपघातग्रस्त महिलेसह प्रौढाला वाहनांनी चिरडले असते. या अपघातामुळे एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, वाल्मीक सोनवणे, विठ्ठल फुसे, विनोद पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी व शहर वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभेची निवडणूक लढवावी. कारण, मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात काहीही अर्थ नाही. जरांगेंनी लोकसभा लढवली तर त्यांना गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येतील, असे ते म्हणालेत. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे आवाहन केले. आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे. त्यांनी आपला लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी महिलेच्या बंद घरातून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि रोकड मिळून 25 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शहरातील चिंतामण मोरया नगर भागात घडली असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चिंतामण मोरया नगर परिसरातील रहिवासी भाग्यश्री गोकुळ नन्नवरे (वय 32) यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि 10 हजार रुपयांची रोकड असा एकूण 25 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीला आला. घरफोडीचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने धरणगाव पोलिसात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील तीन नेत्यांची भारतीय जनता पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारीसाठी वर्णी लागलीय. यात मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण,अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या नव्या यादीत गुजरातमधील चार उमेदवारांना संधी देण्यात आलीय. तर महाराष्ट्रातील तीन नेत्यांना उमेदवारी देण्यात आलीय. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे मोदी सरकारमध्ये मंत्री पदावर असलेल्या नारायण राणेंना मात्र डावलण्यात आले आहे. जेपी नड्डांसह गोविंद भाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि डॉ. जशवंतसिंह सलाम सिंह परमार हे गुजरातमधून उमेदवारी देण्यात आलीय. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरचा दिवस १५ फेब्रुवारी आहे. तर अर्जांची पडताळणी १६ फेब्रुवारी रोजी पार पडेल. तसेच उमेदवारांना २० फेब्रुवारीपर्यंत आपला उमेदवारांना अर्ज…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील सरकारच्या विरोधात लढा देत आहे. त्यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे यांनी अन्न तसेच पाण्याचा त्याग केला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असून नाकातून रक्तस्त्राव होत असून त्यांना बोलताही येत नाहीये. दरम्यान, डॉक्टरांचं एक पथक तातडीने अंतरवाली सराटी येथे…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था भरधाव कार आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात कारमधील नवविवाहितेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर 1 महामार्गावर भिगवणनजीक स्वामी चिंचोली (ता. दौंड) गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी आहेत. राधिका अजय मस्के (२२), राजू बाबूराव मस्के (५२, रा. अबिकानगर, चिंचवड, पुणे), बाबासाहेब दत्तात्रय धेंडे (४८, रा. ज्योतिबावाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चालक अजय राजू मस्के व त्यांची बहीण काजल राजू मस्के हे गंभीर जखमी झाले आहेत. मस्के कुटुंबीय हे पुण्याहून उस्मानाबाद येथे कामानिमित्त निघाले असता, हा अपघात झाला. यामध्ये नवविवाहिता राधिका मस्के हिचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील एका परिसरातील फार्म हाऊसमधून ब्रेकर, कटर मशीन व इतर साहित्य चोरून नेणाऱ्या आबा प्रकाश भिल (२४, रा. बुधली धरण, शिरसोली) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली गावाजवळील बुधली धरण परिसरात असलेल्या विजयकुमार कोसोदे यांच्या फार्म हाऊसमधून ९ फेब्रुवारीला दोन हजार रुपये किमतीचे ब्रेकर मशीन, तीन हजार रुपये किमतीचे कटर मशीन, १२०० रुपये किमतीची हँडकटर मशीन, १२०० रुपये किमतीचे वायरचे दोन बॉक्स चोरून नेले होते. अज्ञाताविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आबा प्रकाश भिल (२४, रा. बुधली धरण,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील खंडेरावनगर परिसरात १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत दरवाजाला लाथा मारत असलेल्यांना जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांनी दाम्पत्यासह एकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खंडेरावनगरात योगेश हरीलाल सोनार हे वास्तव्यास असून, १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरात राहणारा एक जण दारूच्या नशेत त्यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारत होता. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास लाथा मारणारा आणखी दोन अनोखळी इसमांसह सोनार यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More