बोदवड : प्रतिनिधी शहरातील एका मंगल कार्यालयाकडे पायी जाणाऱ्या वृद्ध दाम्पत्याकडून ९ हजार रुपये लांबवल्याची घटना दि.१२ रोजी घडली. या चोरट्याने वृद्धाला मामा म्हणत कार्यालयात सोडून देण्याचा बहाणा केला आणि रस्त्यात गाडी थांबवून त्यांच्याकडील रोकड हिसकावून नेली. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील हे वयोवृद्ध जोडपे मंगल कार्यालयाकडे जात होते. त्यात रस्त्यात त्यांना ३५ वर्षांच्या तरुणाने थांबवले आणि मामा, मी तुमचा भाचा आहे, अशी बतावणी केली आणि मंगल कार्यालयात सोडून देण्याचा बहाणा करून दुचाकीवर बसवले. काही अंतरावर एका निर्जन बोळीत थांबवून त्यांच्याकडील रोख रक्कम घेऊन पोबारा केला. दोघेही हताशपणे बसलेले पाहून एका व्यक्तीने चौकशी केली आणि त्यांना मंगल कार्यालयात पोहचवले. लग्नाच्या दिवशी…
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जळगाव रोडवरील अयोध्यानगर भागात भरदिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी २ लाख ५९ हजारांचा ऐवज लांबविला. हा प्रकार दि. ११ फेब्रुवारी रोजी घडला. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील अयोध्या नगरातील रहिवासी उमेश बाळू चिमणकर हे परिवारासह बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरातून १ लाख दोन हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ७५ हजार रुपये किमतीची मंगल पोत, साडेचार ग्रॅम सोन्याची कर्णफुले, दोन अंगठ्या, लॅपटॉप आणि २० हजार रुपये रोख असा दोन लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. घरफोडीची माहिती कळताच, पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे,…
जळगाव : प्रतिनिधी गृहमंत्री अमित शहा यांचा दि.15 रोजीचा युवा संवाद दौरा रद्द झाला असून पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल अशी माहिती सूत्रांची दिली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याचे नियोजन सुरु होते. मात्र त्यात बदल होत असून दि. १५ तारखेचा दौरा पुढे ढकलण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. या दौऱ्यानिमित्त ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकांचे सत्र सुरु केले होते. सोमवारी त्यांनी सागरपार्क येथील सभास्थळाची पाहणी देखील केली होती.
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांचा त्यांच्या कार्यालयात बसलेले असतांना कारमध्ये येवून गोळीबार करून खून करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, संजय बैसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उद्देश उर्फ गुड्डू शिंदे, सॅम चव्हाण, सचिन गायकवाड,अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख, भूपेश सोनवणे, सुमित भोसले, संतोष निकुंभ उर्फ संता पेहलवान या आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सात आरोपी पैकी अनिस शेख उर्फ नवा शरीफ शेख व सचिन गायकवाड या दोन आरोपींना चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा गेल्या काही वर्षापासून होती, मात्र आज हा पक्ष प्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थिती मोठ्या उत्साहात झाला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय, आपला वैयक्तिक निर्णय असून काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर टीका किंवा आरोप करण्याचं त्यांनी टाळलं आहे. काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यासाठी खूप विचार केला. काही गोष्टी चांगल्या होत आहेत तर त्यात आपला पण वाटा हवा ही भावना आहे. काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिलं तसच मी पण पक्षासाठी खुप काही योगदान दिलं आहे. अचानक माझ्यावर काही आरोप करत असेल तर ते बरोबर…
मुंबई : वृत्तसंस्था अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अशोक चव्हाण यांनी पत्र लिहिलं आहे. पत्राच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आज अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्व ज्यांनी विधानसभा आणि लोकसभा गाजवली, दोन वेळा ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले असे अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केले आहे. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे महायुतीची शक्ती वाढली आहे. यात कुणाला…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारीच्या घटनेसोबत लुबाडण्याच्या देखील अनेक घटना घडत असतांना पुणे शहरात सध्या उत्तराखंडच्या “मशरूम गर्ल”ने एका नागरिकाला तब्बल ५७ लाख रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यवसायात भागीदारी करण्याचे सांगूण महिलेने या व्यक्तीची लाखोंची रोकड लंपास केली आहे. जितेंद्र नंदकिशोर भाखाडा यांनी 2022 मध्ये फसवणुकीची तक्रार पौड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत अशी आरोपींची नावे आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलिसांनी या प्रकरणी या दोघांना ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची प्रिक्वेल सिस्टम्स या नावाची एक कंसलटंसी होती. फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला तांत्रिकशेती उद्योग करण्यासाठी त्यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दि.१२ रोजी पक्षाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली होती, आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले होते. दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करु, असे त्यांनी सांगितले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात असल्याचं वक्तव्य केले होते. आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपच्या कार्यलयात जय्यत तयारी सुरु आहे. आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांच्यासह राजूरकरांचा भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश पार पडणार आहे. अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांचा पक्षप्रवेश भाजपचे…
पुणे : वृत्तसंस्था शरदचंद्रजी पवार संजीवनी आरोग्य मित्र”.व, एक पाऊल आरोग्य समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने!या उपक्रमाचे उद्घाटन देशाचे लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाविषयी माहिती देणारी कार्यशाळा व भव्य मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार डॅाक्टर सेलद्वारे करण्यात आले.दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी स. 9 ते दु. 2 या वेळेत निसर्ग कार्यालय, मार्केटयार्ड, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार रोहीतदादा पवार यांच्याबरोबर संपूर्ण युवा संघर्ष यात्रेमध्ये पायी चालत सहभागी झालेल्या संघर्ष यात्रींचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपल्या समस्या व मागण्यांबाबतचे निवेदन सादर केले. या कार्यक्रमास रोहीतदादा पवार, विकास लवांडे (राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते), मा. प्रशांतदादा…
जळगाव : प्रतिनिधी पतीचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेने माहेरुन पाच लाख रुपये आणावे, यासाठी विवाहितेचा छळ केला जात असल्याची घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विवकानंद नगरातील माहेर असलेल्या नंदा विलास पाटील यांचे अमळनेर येथील विलास अशोक पाटील यांच्यासोबत विवाह झाला आहे. विवाहनंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या पतीने घेतलेले पाच लाखांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी माहेरुन पाच लाख रुपयांची मागणी केली. परंतु विवाहितेने त्यांची मागणी पुर्ण न केल्यामुळे सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करीत मारहाण देखील करण्यात आली. यावेळी विवाहितेच्या पतीने त्यांना माहेरी पाठवून दिले. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने…

