Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हॉटेलमध्ये थरार : जोडप्याला मारहाण करीत सामुहिक अत्याचार !
    क्राईम

    हॉटेलमध्ये थरार : जोडप्याला मारहाण करीत सामुहिक अत्याचार !

    editor deskBy editor deskJanuary 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हावेरी : वृत्तसंस्था

    देशातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या अनेक घटना उजेडात येत असतांना अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला केल्याप्रकरणी पीडित महिलेने सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. महिलेने स्वतःचा एक व्हिडीओ जारी केल्यानंतर तो सध्या व्हायरल होत आहे.

    व्हायरल व्हिडीओनुसार, महिला सांगते की, सहा जण जबरदस्तीने हॉटेलच्या खोलीत घुसले आणि आधी मारहाण केली. मग ते तिला जंगलात घेऊन गेले. तेथे सहा आरोपींसोबत आणखी एकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी तिला कारमध्ये बसवून शहरभर फिरवले.

    महिलेच्या आरोपांवर पोलिसांनी सांगितले की, त्यांना यापूर्वी बलात्काराची माहिती देण्यात आली नव्हती. हावेरीचे एसपी अंशु कुमार म्हणाले, आम्ही महिलेला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. यानंतर सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदविण्यात आला आहे. आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

    ७ जानेवारी रोजी हावेरी येथील हॉटेलच्या खोलीत सहा जण जबरदस्तीने घुसले होते. खोलीत एक जोडपे होते. आरोपींनी दाम्पत्याला मारहाण केली. त्यांचा दोष एवढाच होता की, दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. आरोपींनी जोडप्याला लाथा मारल्याच्या घटनेचा व्हिडीओ बनवला, जो व्हायरल झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप प्रदेश माध्यम विभागात मोठा फेरबदल – राज्यभर नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर!

    April 21, 2026

    जामनेर : १६ वर्षीय मुलीचा विनयभंग : एका विरोधात गुन्हा दाखल !

    April 21, 2026

    चोपड्यात थरारक खून प्रकरणाचा २४ तासांत छडा : संशयित आरोपी अटकेत !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.