नंदुरबार : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताची मालिका सुरु असतांना नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथून अशीच एका अपघाताची घटना समोर आली आहे. वाहन खरेदी करून गावी जात असतांना घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातात चारजण ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता धडगाव तालुक्यातील गोरंबा-लेंघापाणी घाटात घडली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत म्हसावद पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेंघापाणी (ता. धडगाव) येथील पाडवी व चौधरी परिवाराने नवीन चारचाकी वाहन खरेदी केले होते. गुरुवारी हे वाहन (क्रमांक एमएच २० वाय ६७९७) घेऊन सहाजण गावी लेंघापाणी येथे जात होते. घाटात तीव्र वळणावरचे…
Author: editor desk
मेष : निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथी सोबत ही व्यतीत करू शकतात. तुमच्या शृंगारिक वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे. वृषभ : आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. ज्या…
पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातही गुन्हेगारांनी कळस गाठला असून एकीकडे पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे येरवडा कारागृहातून एक धक्कादायक घटना घडली आहे. येरवडा कारागृहातील काही कैद्यांनी मिळून चक्क तुरुंग अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये गुरुवारी १५ फेब्रुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे अशी आरोपींची नावे असून शेरखान पठाण असं मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्या उजव्या डोळ्याच्या खाली जखम झाली आहे. तसेच उजवा हाथ फ्रॅक्चर झाला आहे. पठाण यांच्यावर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात लढा देत असतांना १४ फेब्रुवारी रोजी भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांच्यावर ट्वीट सडकून टीका केली. यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाने राणे पिता-पुत्रांविरोधात आंदोलने सुरू केली आहे. काही ठिकाणी रास्तारोको देखील करण्यात आलाय. धुळ्यात मराठा समाजाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राणे पिता-पुत्रांचे फोटो असलेले बॅनर जाळले आहेत. तसेच प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेधही केला आहे. यावेळी काही आंदोलकांनी ‘कोंबडी चोर’ असा उल्लेख करत घोषणाबाजी देखील केली. धुळे शहरातील स्वस्तिक चौकात राणे पिता पुत्रांच्या निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक एकवटले होते.…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषण सुरु केले असून त्यांची तब्येत देखील बिघडलेली असतांना राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी थेट जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मंत्री भुजबळ म्हणाले कि, मनोज जरांगे यांना उपोषण करण्याची काय गरज आहे?, श्रेय घेण्यासाठी त्यांचे उपोषण सुरू आहे, तसेच मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही भुजबळ म्हणाले. मंत्री भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या अशी आमची भूमिका आधीपासून आहे. मागच्या दाराने कुणबी म्हणून त्यांना घुसवू नका. तसेच सगेसोयरेच्या माध्यमातून नको ती व्याप्ती वाढवू नका. याच्या विरोधात आमची लढाई सुरू आहे.…
चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरु असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून अनेक घडामोडी सुरु असतांना देखील चाळीसगाव तालूक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पूर्ववैम्यन्यातून एकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अापल्या घरावर गाेळीबार झाल्याचा बनाव करून खाेटी तक्रार दिली. तसेच त्यासाठी परराज्यातून गावठी कट्टा व दोन गोळ्याही विकत घेतल्याचा प्रकार तालुक्यातील भोरस येथे समाेर अाला आहे. याप्रकरणी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला असून एकास अटक करण्यात अाली अाहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पहाटे फोन आला की, भोरस चौफुलीवर कैलास रघुनाथ पाटील यांच्या घरावर गोळीबार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कैलास पाटील यांनी सांगितले की,पहाटे ३…
पुणे : वृत्तसंस्था देशभरात ‘व्हॅलेंटाइन डे’चा मोठा उत्साह सुरु असतांना नुकतेच पुणे येथे अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका २४ वर्षीय युवकाने स्वतःच्या हातावर ब्लेडने मारून घेऊन स्वतःला जखमी केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी युवराज रवींद्र बारडे (२४, रा. पर्वती दर्शन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दत्तनगर परिसरातील १६ वर्षाच्या तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार फिर्यादी मुलीच्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज याने फिर्यादी मुलीशी २०२३ पासून मैत्री करून तिच्याशी जवळीक वाढवली. तू आवडतेस माझ्याशी संबंध नाही ठेवले तर मी माझे बरे वाईट करून घेईन, अशी धमकी तो वारंवार देत होता. तिचा…
जळगाव : प्रतिनिधी कॉलेजला जाते सांगून घरातून निघालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता मुलगी ही सकाळी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली. त्याच्यानंतर ती रात्रीपर्यंत घरी आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्या बाबत कुठेही माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनीपोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात…
पाचोरा : प्रतिनिधी खडकदेवळा येथून पाचोऱ्याकडे येत असताना जारगावजवळ मागून येणाऱ्या मिनीट्रकने कट मारीत दुचाकीस जोरदार धडक दिल्याने स्वार जागीच ठार झाल्याची घटना १४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन प्रकाश सूर्यवंशी पाटील (३२, खडकदेवळा बु,, ता. पाचोरा) हे दुचाकी (एमएच१९/सीए१९०४) ने पाचोऱ्याकडे येत असताना मागून येणाऱ्या मिनीट्रकने (एमएच१८/बीजी८५७८) कट मारून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार नितीन सूर्यवंशी पाटील हे पुढच्या चाकाखाली येत जागीच ठार झाले. यावेळी मिनीट्रक चालक हा फरार झाला. नितीन पाटील हे प्रकाश पाटील (खडकदेवळा) यांचे पुत्र असून सेवानिवृत्त सैनिक आहेत. ते पाचोरा येथे मुलांच्या शिक्षणासाठी राहत होते. घराकडे येत असताना हा अपघात झाला.…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहीगावातील यावल रस्त्यावरील बालाजी तोल काट्याच्या जवळ जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. येथून समीर तडवी, समशेर तडवी, अमीर तडवी, संदीप पाटील, फारुख तडवी, अकील तडवी व संतोष कोळी या सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा मोटारसायकली, रोख रक्कम, असा एकूण २ लाख १० हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी केली. मिळालेल्या माहितीनुसार, दहीगाव गावात मोरया हॉटेलच्या बाजूला अवैध देशी, विदेशी दारू विक्री करणाऱ्या संतोष कोळीकडून १९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये २ लाख ३० हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.…

