जळगाव : प्रतिनिधी जागतिक पातळीवरील दूध भुकटी व लोणी चे दर खालावल्यामुळे काही महिन्यांपासून देशभरातील सहकारी व खाजगी दुध संघांनी आपले दुध खरेदी दर कमी केले होते. विशेष म्हणजे शासनाने ठरवून दिलेल्या किमान २७ रुपये प्रति लिटर या दरापेक्षा कमी म्हणजे २५ रुपये पर्यंत काही दुध संघांनी दर कमी केले असताना देखील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने आपल्या दुध खरेदी दर २७ रुपयांच्या खाली जाऊ दिले नाही. जळगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दुध खरेदी करणाऱ्या महाराष्ट्र व गुजरात मधील सहकारी व खाजगी दुध संघांनी सुगीच्या काळात म्हणजे दुधाची मागणी कमी व पुरवठा जास्त असतो अश्या वेळी देखील…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी आडगाव येथील गरीब शेतमजूर कै.बापू रामदास हांबरे (गोपाळ) यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे अकाली निधन झाले. पत्नी, तीन मुली व एक लहान मुलगा असा परिवार असणाऱ्या कै. बापू यांची लहान मुलगी कु.दुर्गा हिचे लग्न दि.२ मे रोजी ठरले असून ऐन लग्नाच्या महिनाभर अगोदर हा दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला. कै. बापूंच्या उपचारासाठी देखील मोठा खर्च लागल्याने गोपाळ कुटुंबाच्या पुढे दुर्गाचे ठरलेले लग्न कसे पार पाडावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गोपाळ कुटुंबाची ही दुःखद कथा शिवनेरी फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेशदादा चव्हाण यांना कळाली असता त्यांनी सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली…
जळगाव : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून रविवार, दि.२८ रोजी जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, इंद्रप्रस्थनगर, श्री लक्ष्मीनगर, छत्रपती शिवाजी नगर, गेंदालाल मिल आदी भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. नागरिकांचा लाभलेला प्रतिसाद पाहून ही प्रचार रॅली विजयी रॅलीच वाटत होती. नागरिकांनी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घरा-घरांवरून फुलाची उधळण आणि ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’च्या घोषणा देत करणदादा पाटील यांचे स्वागत केले. जळगाव शहरातील राजमालतीनगरातील श्री हनुमान मंदिर आणि जिल्हा दूध संघासमोरील साईबाबा मंदिरात नारळ…
जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीतील रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र त्यांच्या जागी उद्योगपती श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र रवींद्र भैय्या पाटील यांची उमेदवारी कापण्यात कटकारस्थान झाले अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यावर रवींद्र भैया यांनी दिलेल्या खुलासा केला असून, उमेदवारी कापण्यात कुठेही कटकारस्थान झाले नाही, मी तिकीट मागितले होते, साहेबांचे राजकीय गणित असतात त्यामुळे त्यांनी मला थांबायला सांगितले, आणि त्यांच्या आदेशाची मी पालन करत असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जोमाने आमचे काम सुरू आहे असा खुलासा पाटील यांनी केला. रवींद्रभैय्या पाटील यांच्या गावाजवळी अंतुरली चांगदेव…
चोपडा : प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा तालुक्यात आज महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांची प्रचार फेरी उत्साहात संपन्न झाली. आजच्या प्रचार दौऱ्यात निमगव्हाण, खाचणे, कुरवेल, सनफुले, कठोरे, कोळंबा, वडगांव सिम व मंगरूळ येथे ग्रामस्थांच्या ही भेटीगाठी घेत श्रीराम पाटील यांनी संवाद साधला. यावेळी माजी शिक्षक आमदार तात्यासाहेब दिलीपराव सोनवणे , चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड संदीप भैय्या पाटील, माजी आमदार सुरेश बापू पाटील, गोरख तात्या पाटील, माजी सभापती जगन पाटील, हातेड सूतगिरणीचे संचालक रमेश नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , सूतगिरणीचे संचालक भाऊसाहेब पाटील, राजेंद्र भास्कर…
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात सुरू झाला आहे. अर्थात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आता तिच्या मधल्या टप्प्यावर आहे. रावेर मतदार संघातील निवडूनिकाचा ज्वर वाढत आहे. एकीकडे माजी मंत्री व विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे विरुद्ध उद्योजक श्रीराम पाटील असा थेट सामना रंगणार आहे. परंतु हा सामना अधिक नाट्यमय होतोय तो एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यावरून. अर्थात मूळचे काँग्रेसी नंतर भारतीय जनता पक्षात अनेक वर्षे कार्य केलेले तब्बल १२ खात्यांचे मंत्री असलेले खडसे स्वपक्षियांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून भा. ज. पा. ला राम राम करून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कन्या रोहिणी सोबत दाखल झाले. आता नाथाभाऊंचे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे खरे कारण…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने पायी जात असलेल्या तरूणाला किरकोळ कारणावरून एकाने शिवीगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शहरातील गेंदालाल मिल गेटजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील राजमालती नगरात राहणारा फैजान राजू पटेल हा तरूण शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फैजान पटेल हा बहिणीसोबत गेंदालाल मिल गेट जवळून पायी जात होता. त्यावेळी राज अजय सुरवाडे रा. राजमालती नगर याने किरकोळ कारणावरून फैजान पटेल याला शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर फैजान याने शहर पोलीस ठाण्यात…
मुंबई : वृत्तसंस्था उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कापत भाजपने येथून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याविरोधात आता निकम लढत देणार असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना दोन दिवसांपूर्वीच उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. गायकवाड यांच्या विरोधात महायुतीत भाजप येथून कोणाला उमेदवारी देणार याबाबत बरेच तर्कवितर्क सुरू होते. भाजपत अनेक नावांवर चर्चा सुरू असल्याचे समोर आले होते. अखेर भाजपने शनिवारी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना येथून उमेदवारी दिल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले. मागील काही महिन्यांपासून…
लातूर : वृत्तसंस्था मागच्या दहा वर्षांत देशातील अनेक घटना पाहता लोकशाहीसाठी घातक आहेत. राजकीय पक्ष तोडले जात आहेत, आमदार विकत घेतले गेले. संविधानाच्या विरोधात अनेक घटना बघायला मिळत आहेत. भारताच्या लोकशाहीसाठी अनेकांनी त्याग केला आहे. परंतु, भाजप नेते, मंत्री संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. भारतीय लोकशाही कमजोर करण्यासाठी संविधान बदलण्याची मानसिकता भाजपची असल्याचे ‘दावे के साथ कहती हूँ’ असे म्हणत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर हल्लाबोल केला. लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री अमित देशमुख आमदार धीरज देशमुख,…
जळगाव : प्रतिनिधी विश्रांती करीत असलेल्या खोलीमध्ये जाऊन आक्षेपार्ह फोटोंची धमकी देत महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तन करीत तिचा रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याने विनयभंग केला. तसेच विवाहितेच्या कुटुंबातील सदस्यांना ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात घडली. याप्रकरणी हिमालय कांतीलाल वाघेला याच्याविरुद्ध २६ एप्रिल रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयामध्ये सहायक नेत्र चिकित्सक म्हणून काम करणाऱ्या एका विवाहितेची १४ डिसेंबर २०२३ रोजी दुपारच्या सुमारास तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्या एका खोलीमध्ये विश्रांती करीत होत्या. याचवेळी तेथे काम करणारा हिमालय वाघेला हा त्या ठिकाणी आला आणि त्याने दरवाजा बंद करून विवाहितेसोबत जबरदस्ती करू लागला. त्यानंतर…

