Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यावेळी हद्दपार, चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्यांसह वॉरंट असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्यात आली. तर नाकाबंदीदरम्यान, १३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाकडून ऑपरेशन राबवून दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला उदय रमेश मोची (रा. रामेश्वर कॉलनी) याला अटक केली. घरफोडीच्या उद्देशाने फिरत असलेला राहुल जीवन पांडे (रा. सुप्रीम कॉलनी) यालाही ताब्यात घेतले. दोन वर्षांपासून फरार असलेल्या अजय बिरजू गारुंगे (रा. तांबापुरा) होता. त्याला तांबापुरातून अटक केली.…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील विवरे बु. येथील ग्रामविकास अधिकारी डिगंबर जावळे यांनी तक्रारदाराला बँक कर्जासाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायतीतील आवश्यक कागदपत्रे काढून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला नमुना क्रमांक ८, फेरफार दाखला, नकाशा आणि ना हरकत प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी जावळे यांनी दि. २१ रोजी दहा हजार रुपयांची लाच मागितली. त्यात संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सापळा रचला. त्यात पंचासमक्ष जावळे याने पाच हजार रुपये लाच मिळवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी अष्टभूजा देवी मंदिरासमोरील रस्त्यावर दोन मित्र उभे असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी शिवीगाळ करत दोघांकडून ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरी हिसकावून नेले. ही घटना रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दीपक देवीदास धनगर (वय ३३, रा. अकुलखेडा ता. चोपडा) आणि त्याचा मित्र गणेश असे दोघेजण रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास अष्टभूजा देवी मंदिराजवळ उभे होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी त्याच्याजवळ येऊन शिवीगाळ करून दमदाटी केली. दीपकजवळील २९ हजारांची रोकड आणि गणेश जवळील दीड हजार व…

Read More

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. राजकारणातील लोकांनी सावध राहावे, विरोधक तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या संपत्तीत वाढ झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायावर आणि इतर कामांवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. व्यवसायात तुमची मुले तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. भांडवलाच्या योग्य गुंतवणुकीसाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. विशेषत: सिनेविश्वातील कलाकारांसाठी दिवस चांगला आहे. आज तुमच्या चुकांची जबाबदारी न घेतल्याने तुम्हाला बरे वाटणार नाही. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी करिअरशी संबंधित सल्ले घ्याल. आज कोणत्याही विशेष परिस्थितीत तुमच्या जोडीदाराला नक्कीच साथ द्या. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. जर तुम्ही…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात लोकसभा निवडणूक जोर धरीत असतांना गेल्या काही दिवसापूर्वी गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघानंतर इंदूर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला असतांना सूरतनंतर इंदूरमध्ये भाजप उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यानंतर काँग्रेस उमेदवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. कैलाश विजयवर्गीय यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गुजरातनंतर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे अक्षय कांती बम यांनी अर्ज मागे घेतला आहे. बम यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या मार्गावर भाजपचे वरिष्ठ नेते कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या एकीमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यावी लागत आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनोज जरांगे हे मोदींपेक्षा मोठे नेते नाहीत, अशा शब्दांत भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना फटकारले. भुजबळ म्हणाले, विधानसभा आणि लोकसभेमध्ये ओबीसींना आरक्षण नाही, हे जरांगे यांना माहीत नाही. आता आम्ही येवल्यात लढतो, तेथून निवडून येतो. ज्यांना एवढेही समजत नाही, त्यांना आपण काय सांगणार? यापूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे म्हणाले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जंगी सभा होत आहेत.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करुन तिची चोरटी वाहतूक करण्याचा प्रकार सुरुच आहे. नांदगाव शिवारात शेत गट क्रमांक 33 येथील गिरणा काठाजवळ अवैधरित्या वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी कारवाईतून जप्त केले. वैजनाथ, टाकरखेडा शिवारात गिरणानदीपात्रातून चोरी चुपके वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची सतत ओरड होत असते. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नांदगाव येथे गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी पथक नेमून ते रवाना केले. शनिवार दि. २७ रोजी पहाटे तीन वाजता पोलिसांनी अवैधरित्या वाळूने…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी भाग्यश्री हॉलिडे ट्रॅव्हल्स कंपनीच्या एजंटकडून नगरदेवळा येथील यात्रेकरूंची फसवणूक केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. रघुनाथ सुखदेव सोनार (७०, नगरदेवळा, ता. पाचोरा) या यात्रेकरूने दक्षिण भारत यात्रेसाठी भाग्यश्री हॉलिडे, मालाड-मुंबई या कंपनीचे एजंट भूपेश भीमभाई सुरती (मालाड) यांच्याशी जाहिरातीवरून ऑनलाइन बुकिंगसाठी संपर्क केला. भूपेश सुरती हा नगरदेवळा येथे येऊन त्याने १७ ऑक्टोबर रोजी रघुनाथ सोनार याच्यासह बारा यात्रेकरूंशी संपर्क केला व आरक्षणासाठी पैशाची मागणी केली. या यात्रेकरूंनी १७ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर २३ दरम्यान वेळोवेळी ऑनलाइन बैंकिंगद्वारे भूपेश भीमभाई सुरती याच्या अकाउंटवर एकूण २ लाख १३ हजार रुपये टाकले. त्यानंतर भूपेश सुरती याने कोणत्याही प्रकारचा संपर्क…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भाजपाने २०१४ ची निवडणूक १५ लाख रुपये आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर चालविली. त्यानंतर २०१९ ला पुलवामा आणि आता देश-विदेशाच्या मुद्यावर चालविली जात आहे. परंतु, मला देश-विदेशाच्या मुद्द्यांवर हायफाय भाषणं करून गल्लीचे प्रश्न संपवायचे नाहीत. जळगाव लोकसभा मतदार संघात तुम्हीच भाजपाला एक-दोन नव्हे तर ३०-४० वर्षे संधी दिली. आता एक वेळ आम्हालाही संधी द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संधी द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले. जळगाव शहरातील उस्मानिया पार्क येथे महाविकास आघाडीच्यावतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादी…

Read More

मुक्ताईनगर भाऊंचे नाव महाराष्ट्रात सर्वांना माहीत आहे. एकाच वेळी १२ खात्यांचे धुरा असण्याचा रेकॉर्ड यांच्या नावावर आहे. महत्वाचे म्हणजे जळगाव जिल्ह्यात आपल्या कुटुंबाला कोणी पर्याय होऊच शकत नाही आणि तो आलाच तर तो येनकेन प्रकारे आपण संपवतो असा आविर्भाव भाउंकडे आहे. हा आविर्भाव आला कुठून ?जेंव्हा यांनी एक एक व्यक्ती राजकारणातून बेदखल करण्याची सुरुवात केली तेंव्हा पासून. यांच्याच लेवा समाजातील माजी खासदार व आमदार राहिलेले कै. हरिभाऊ जावळे यांची राजकीय कारकीर्द संपविली ती आदरणीय मुक्ताईनगरच्या भाउंनीच. हरिभाऊ जेंव्हा तिसऱ्यांदा खासदार होणार होते त्यावेळी यांनी पक्षाच्या नेत्यांना आपल्या घरातील महिलेसाठी भावनिक साद घालून हरीभाऊंचे खासदारकीचे तिकीट कापले..तिसऱ्या वेळी हरीभाऊ खासदार झाले…

Read More