Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खंडणीसाठी धमकी, नागरिकांनी केली चौघांची धुलाई
    क्राईम

    खंडणीसाठी धमकी, नागरिकांनी केली चौघांची धुलाई

    editor deskBy editor deskJuly 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    चार दिवसांपूर्वी जेलमधून सुटून आलेल्या एकावर बंदूक रोखत त्याच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी करत मारहाण करणाऱ्या चार संशयितांना परिसरातील नागरिकांनी चोप दिला. यातील दोन जणांना अटक झाली असून इतर दोन पसार झाले. पारोळा येथे शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुनील ऊर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील (३६), ज्ञानेश्वर ऊर्फ अमोल वसंत पाटील (४०) आणि किरण प्रकाश पाटील (३५, सर्व रा. पारोळा) अशी आरोपींची नावे आहेत. चौथ्याचे नाव समजू शकले नाही. यातील सुनील व किरण यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. फिर्यादीवर बंदूक व काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तो चार दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर आला होता. शनिवारी रात्री त्याला सुरुवातीला राम मंदिर चौकात धमकावण्यात आले, आणि त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या घरीसुद्धा जाऊन त्याला गळफास देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याच्या कुटुंबियांनाही मारहाण केली.

    परिसरातील नागरिकांना फिर्यादी घरी काही तरी गडबड असल्याची शंका आली. त्यांनी चारही संशयितांना बाहेर काढत बेदम मारहाण केली. यातून या चारही जणांनी पळ काढला. त्यातील दोघांना पकडण्यात यश आले. या प्रकरणी वरील चारही जणांविरुद्ध पारोळा पोलिसात विनयभंगासह अन्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “तू इकडे का आला?” वादातून कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    March 9, 2026

    आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीकाने घेतला टोकाचा निर्णय : सुसाईट नोट व्हायरल !

    March 9, 2026

    भडगाव हादरले : मुलांना वाचवताना नदीत उडी; तरुण-तरुणीचा दुर्दैवी अंत !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.