यावल : प्रतिनिधी तालुक्यातील वाघझिरा येथे गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून यावल पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी यावल पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मुजफ्फर खान, हवालदार सुशील घुगे, उमेश महाजन या पथकाने गावठी हातभट्टीची दारू, कच्चे, पक्के रसायन, दारू गाळणी करण्याचे साहित्य असा एकूण ४४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. हवालदार सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून पठाण बारेला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार उमेश महाजन करीत आहेत
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ-फैजपूर रस्त्यावर असणाऱ्या अकलूज टोलनाक्यावर एका कारमधून ८ लाख ६५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संबंधिताने पुरावे सादर करण्याची तयारी दाखविली आहे. सुनावणीदरम्यान या रोकडविषयी निर्णय घेतला जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, फैजपूर प्रांताधिकारी व सहायक जिल्हाधिकारी देवयानी यादव, डीवाय. एसपी तथा परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी ही कारवाई केली. भुसावळ शहरातील एका व्यावसायिकाच्या वाहनाची या पथकाने तपासणी केली. तेव्हा कारमध्ये ८ लाख ६५ हजारांची रोकड असल्याचे दिसून आले. त्यानंतर रोकड ताब्यात घेण्यापूर्वी प्रशासनाने घटनास्थळी पंचनामा केला आणि रोकड कोषागार कार्यालयात जमा केली. फैजपूर परिसरात असलेल्या…
मेष तुमची दिनचर्या आज चांगली राहील. आज तुमच्या आत सकारात्मकता असेल, त्यामुळे तुमचे मन कामात व्यस्त राहील. आज तुम्हाला व्यावसायिक सहलीचा फायदा होईल. लोकांशी भेट आणि बोलण्यात आनंद वाटेल. जोडीदारासोबतच्या नात्यात सुसंवाद राहील. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल. कोणत्याही विषयावर वाद घालणे टाळा. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या महिलांचे उत्पन्न वाढेल. आज तुम्ही गरजूंना मदत करण्यासाठी पुढे याल. खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. आधी दिलेल्या मुलाखतीचा निकाल आज तुमच्या बाजूने लागेल. तुम्हाला काही लोक भेटतील जे तुमच्या करिअरसाठी उपयुक्त ठरतील. कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील 11 अधिकारी व कर्मचार्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. जिल्हा पोलीस दलात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाची घोषणा केली. राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवार, 25 रोजी या पदकांची घोषणा केली. त्यात जळगाव पोलीस दलातील संजय नारायण हिवरकर, मीनल श्रीकांत साकळीकर, राजेश पंडित पाटील, दीपक देवराम चौधरी, विजय नामदेव सोनवणे, प्रवीणा गजानन जाधव, महेश अरविंद बागुल, शकिल अहमद शब्बीर शेख, राजेश शाहू पाटील तसेच भुसावळ शहरचे एएसआय मोहम्मदअली सत्तारअली सैयद, भुसावळचे हवालदार संजय राजाराम पाटील यांचा समावेश आहे.
जळगाव : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात झाली असून शुक्रवार दि. २६ रोजी जळगाव तालुक्यात शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वच गावांमध्ये करणदादा पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले. शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी दक्षेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी करणदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो, अशा विविध घोषणा देऊन करणदादा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. गावात ठिकठिकाणी औक्षण करून करणदादा पवार यांचे स्वागत करण्यात आले. रॅली दरम्यान करणदादा पाटील यांनी…
अमळनेर : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील इंदोर व धार दरम्यान चोरून आणलेला लोखंडाने भरलेला ट्रक एस. एस. टी. पथकाच्या सतर्कतेने तालुक्यातील मुडी, मांडळ भागात पकडण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक व लोखंड असा एकूण २० लाखांचा माल जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, इंदोर आणि धार जिल्ह्याच्या दरम्यान घाटाबिल्लो येथील इम्रान मोहम्मद शेर मोहम्मद याच्या घरासमोरून १० ते १२ टन लोखंडाने भरलेला ट्रक (एमपी- ४०, जीए ७७८) हा अज्ञात चोरट्याने २३ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरून नेला होता. हा ट्रक २४ रोजी पहाटे अमळनेर तालुक्यातील मुडी, मांडळ भागातून जात होता. दरम्यान, निवडणूक कामासाठी तयार केलेल्या चेकपोस्टवर असलेले विस्तार अधिकारी सुरेश…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ एका धावत्या रेल्वेने दिलेल्या धडकेत एका ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला. गुरुवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आढळून आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील भादली रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१६ जवळ एका धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी ३५ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरूवारी २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. मयत झालेल्या तरूणाची ओळख पटलेली नाही. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत चेंदामेंदा झाल्यामुळे तसेच, कपड्यांमध्ये कुठलेही कागदपत्र आढळून आलेले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील बोराडे येथील मागासवर्गीय वस्तीतील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली. नागरिकांनी लगेचच आग विझविण्यासाठी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीत तब्बल एक लाखांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोराळे ता. यावल येथील मागासवर्गीय वस्तीत शरद दिनकर वानखेडे हे भाड्याच्या घरात राहतात. ते गुरुवारी सकाळी घराला कुलूप लावून दवाखान्यात गेले होते. यादरम्यान त्यांच्या बंद घराला सकाळी ९ वाजेच्या सुमारास आग लागली. हा प्रकार निर्दशनास येताच नागरिकांनी तेथे धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत घरातील साहित्य,…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. काही दिवसांपूर्वी स्वतः खडसेंनीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते; पण त्याला पंधरवडा उलटूनही अद्याप त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. त्यावरून कुजबुज सुरु असतानाच, गुरुवारी खडसे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपविला. त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच ठरणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश झाला नसला तरी, रक्षा खडसे आपल्या स्नुषा आहेत, तसेच मी भाजपमध्ये जाणार…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील सुंदर नगर येथे अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मंगळवार, २३ एप्रिल रोजी दुपारी अज्ञात कार चालकावर भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, नामदेव हरीदास राठोड (वय ३८, रा. पंढरपूर नगर, भुसावळ) हे खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. ते रविवार, २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ शहरातील सुंदर नगरमधून त्यांच्या दुचाकीने जात असताना मागून येणाऱ्या कार क्रमांक एमएच १९, सीव्ही ७९२०) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नामेदव राठोड जखमी झाले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात…

