Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील महायुतीच्या प्रचारासाठी उमेदवार स्मिता वाघ,जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर, प्रभाकर आप्पा सोनवणे, तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी व भारतीय जनता पार्टी – महायुतीचे पदाधिकारी गावात प्रवेश करतेवेळी शेतकऱ्यांनी केळी पिक विमा बाबत विचारणा केली असता पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी वाद घातला. यावेळी गग्रामस्थांनी प्रचार करण्यास मज्जाव केला. तसेच यावेळी काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडल्याने गावात असलेले वडाचे झाड, लहान मंदिर व त्यास लागून असलेल्या शेतकऱ्याच्या गोडाऊनने पेट घेतला. ग्रामस्थांनी तात्काळ मोठा अनर्थ टळला. यावेळी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या असवेदनशील कार्यकर्त्यांवर शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी मोठा रोष व्यक्त केला व गावात प्रचार करू नये असे ठणकावून सांगितले….

Read More

रावेर : प्रतिनिधी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शुक्रवार, 3 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर शहरात जाहीर सभा होणार आहे. या सभेत शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, भुसावळात शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवार, 3 रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा येथे सकाळी साडे दहा…

Read More

वाशीम : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे. या अपघातामध्ये कंटेनर चक्काचूर झाला आहे. तर ट्रकच्या धडकेत एक ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यात लोकेशन चॅनल क्रमांक 181 वर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. समृद्धी महामार्गावर कंटेनरचा ड्रायव्हर आणि क्लीनर कंटेनरच्या टायरमध्ये हवा चेक करण्यासाठी खाली उतरले होते. ते दोघेही रस्त्यावर उभे होते. तेवढ्यात मागच्या बाजुने एक भरधाव ट्रक आला. या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.…

Read More

मेष – तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल. या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. वडिलधाऱ्यांचा पाठिंबा तुम्हाला तुमचे करिअर पुढे नेण्यास मदत करेल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली सरकारी कामे आज पूर्ण होतील. आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. मित्रांचा सल्ला आज तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल, त्यांच्यामुळे तुम्ही यशस्वी व्हाल. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. तुमच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती अनुकूल होत आहे. पण एवढंच लक्षात ठेवा की कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजूंचा विचार करा. आज विद्यार्थी अभ्यास आणि करिअरशी संबंधित कामांमध्ये गंभीर राहतील.…

Read More

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे शेत जमीनच्या वादातून मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावावर धारदार शस्त्राचे वार करुन खून केल्याची घटना साेमवारी रात्री घडली. मधुकर मारोतराव मगर (वय ३८, रा.मोरेगाव) असे मृताचे नाव असून राजेभाऊ उर्फ अशोक मगर यास पाेलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील मोरेगाव येथील मोरेश्वर मंदीरात जेवणाची पंगत चालू असताना ही घटना घडली. याप्रकरणी मृताची पत्नी अलका मधुकर मगर (वय ३१) यांनी फिर्याद दिली‌. संशयित आरोपी राजेभाऊ याने मृताच्या गळ्यावर, डाव्या पायावर, तोंडावर, छातीच्या डाव्या बाजुस चाकुने हल्ला करुन त्याचा खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे. पाेलिसांनी राजेभाऊ ऊर्फ…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था कोल्हापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आईची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. मोबाईलवर पत्नीशी बोलताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाने आईचा खून केला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहनाज मुजावर असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पत्नीसोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाकडूनच त्यांची हत्या करण्यात आली आहे. सादिक मुजावरला असे आरोपीचे नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. त्याने रंगाच्या भारत आईच्या छातीवर, पोटावर आणि पाठीवर सुऱ्याने वार केले आहे. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी प्रत्येक तरुण हा आपला लग्न मोठ्या हौस मौजेत करत असतो व लग्न सोहळा नेहमी अविस्मरणीय राहावा यासाठी तो वेगवेगळे उपक्रमांचे नियोजन करत असतो. अशाच प्रकारे जळगावातील धरणगाव तालुक्यातील सोनवद गावातील विजय पाटील या पत्रकार तरुणांनी आपल्या लग्न पत्रिकेतून तसेच लग्नात वऱ्हाडी मंडळीसह मतदानाची शपथ घेऊन मतदानाबद्दलची जनजागृती करणार आहे. त्यामुळे आजच्या तरुणांसमोर अनोखा आदर्श विजयने उभा केला आहे. विजय पाटील यांचे ५ मे रोजी लग्न सोहळा पार पडत असून या लग्न सोहळ्याच्या पत्रिकेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावा असा आशय पत्रिकेत नमूद केला आहे. त्यामुळे मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला विजय पाटील यांनी सुद्धा हातभार लावला असून मी…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीच्या घटकपक्षांमध्ये निर्माण झालेला गुंता सुटला आहे. नाशिकमधून महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना रणांगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळं नाशिकमधील प्रमुख लढतीचं चित्र जवळजवळ स्पष्ट झालं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. अशामध्ये अखेर एका महिन्यानंतर या जागेवरून नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा वाटपावरून महायुतीमध्ये असलेला तिढा अखेर सुटला. महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. तब्बल एका महिन्यानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. हेमंत गोडसे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

Read More

भडगाव : प्रतिनिधी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना विजयी करून परिवर्तनाच्या नांदित सहभागी व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मतदारांना केले. करणदादा पाटील यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. रॅलीच्या सुरुवातीला शिवसेनेच्या ज्येष्ठनेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी त्यांच्या निवासस्थानी करणदादा पाटील यांचे औक्षण करून त्यांना शूभेच्छा दिल्या. त्यानंतर भडगाव शहारातील आझाद चौकातील प्रभु श्रीराम मंदिरात प्रार्थना करून आणि करणदादा पाटील, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते संजय वाघ आदींच्या हस्ते नारळ ओवळून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महादेव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शाहूनगर परिसरातील सहयोग हौसिंग सोसायटीमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे तब्बल १० मोबाइल चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोमवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शाहूनगर येथील सहयोग हौसिंग सोसायटीत भूषण राजेंद्र ठाकरे (रा. वटार, ता. चोपडा) या तरुणासह इतर त्यांचे सहकारी मित्र वास्तव्याला आहेत. रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घराचे दरवाजे उघडे ठेवून सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीतून भूषण ठाकरे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांचे ७० हजार रूपये किमतीचे १० मोबाइल चोरून नेले. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सर्वांनी शोधाशोध केली. मात्र, कोणाचेही मोबाइल आढळून…

Read More