Author: editor desk

मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. आज तुमच्यासाठी काही जमीन किंवा घर खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळतील. तुमच्यासाठी जागा बदलण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. आज तुम्हाला पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज काही कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पूर्ण कराल. तुम्ही केलेल्या कामावर सगळेच खूश दिसतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आदर वाढेल. तुमचे कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण राहील. सार्वजनिक डोमेनमधील तुमच्या प्रतिमेनुसार तुम्हाला परिणाम मिळतील. आज एखाद्याशी बोलताना संयम बाळगा. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल, तर त्याचा विस्तार…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  रावेर लोकसभा मतदार संघात “स्मार्ट व्हिलेज” योजना राबवून गावांना सक्षम करण्याचा व तळागाळातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी, वृद्ध महिला यांना न्याय देण्याचा प्रयत्न भावी काळात केला जाईल असे आश्वासन महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले. रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ तालुक्यातील गावांना शुक्रवारी प्रचार भेटी दरम्यान श्री पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली . भुसावळ तालुक्यातील साकेगाव, गोजोरा. सुनसगाव, गोंभी, वेल्हाळा , मांडवे दिगर, भिल्लमळी या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. मांडवे दिगर व भिलमळी गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासमोर समस्यांचा पाढा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मागील १० वर्षात एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. कशा भूलथापांना आपण बळी पडलो, हे आता लोकांना समजतंय, आणि म्हणूनच लोकशाही वाचविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवार, दि.२६ रोजी पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, रा. कॉ.चे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेलं सर्वात सुंदर असं लेणं आहे. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता अजरामर कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू अजूनही तेथे जतन करून ठेवल्या आहेत. बहिणाबाईंच्या ओव्या असतील किंवा त्यांच्या वस्तू असतील त्या सतत प्रेरित करत असतात. जळगाव शहराला देखील विकासाच्या मार्गाने पुढे न्यायचे आहे, त्यासाठी कमळ फुलवण्याचा निर्धार उपस्थित सर्वांनी यावेळी केला. भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी जुन्या जळगावातील बौद्ध विहार तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या वाड्याला भेट दिली. यावेळी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे खाजगी आराम बस शनिवारी दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पलटल्याने ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सविस्तर वृत्त असे कि, सुरत येथून शुक्रवारी संध्याकाळी सुरत- अकोला ही खाजगी आराम बस निघालेली होती. शनिवारी दि. २७ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात बस आली असताना अचानक टायर फुटल्याने पलटली. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले. गावातच रहिवासी असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बस बाहेर काढून त्यांनी रुग्णवाहिकेतून शासकीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मासे पकडण्यासाठी गेलेल्या सागर मुरलीधर सोनवणे (वय २८, रा. असोदा रोड) या तरुणाचा पाय घसरुन तो धरणात बुडाला. ही घटना दि. २६ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथे घडली. ग्रामस्थांच्या मदतीने धरणातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील असोदा रोड परिसरात सागर सोनवणे हा तरुण वास्तव्यास होता. त्याच परिसरात तो मासे विक्री करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. नेहमीप्रमाणे सागर हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान, भिंतीवरुन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सेकंड हॅण्ड कार खरेदीच्या करण्याच्या मोबदल्यात अल्ताफ बेग शमशेर बेग मिर्जा यांच्याकडन ७ लाख ५० हजार रुपयांची रोकड घेतली. परंतु त्यांना अद्याप पर्यंत कार न देता त्यांची फसवणुक केलयाची घटना दि. २५ एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी दीपक संजयराव देशमुख (रा. श्रीकृष्ण कॉलनी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरा परिसरात असलेल्या हाजी अहेमद नगरातील रहिवासी अल्ताफ बेग शमशेर बेग मिर्झा (वय ४५) यांनी नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ रोजी दरम्यान, ते मुंबई येथील एका बँकेकडून मोठ्या प्रमाणात सेकंड हॅण्ड कार खरेदी करणार होते. त्यासाठी दीपक संजयराव देशमुख यांनी अल्ताफ बेग…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील डांगरी येथे एकाने तिघांवर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना २५ रोजी रात्री नऊ ते साडेनऊदरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी नाना रामभाऊ शिसोदे (वय ६३) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सविस्तर वृत्त असे कि, डांगरी येथील प्रकाश उत्तमराव शिसोदे व राजेंद्र भीमराव शिसोदे हे त्यांच्या अंगणात खाट टाकून रात्री गप्पा मारत असताना गल्लीतील नाना रामभाऊ शिसोदे हा दोन-तीनवेळा त्यांच्याजवळून चक्कर मारून गेला. रात्री ९ ते साडेनऊदरम्यान नाना पुन्हा परत आला आणि त्याने राजेंद्र शिसोदे यांच्या मागाहून येऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. अचानक हातातील चाकूने राजेंद्र यांच्या पोटावर, हातावर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मन्यारखेडा शिवारातील साईनगरात राहणाऱ्या ममता रतिलाल राठोड (वय ३०) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ही आत्महत्या नसून तिच्या पतीने मारहाण करून तिला गळफास दिल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ममता राठोड ही विवाहिता पती रतिलाल भोजू राठोड आणि एक मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत वास्तव्याला होती. मोलमजुरी करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान, गुरुवारी रात्री १० वाजता राहत्या घरात ममता यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील प्रताप नगर परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाच्या एकुलत्या एक २६ वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. तेजस सतीश नारखेडे (वय २६) असे मृत युवकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, तेजस हा प्रतापनगर भागात वास्तव्यास होता. तेजसचे वडिल सतीश नारखेडे यांचे प्रतापनगरातच हॉटेल आहे. हॉटेल व इतर काम तेजस सांभाळत होता. गुरुवारी त्यांच्याकडे काही नातेवाईक आले होते. नातेवाईकांच्या लहान मुलांसोबत तेजस घरातच रमला होता. जेवण झाल्यानंतर तो झोपायला गेला. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास तेजसची अचानक तब्येत बिघडली. तेजसला घरीच उलटी झाल्यानंतर तो बेशुध्द पडला. घरच्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात नेले, खासगी…

Read More