Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मध्यरात्री भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक; चालकासह महिला गंभीर !
    क्राईम

    मध्यरात्री भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक; चालकासह महिला गंभीर !

    editor deskBy editor deskApril 29, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगावकडून कुसुंब्याकडे जाणाऱ्या मार्गावर रेमंड चौफुलीजवळ मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिल्याने कारचालकासह एका महिलेचा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री सुमारे १२:४५ वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, (एमएच १२ वाय.ए. ८१७) क्रमांकाची कार कुसुंब्याकडे जात असताना रेमंड चौफुलीजवळ अचानक अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका जबर होता की कारचे मोठे नुकसान झाले असून, वाहनातील चालक आणि महिला गंभीर जखमी झाले. अपघात घडताच परिसरातील इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. तसेच एमआयडीसी पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

    दरम्यान, अपघातानंतर काही काळ घटनास्थळी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्परता दाखवत वाहतूक सुरळीत केली.  या अपघातातील जखमींची नावे अद्याप समजू शकली नसून, संबंधित अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे जळगावात आयोजन; राज्यभरातील खेळाडूंची उपस्थिती !

    June 13, 2026

    देशाला हादरवणारी दुर्घटना! हवाई दलाचे विमान कोसळले, पाच वीर जवान शहीद

    June 13, 2026

    चेंदामेंदा झालेल्या ट्रकमधून चालकाला मृत्यूच्या दाढेतून खेचले बाहेर

    June 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.