Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सरकारचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विधानपरिषदेत आपल्या दिशेने हातवारे केले म्हणून संतप्त झालेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी भाजपा सदस्य प्रसाद लाड यांना शिवी हासडली होती. त्यांच्या वक्तव्यावरून आजही सभागृहात गदारोळ झाला. दानवे यांचे निलंबन करावे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. यानंतर उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केले आहे. शिवीगाळ प्रकणावरून गदारोळ झाल्याने उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी सोमवारी सभागृहातील कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले होते. आजही सभागृहात या प्रकरणावरून गदारोळ झाला. दानवे यांचे निलंबन करावे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. यानंतर उपसभापती गो-हे यांनी दानवे यांना पाच दिवसांसाठी…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात नेहमीच कोणता ना कोणता व्हायरस येत असल्याच्या नेहमीच बातम्या येत असतात आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये झिका विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. 1 जुलै रोजी दोन गर्भवती महिलांमध्ये विषाणूची पुष्टी झाल्याने, गेल्या 11 दिवसांत रुग्णांची संख्या 6 झाली आहे. हे दोन्ही नवीन रुग्ण एरंडवणे येथे आढळून आले आहेत. 21 जून रोजी पुण्यातील एका डॉक्टरमध्ये झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. यानंतर त्यांच्या 15 वर्षांच्या मुलीलाही संसर्ग झाल्याचे आढळून आले. दोघीही एकाच भागात राहतात जिथे 2 नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने बाधित भागातून अनेक नमुने घेतले. याशिवाय येथे औषधांची फवारणी आणि…

Read More

पाळधी : प्रतिनिधी दि .१ जुलै रोजी डॉक्टर व सी.ए.दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो, या दिवशी पाळधी येथे GPS मित्र परिवार तर्फे डॉक्टर डे व सी ए डे निमित्ताने पाळधी मधील सर्व डॉक्टर व सी ए यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यांत आला. या विशेष सत्काराने डॉक्टर साहेब व सी ए हे पण एकदम भारावून गेले,,या वेळी बोलताना जी प सदस्य यांनी सर्वाना आपल्या हातून समाजाची सेवा होऊ द्या ही भावना व्यक्त केली या प्रसंगी GPS मित्र परिवार चे सदस्य उपस्थित होते

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी तब्बल चोवीस तासाहून अधिक काळापासून सुरूच आहे. यात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी 31 हजार 800 मते घेत विजयी कोटा पुर्ण केला असून त्यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्याकरिता अजूनही 2 ते अडीच तासांचा कालावधी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, रात्री उशीरा बाद मतपत्रिका बाजूला काढल्यानंतर 31 हजार 576 चा विजयी कोटा अंतिम करण्यात आला. पण पहिल्या पसंतीक्रमात एकही उमेदवाराने हा कोटा गाठला नाही. परिणामी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी करण्यात आली. यावेळी सर्वात कमी मत घेतलेली एक- एक उमेदवार बाद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जळगाव रेल्वेस्थानकाजवळ अंदाजे २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकाजवळील अप रेल्वेमार्गाच्या खांब क्रमांक ४१९/१०२६ लूप ब्रीजसमोर गोरखपूर-पुणे या धावत्या रेल्वेचा २५ वर्षीय अनोळखी तरुणाला धक्का लागला. त्यात हा तरुण जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलिस कर्मचारी सचिन भावसार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी उपस्टेशन प्रबंधकांच्या खबरीवरून जळगाव लोहमार्ग पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गजानन मंदिर परिसरात बंदघर फोडून ३ लाख १८ हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी रविवारी रात्री भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहितीनुसार, नरेश घनश्यामदास रोहडा (वय ३२, रा. गजानन महाराज मंदिर, भुसावळ) हे परिवारासह वास्तव्याला आहेत. खासगी व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २९ रोजी सकाळी १० वाजता ते कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेर पडले. चोरट्यांनी संधी साधत घर फोडून कपाटातील ३ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. तपास पोलिस नाईक एकनाथ पाटील करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून गुरांची चोरी करणारी टोळी निंभोरा पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ११ म्हैशीसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील निंभोरा, फैजपूर, मुक्ताईनगर, रावेर यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड ग्रामीण व मध्यप्रदेशातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हशींची चोरी झाली होती. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी निंभोरा पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. यातील संशयित हे मध्यप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच यातील संशयित तुकाराम रुमालसिंह बारेला (रा. बोरी, जि. बऱ्हाणपूर) हा यावल येथे असल्याची माहिती सपोनि हरिदास बोचरे यांना मिळताच त्यांनी फैजपूरचे सपोनि नीलेश…

Read More

मेष राशी बऱ्याच काळापासून चालत असलेल्या समस्येपासून आराम मिळेल. आज तुमच्या हुशारीचे आणि क्षमतेचे कौतुक होईल. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही उत्साह आणि उर्जेने परिपूर्ण असाल. आज कोणाशीही वैयक्तिक विषयावर चर्चा करणे टाळा. व्यवसायात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची मदत मिळेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ राशी आज दिवसभर धावपळ होईल पण कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. तुम्हाला फक्त तुमचे काम हुशारीने आणि कार्यक्षमतेने करावे लागेल. सध्याच्या काळात तुम्ही बनवलेल्या नवीन धोरणांचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. यावेळी तुम्ही विमा किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणतीही योजना करत असाल तर ते तुमच्यासाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलगा मुलगी एक समान मानून एका मुलीनंतर दुसरे अपत्य होऊ न देता मुलीला वंशाचा दिवा मानून तिलाच मुलासमान वागणूक देणाऱ्या माता पित्यांचा आणि मुलींचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मान करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी महिलांनी घरी जाऊन एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा आणि मुलींचा सत्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या कल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरात प्रतिसाद लाभला यात प्रामुख्याने नागपुर, चंद्रपूर ,धुळे, सांगली…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने अर्थसंकल्पात महिलांना स्वावलंबी करण्यासाठी लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उद्या दि. २ जुलै पासून नारीशक्ती दूत नावाचा ॲप लाउनलोड करावा लागणार आहे. आज सकाळी या संदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सचिवांनी तब्बल पाचशे अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली असून योजना तळागळापर्यंत पोहचविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील महिलांना या योजनेला लाभ घेता यावा यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. एक पीडीएफ पाठविली जाणार असून त्या पीडीएफची पिंट घेवून अंगणवाडी सेविकांकडे जमा करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करतांना नाव, पत्ता, वय, आधारकार्ड नंबर, वडिलांचे नाव, पिनकोड…

Read More