पाचोरा : प्रतिनिधी शेतात वखर चालवतांना जमिनीवरुन दुसऱ्या शेतात गेलेली विजेची वायर तुटल्याने वखरला वायरच्या तारांचा स्पर्श झाल्याने एका १७ वर्षीय तरुणास विजेचा जबर धक्क्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून ही नोंद शून्य क्रमांकाने सोयगाव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील वणगाव येथील प्रमोद विष्णू जंजाळ (वय १७) हा होतकरू तरुण शिक्षणासोबतच वडिलांना शेतीच्या कामात मदत करायचा. २८ जून रोजी सकाळी शेतात वखर चालवायचे असल्याने आई, वडिल व प्रमोद हे शेतात गेले होते. दरम्यान, प्रमोद हा शेतात लोखंडी वखर चालवत असताना त्यांच्या शेतातून शेजारील…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी भिंतीला पडलेल्या भगदाडचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शिरुड येथे एका महिलेच्या घरात शिरून सुमारे ९९ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना २९ रोजी पहाटे उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, शकुंतला दुर्योधन पाटील ह्या सून व दोन नातवांसह शिरुड येथे राहतात त्यांच्या शेजारी राहणारे नरेंद्र राजाराम पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांच्या जुन्या घराची भिंत पाडली आहे. परिणामी त्यांच्या घरालगतच्या शकुंतला पाटील यांच्या राहत्या घराच्या भिंतीला भगदाड पडले होते. त्या ठिकाणी त्यांनी तात्पुरता प्लास्टिकचा कागद लावून विटाही ठेवल्या होत्या. २९ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास झोपेतून उठल्यावर त्यांना घरातील लोखंडी पत्र्याची पेटी जागेवर दिसून आली नाही. भगदाडच्या ठिकाणचा प्लास्टिकचा…
जळगाव : प्रतिनिधी एक अत्यंत प्रतिष्ठित शिक्षक पटेल जहाँआरा अब्दुल मुनाफ यांना त्यांच्या शिक्षणातील उत्कृष्ट योगदान प्रतिष्ठित खानदेशातील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खानदेश स्टार पुरस्कार कमिटीतर्फे पटेल यांची निवड करण्यात आली आहे. पटेल जहाँआरा हे अध्यापनातील उत्कृष्टतेचे, शिक्षणाविषयी खोल उत्कटतेचे, नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी वचनबद्धतेचे एक चमकदार उदाहरण आहे. 25 वर्षांच्या अनुभवाने, त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव पाडला आहे, शिकण्याची आवड निर्माण केली आहे आणि त्यांना शैक्षणिक यश आणि वैयक्तिक वाढीसाठी मार्गदर्शन केले आहे. सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार हा एक प्रतिष्ठित सन्मान आहे जो उत्कृष्टता, सर्जनशीलता आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाचा अथक प्रयत्न करणाऱ्या अपवादात्मक शिक्षकांना मान्यता…
जळगाव : प्रतिनिधी घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेला किरण तुकाराम बारेला (सोलंकी) (२७, रा. दुदखेडा, सेंधवा, जि. बडवाणी, ह. मु. टाकळी प्र.दे., ता. चाळीसगाव) या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पाच महिन्यांपूर्वी अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात घरफोडी केल्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे झालेल्या घरफोडीतील संशयित हा चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार प्रवीण मांडोळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, पोहेकॉ कमलाकर बागुल, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, पोकों ईश्वर पाटील,…
मेष राशी कौटुंबिक जबाबदारीचे ओझे वाढू शकते. नातेवाईकांशी समन्वय ठेवा. वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही जे बोलाल ते विचार करून सांगा. काम पूर्ण होईपर्यंत चर्चा करू नका. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढू शकतो. तुमचा खर्च देखील तुमच्या उत्पन्नाच्या समान प्रमाणात असण्याची शक्यता आहे. कामावर असलेला सहकारी तुमच्यावर खोटा आरोप लावू शकतो आणि तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू शकतो. बेरोजगारांना निराश वाटू शकते. पण त्यांनी निराश होता कामा नये. आपले प्रयत्न चालू ठेवा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. वृषभ राशी वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. अत्यंत प्रतिष्ठित लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. सकारात्मक विचार…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी य़ावेळी सांगितले. यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचे सरकार सर्वसामान्यांचे असून काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, कामगार, महिला, युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्या आहेत. आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला असतांना नुकतेच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक मोठा वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले कि, मनोज जरांगे पाटील हे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात. जरांगे यांच्या मागण्याचा महाराष्ट्र सरकार गंभीर विचार करत आहे. येत्या 10 दिवसात या विषयावर तोडगा निघून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे. मनोज जरांगे यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याचं मी स्वागत केलं आहे. पण काही चिल्लर लोक खडखड करत आहे. मी आजही आपल्या शब्दावर…
जालना : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना नियमित सुरु असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून मुंबईच्या दिशेने राँग साईड येणाऱ्या कारने दुसऱ्या एका कारला भरधाव वेगात धडक दिली. यात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून 7 जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मृताची ओळख पटली नाही. जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील एर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लाखो भाविक अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन करण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी करीत असतात, याच भाविकांसाठी खुशखबर आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील अमरनाथच्या पवित्र गुहेत बाबा बर्फानी यांचे दर्शन शनिवारपासून दि.२९ जून सुरू झाले आहे. बालटाल आणि पहलगाम कॅम्पमधून यात्रेकरूंचा पहिला जत्था पहाटे अमरनाथ गुहेकडे रवाना झाला आहे. एकूण 4,603 यात्रेकरू आज शिवलिंगाच्या दर्शनासाठी चढणार आहेत. अनंतनागमधील पारंपारिक नुनवान-पहलगाम मार्गे आणि गंदरबलमधील बालटाल मार्गाने २९ जून रोजी सुरू झालेली अमरनाथ यात्रा ५२ दिवस चालणार आहे. 19 ऑगस्ट रोजी संपणार आहे. यावर्षी अमरनाथ यात्रेसाठी 3.50 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. 26 जूनपासून ऑफलाइन नोंदणी सुरू…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी कारवाई करत बुधवारी २६ जून रोजी रात्री ९ वाजता गेंदालाल मिल भागातील भिमा कोरेगाव चौकातून अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवारी २७ जून रोजी पहाटे ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (वय-२१), रा. गेंदालाल मिल, जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातून २ वर्षांसाठी हद्दपार असलेला गुन्हेगार महेश लिंगायत हा गेंदालाल मिल परिसरातील भिमा कोरेगाव चौकात येवून हातात कोयता घेवून फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…

