Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नाचा पहिला वाढदिवस, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय
    क्राईम

    लग्नाचा पहिला वाढदिवस, तरुणाने घेतला टोकाचा निर्णय

    editor deskBy editor deskMay 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    लग्नाचा पहिला वाढदिवस आणि तसे मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवून सकाळी आनंदात असलेल्या कुणाल प्रकाश सूर्यवंशी (२९, रा. दातर्ती, ता. साक्री, जि. धुळे ह. मु. स्वामी समर्थ कॉलनी, द्वारका नगर परिसर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवार, १२ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, कुणाल सूर्यवंशी हा तरुण स्वामी समर्थ कॉलनी येथे आई, वडील, पत्नी आणि तीन महिन्यांच्या मुलीसह राहत होता. तो सिव्हिल इंजिनिअर असून एका सिमेंटच्या कंपनीत तो मार्केटिंग करायचा. १२ मे रोजी त्याच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे त्याने मोबाइलमध्ये व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवले होते. सकाळी कुटुंबीयांसह अनेकांना तो भेटला तेव्हा आनंदी होता. दुपारी त्याने राहत्या घरी झोक्याच्या दोरीलाच गळफास घेतला. पत्नी त्याला बोलवण्यासाठी गेली त्यावेळी तिला पतीने गळफास घेतल्याचे दिसले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गर्दी पाहून थांबला अन् वडिलांचाच अपघात दिसला

    April 28, 2026

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.