Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दुचाकीच्या चोरीच्या घटना सातत्याने घडत असताना नुकतेच नशिराबाद पोलिसांनी चोरीच्या सात दुचाकींसह अट्टल चोरट्याला अटक केली आहे. शाहबाज शेख अब्दुल रहेमान (24, नशिराबाद) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने नशिराबाद, जळगावच्या रामानंद, शनीपेठ तसेच जिल्ह्यातील अन्य तीन ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. नशिराबाद येथील प्रणव पाटील यांची दुचाकी चोरीला गेल्यानंतर तपासादरम्यान संशयीताची माहिती मिळताच त्यास अटक करण्यात आली. यांनी केली कारवाई ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनूस शेख, हवालदार शिवदास चौधरी, हवालदार राजेंद्र ठाकरे, कॉन्स्टेबल भरत बाविस्कर, कॉन्स्टेबल पंकज सोनवणे, कॉन्स्टेबर सागर बीडे, कॉन्स्टेबल प्रवीण लोहार, चालक…

Read More

मुंबई : प्रतिनिधी एप्रिल २०२४ मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी आ.एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद सभागृहात केली. यावेळी ते म्हणाले एप्रिल २०२४ मध्ये मुक्ताईनगर, बोदवड, यावल, रावेर व इतर तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामुळे हजारो हेक्टरवरील केळी, गहू, मका, कांदा, ज्वारी व इतर पिके भुईसपाट होऊन शेतकरी बांधवांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाऊन शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसुल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले आहेत का व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक भागात गुन्हेगारी घटना घडत असून याचे कारण नेहमीच प्रेम प्रकरण येत असते अशीच एक थरारक घटना बिहार राज्यातील पाटणा जिल्ह्यात घडली आहे. लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराचे डॉक्टर महिलेने गुप्तांग कापून टॉयलेटमध्ये फेकल्याची भयंकर घटना बिहारच्या सारण जिल्ह्यात घडली आहे. जखमी प्रियकरावर पाटणा स्थित रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी महिला डॉक्टर माधोरा येथे नर्सिमंग होम चालवते. तर पीडित तरुण त्या प्रभागाचा नगरसेवक आहे. दोघांत गत 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी नोंदणीकृत विवाह करण्याचा प्रयत्न केला होता. पण ऐनवेळी तरुण लग्नाला आलाच नाही. यामुळे संतापलेल्या महिलेने तरुणाला घरी बोलावून धारदार चाकूने त्याचे गुप्तांग कापले.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था दि.१ जुलै रोजी राज्यातील दूध दर प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती. यात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघांचा प्रतिनिधी तसेच दूध दर समिती सदस्य आमदार मंगेश चव्हाण यांनी गायीच्या दुधाला किमान ३० रुपये दर द्यावा तसेच ५ रुपये प्रति लिटर अनुदान तात्काळ लागू करावे तसेच दुध भुकटी निर्यातीला अनुदान द्यावे आदी दूध उत्पादकांच्या संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या. आमदार मंगेश चव्हाण यांच्या मागणीला यश मिळाले असून आज विधानसभेमध्ये राज्याचे दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सर्व शासकीय व खाजगी दूध संघांना गायीच्या दुधाला किमान ३०…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोले बाबाच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२२ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास फुलरई गावात हा प्रकार घडला. अपघातानंतर रुग्णालयातील परिस्थिती भयावह बनली. मृतदेह आणि जखमींना बस-टेम्पोमध्ये भरून सिकंदरौ सीएचसी, एटा जिल्हा रुग्णालय आणि अलीगढ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. सिकंदरौ सीएचसीच्या बाहेर जमिनीवर 95 मृतदेह पडले होते. रात्रभर पोस्टमॉर्टेम झाले. 27 मृतदेह एटा जिल्हा रुग्णालयात पोहोचले. एकूण 122 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर बाबा भूमिगत झाले असून रात्रभर पोलिसांनी छापा टाकला. पोलिस मैनपुरीतील बाबाच्या आश्रमात पोहोचले. पण बाबा तिथे सापडले नाहीत. 22 आयोजकांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यात बाबाचे नाव…

Read More

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरच्या दिशेने वेगाने निघालेल्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील डाळज नं. ३ गावच्या हद्दीत मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. सर्व मृत हे तेलंगण राज्यातील आहेत. या घटनेची भिगवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रफिक कुरेशी (३४), इरफान पटेल (२४), मेहबूब कुरेशी (२४), फिरोज कुरेशी (२८), फिरोज कुरेशी (२७, सर्व रा. नारायणखेड, जि. मेडक, तेलंगण) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत. तर सय्यद इस्माईल अमीर (२३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर भिगवणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील टेहू शिवारात असलेल्या वाकड्या पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या टेहू शिवारातील वाकड्या पुलाच्या जवळ सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास श्याम संभाजी पाटील (वय २८, टेहू, ता. पारोळा) हा तरुण दुचाकीने (एमएच१९/एझेड३६७६) येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरील एमएच२०/सीएल४६४०) चालक विनोद विठ्ठल महाले (पारोळा) याने जोरदार धडक दिली. त्यात श्याम संभाजी पाटील याचा जागीच मृत्यू झाला. विनोद महाले व समाधान कैलास अहिरे हे दोघे जखमी झाले. त्यांना लगेच…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास लोखंडी रॉडने जबर मारहाण करून दोघांना लुटल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील सुरेंद्र यादव व लक्ष्मण शिंदे हे दोघे मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पिंप्री येथील मित्राला सोडून जळगावला आपल्या कारने परत जात होते. यावेळी त्यांच्या कारचा अपघात झाला. गाडीतील सामान चोरीला जाऊ नये, म्हणून दोघांनी मुसळी फाट्याजवळ कारमध्येच झोपण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री दीड-दोन वाजेच्या सुमारास दोन अज्ञात चोरटे आले व त्यांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. यादव यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, मोबाइल, लॅपटॉप आदी ऐवज जबरीने लुटून पळ काढला. याप्रकरणी धरणगाव पोलिसांत दोन…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशानुसार तयार करण्यात आलेल्या शेतरस्त्यातून ये-जा करण्यास मज्जाव करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी निसर्डी येथील एकावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहितीनुसार,  निसर्डी येथील विनोद हिंमतराव पाटील (ह. मु, शंकरनगर, अमळनेर) यांचे निसर्डीला शेत आहे. त्यांच्या शेताला लागून चुनीलाल गंगाराम पाटील यांचेही शेत आहे. चुनीलाल यांच्या शेतातून विनोद पाटील यांना ये जा करावी लागते. या कारणास्तव चुनीलाल हे नेहमी त्यांच्याशी वाद करत. त्यामुळे शेती करण्यासाठी हिंमतराव पाटील यांनी न्यायालयात दाद मागितली. त्यानुसार त्यांना न्यायालयाने वहिवाट करण्यास परवानगी दिली. त्यांनी स्वखर्चाने नऊ फुटांचा रस्ता तयार केला. २८ जून रोजी सकाळी ८ वाजता विनोद पाटील व…

Read More

मेष राशी आज तुम्ही कठीण कामे सहजपणे पूर्ण करण्यास सक्षम व्हाल, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. फार पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. व्यर्थ गोष्टींवर चर्चा करू नका. तुमचा अनमोल वेळ वाया जाईल. तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. फिटनेसकडे अधिक लक्ष द्या. तुमच्या कुंडलीत काही बदल होणार आहेत. आज मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. पण ही संधी सोडू नका. अधिक विचार करू नका. वृषभ राशी आज तुमचं सर्व काही व्यवस्थित चालेल. तुमच्या आयुष्यातील खासगी गोष्टी कुणालाही सांगू नका, नाही तर अनर्थ ओढवेल. प्रत्येकजण तुमच्यावर खुश नाहीये. काही लोक तुमचा गैरफायदा घेऊ इच्छितात. त्यामुळे इतरांवर अधिक विश्वास ठेवू नका. तुमच्या आजच्या योजना…

Read More