मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात नेहमी पुणे शहराचे मनसेचे माजी नेते वसंत मोरे हे आपल्या आंदोलनामुळे राज्यभर प्रसिद्ध आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचितची उमेदवारी घेतली मात्र त्यांना उमेदवारांनी नाकारल्यानंतर आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून येत्या ९ जुलै रोजी ते हाती शिवबंधन बांधणार आहेत. मनसेच्या स्थापनेपासून वसंत मोरे राज ठाकरे यांच्यासोबत होते. पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. आज त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ९ जुलैला…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रात झिका विषाणूची प्रकरणे आढळल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला. आरोग्य गर्भवती महिलांची तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आढळणार्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. पुण्यात झिका विषाणूचे सहा रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्रात झिका विषाणूची प्रकरणे आढळल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्यांना एक सल्लागार जारी केला. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना गर्भवती महिलांची संसर्गासाठी तपासणी करून आणि झिका पॉझिटिव्ह आढळणार्या गर्भवती मातांच्या गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवून सतत देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. 2 जुलैपर्यंत पुणे, महाराष्ट्रामध्ये झिका विषाणूचे सहा रुग्ण आढळले आहेत. केंद्राने जारी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात सार्वजनिक ठिकाणी चिलीममधून गांजा ओढणाऱ्यांवर दि. २ जून रोजी कारवाई केली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस दलाकडून सार्वजनिक ठिकाणी अमली पदाथांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई बडगा उगारण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील दत्त डेअरीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत व हॉटेल देव हाईट्सच्या मोकळ्या जागेमध्ये काही इसम गांजा ओढीत होते, त्यांच्यावर शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी प्रभाकर मंगेश पाटील (वय ४८, रा. कांचननगर), अजय सुरेश सोनवणे (वय २५, रा. लक्ष्मीनगर, लाकूडपेठ), अझर कुदबोद्दीन शेख (वय २७, रा. शाहूनगर) व…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २२ जून रोजी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी २ जुलै रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दि. २२ जून रोजी रात्री १० वाजता पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी मंगळवारी…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास शासन निर्णय अन्वये मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेबाबत काही निकषांमध्ये बदल करण्यात आले असून त्या बाबतचा सुधारित शासन निर्णय शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाने जरी केला आहे. त्यनुसार जळगाव जिल्ह्याच्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे असणार आहे. तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काम पाहतील. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील तालुकास्तरीय…
जळगाव : प्रतिनिधी क्रिकेट खेळत असतांना झालेल्या वादातून मुशरफ खान सईद खान (वय १७, रा. मास्टर कॉलनी) याला काका पुतण्याने बेदम मारहाण केली. ही घटना दि. १ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मास्टर कॉलनीत मुशरफ खान सईद खान (वय १७) हा मुलगा वास्तव्यास आहे. दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता काही मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. त्यावेळी त्याचा तौफीक खान याच्यासोबत वाद झाला. त्यामुळे तौफीकचे वडील तौसिफ खान व जावेद खान सर्व रा. मास्टर कॉलनी, जळगाव या तिघांनी मुशरफ खान सईद खान या मुलाला बेदम…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील रसलपूर येथील दोन गटांमध्ये २० ते २५ वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या वादाचा सोमवारी पुन्हा भडका उडाला. यावेळी दोघांना जबर मारहाण करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एका गटातर्फे मोटारसायकलला कट मारल्यानंतर रसलपूर ग्रामपंचायतसमोरील रस्त्यावर पुन्हा मोटारसायकल अडवून दमबाजी करीत दोन्ही चुलतभावांना मोटारसायकलच्या खाली ओढून दहाजणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर दुसऱ्या चुलतभावाला लोखंडी पाइपने पायावर व कानावर मारहाण करून गंभीर जखमी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना १ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. परवेझ खान अय्युब खान याने मोटारसायकलचा जबर कट मारल्याने शरीफ खान हा जखमी झाला, पायाला दुखापत झाल्याने शरीफ खान याने त्याचा चुलत भाऊ…
मेष राशी विवाहासाठी पात्र लोकांना आज चांगली बातमी मिळेल. दूरच्या देशातून आलेल्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कार्यक्षेत्रात प्रिय व्यक्तीबद्दल विशेष आकर्षणाची भावना निर्माण होईल. कुटुंबात काही शुभकार्यक्रम घडतील. घरगुती जीवनात पती-पत्नीमध्ये आनंद आणि सौहार्द राहील. वृषभ राशी तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल. प्रेमप्रकरणातील अंतर कमी होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. उपासनेची आवड निर्माण होईल. तुला छान झोप येईल. गाणी आणि संगीत मनोरंजनाचा आनंद मिळेल. शुभवार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधांमध्ये पैसे आणि भेटवस्तू मिळतील. मिथुन राशी कुटुंबातील सदस्यांच्या वागण्याने तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. प्रेमप्रकरणात जास्त भावनिकता हानिकारक ठरेल. मुलांच्या आनंदात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना जोरदार सुरु असल्याने प्रत्येक शहरातील महिलांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली असतांना आता पुन्हा एकदा निर्णय बदलला आहे. ‘मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजने’त नाव नोंदणी करण्यासाठी राज्यातील सेतू केंद्र चालकांना ५० रूपये राज्य सरकार देणार आहे. त्यामुळे त्यांनी लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.३) विधान परिषदेत बोलताना दिला. या योजनेसाठी लाभार्थ्यांचे रेशन कार्ड असेल, तर त्यांना डोमिसाईलची गरज नाही. योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल,…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जी.पी.एस.मित्र परिवारातर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जात असतात, नुकतेच दि.२ जुलै रोजी सकाळी पाळधी येथील दोन्ही बायपास येथे गोकुलनाथ या जातीचे रुक्ष लावण्यात आले हे वृक्ष साधारण 12 फूट उंचीची असून त्याची देखभाल सुद्धा मित्र परिवार तर्फे करण्यात येणार आहे. या वृक्ष रोपण साठी साई मंदिर संस्थानचे सुनील झंवर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून या प्रसंगी जि प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या सह GPS मित्र परिवार चे सर्व सदस्य उपस्थित होते,,सदर उपक्रमाचे सर्वदुर कौतुक होत आहे

