जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शहापूर येथील विधवा महिलेच्या डोक्यात दगड टाकून तरुणाने खून केल्याची घटना आज दि.१ जुलै २०२४ रोजी घडली. मयत संगीता पिराजी शिंदे ( वय ३६ ) आरोपी किरण कोळी तळेगांव (वय २६) मद्यधुंद अवस्थेत तरुणाने ३६ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना सकाळी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तळेगाव येथील आरोपी किरण कोळी उर्फ लाहण्या (वय २६) या तरुणाने महिलेच्या घरी जाऊन सतत महिलेसोबत वाद घालत असायचा तसेच आज सकाळी महिलेसोबत वाद घालून रागाच्या भरात तरुणाने महिलेच्या डोक्यात दगड टाकून महिलेला ठार करून तिथून पळून गेला. घराजवळील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्वरित जामनेर…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून सोमवारी देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३० रुपयांनी कमी झाल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजपासून १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर ३० रुपयांनी स्वस्त झाला आहे. मुंबईत आता ३० रुपयांनी किंमत कमी होऊन १५९८ तर दिल्लीत १६४६ रुपये झाली आहे. यापूर्वी दिल्लीत १६७६ रुपयांना मिळत होता. कोलकातामध्ये १७५६ रुपयांना मिळणार आहे, आधी त्याची किंमत १७८७ रुपये होती. बदललेले दर आज १ जुलै पासून लागू होणार आहेत.
यवतमाळ : वृत्तसंस्था यवतमाळ जिल्ह्यात १ जुलै सोमवारी रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघातामध्ये पंजाबमधील एका कुटुंबाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे यवतमाळ -नागपूर महामार्गावरील चापरडा गावाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेली माहितीनुसार, यवतमाळ-नागपूर महामार्गावर एका इनोव्हा गाडीतून हे शीख कुटुंब प्रवास करत होते. हे सर्वजण पंजाबवरुन आले होते. ते नांदेड येथील गुरुद्वारामध्ये चालले होते. त्यांची इनोव्हा कार चारपडा गावाजवळ असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त विधान केल्याने नेहमीच चर्चेत येत असतात त्यांनी पुन्हा एकदा पुण्यात एक वादग्रस्त विधान केल्याने या विधानानंतर पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. आपल्याला १५ ऑगस्ट रोजी जे स्वातंत्र्य मिळाले ते दळभद्र आणि हांडग स्वातंत्र्य आहे. आपल्याला ते जमत नसून स्वतंत्र हिंदवी स्वातंत्र्य पाहिजे, अशी वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये आणि ड्रेस घातलेल्या बायकांनीदेखील जाऊ नये, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी रविवारी पुण्यात केले. संभाजी भिडे हे पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी जंगली महाराज रस्त्यावर वारकऱ्यांसोबत संवाद साधताना पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले. दरम्यान, पुणे पोलिसांनी संभाजी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील दीनदयाळ नगर भागामध्ये लोखंडी तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी दीड वाजता अटक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील कान्हाळा रोड हेमंत जगदीश पैठणकर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील नगर परिसरामध्ये संशयित आरोपी हेमंत पैठणकर हा हातामध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठचे पोलिस निरीक्षक गजानन पडघम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, शुक्रवारी हेमंत पैठणकर यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पो.कॉ. प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास…
जळगाव : प्रतिनिधी आमदार एकनाथ खडसे हेच भाजप प्रवेशाबाबतच्या घोषणा करत आहेत. आधी म्हटले की निवडणुकीच्या आधी येणार, त्यानंतर म्हटले की लोकसभेच्या निवडणुकीनंतर येणार, मात्र अजूनही त्यांचा प्रवेश झालेला नाही. भाजप प्रवेशासाठी खडसेंकडून ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. रविवारी जळगाव विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, एकनाथ खडसे हे एकीकडे म्हणताहेत की मी भाजपमध्ये येतोय, दुसरीकडे भाजपवरच टीका करायची ही त्यांची दुहेरी भूमिका दिसून येत आहे. भाजपमध्ये येण्यासाठी जर नेत्यांनी संमती दिली आहे, तर मग ‘मुहूर्त काढायचा का…?’ असाही प्रश्न गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. राज्य…
पारोळा : प्रतिनिधी चार दिवसांपूर्वी जेलमधून सुटून आलेल्या एकावर बंदूक रोखत त्याच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी करत मारहाण करणाऱ्या चार संशयितांना परिसरातील नागरिकांनी चोप दिला. यातील दोन जणांना अटक झाली असून इतर दोन पसार झाले. पारोळा येथे शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील ऊर्फ सल्ल्या लक्ष्मण पाटील (३६), ज्ञानेश्वर ऊर्फ अमोल वसंत पाटील (४०) आणि किरण प्रकाश पाटील (३५, सर्व रा. पारोळा) अशी आरोपींची नावे आहेत. चौथ्याचे नाव समजू शकले नाही. यातील सुनील व किरण यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. फिर्यादीवर बंदूक व काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तो चार दिवसांपूर्वीच जेलमधून बाहेर…
मेष तुमच्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा, कुटुंबात अनावश्यक वाद होऊ शकतात. कुटुंबातील सदस्याच्या मदतीने व्यवसायातील अडथळे दूर होतील. बचतीत वाढ होईल. महत्त्वाच्या व्यक्तीशी जवळीक वाढेल. कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होतील. राजकारणात तुमच्या नेतृत्वाचे कौतुक होईल. दूरच्या देशातील एखाद्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला चांगला संदेश मिळेल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या लोकांना काही नवीन जबाबदारी मिळेल. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावाल. वृषभ आज आपल्या महत्त्वाकांक्षेवर नियंत्रण ठेवा. काही पर्यटन स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या उच्च भूमिकेत काही संघर्ष केल्यानंतर लाभाची चिन्हे मिळतील. कुटुंबातील सदस्यासोबत काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. व्यवसायात नवीन सहकारी लाभदायक ठरतील.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच आज मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पर्यावरण आणि वृक्षारोपणाच्या संदर्भानं देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. आई आणि मुलांचं नातं हे जगातील सर्वात मौल्यावान नाते आहे. आपण आपल्या आईसाठी काही देऊ शकत नाही. पण आपण आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे असं आवाहन पंतप्राधन नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून केलं. 30 जूनचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपले आदिवासी बांधव हा दिवस ‘हुल दिवस’ म्हणून साजरा करतात. हा दिवस परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचारांना कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो-कान्हूंच्या…
मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील लाखो भाविक पंढरपूर येथे नेहमीच दर्शनासाठी येत असतात याच भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सर्व विठ्ठल भक्तांसाठी मंदिर समितीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. यासाठी मंदिर समितीकडून हॉटेल ताब्यात घेण्यात आले आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर मंदिर समितीने आता हे हॉटेल स्वतःकडे चालवायला घेतले आहे. विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सर्वात चांगली सुविधा देण्यासाठी मंदिर समितीने उभारलेले विविध भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी भाविकांचा ओढा असतो. या विविध भक्तनिवासांमध्ये असलेल्या 364 रुममध्ये जवळपास रोज 1500 भाविकांच्या निवासाची सोय होऊ शकते. यामध्ये भाविकांना…

