Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कारची दुचाकीला जबर धडक : गर्भवती महिला जागीच ठार
    क्राईम

    कारची दुचाकीला जबर धडक : गर्भवती महिला जागीच ठार

    editor deskBy editor deskMay 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दीपाली योगेश कोळी (२२, रा. जुना असोदा रोड, जळगाव) ही आठ महिन्यांची गर्भवती महिला जागीच ठार झाली. तर तिचे पती व तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ घडली. मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाने झडप घातल्याने एकाच वेळी दोन जीव गेले, तर तीन वर्षीय मुलीचे मातृछत्र हरपले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, जुना असोदा रोड परिसरात योगेश गुलाब कोळी (२८) हे खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहेत. ते पत्नी दीपाली व तीन वर्षांची मुलगी काव्या हिला घेऊन निमगव्हाण येथे नातेवाइकांकडे भेटण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १९, सीएफ ९७९७ वराड गावाजवळ दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती योगेश व मुलगी काव्या हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात महिला जागीच ठार झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मातृदिनीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात : २५ जणांवर गुन्हा दाखल !

    April 28, 2026

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026

    राजकारणातली पातळी घसरली? वडेट्टीवारांच्या टीकेवर रवी राणांचा संताप; नवनीत राणांवरून वाद पेटला

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.