Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी खाद्यपदार्थाची गाडी लावण्यावरून जोरदार वाद होऊन विनोद रामा रायपुरे (२३, रा. सिद्धिविनायकनगर) व त्याचा भाऊ महेंद्र रायपुरे या दोघा भावांना पाच जणांनी मारहाण केली.लोखंडी वस्तू डोक्यात मारल्याने तरुणाचे डोके फुटले आहे. ही घटना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) वसतिगृहाच्या भिंतीजवळ शनिवारी (१३ जुलै) घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, आयटीआय वसतिगृहाच्या भिंतीजवळ खाद्यपदार्थाच्या गाड्या लावून अनेक जण व्यवसाय करतात. १३ जुलै रोजी विनोद रायपुरे व त्याचा भाऊ महेंद्र रायपुरे गाडी लावत होते त्यावेळी विजय मनबहादूर गुरखा (रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी), संभा बारी (२८, समतानगर) यांच्यासह गोपाल,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी उघड्या घरातून दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या कृष्णा पांडुरंग सोनवणे (वय २८, रा. शिवाजीनगर हुडको) याला शहर पोलिसांनी रविवारी (दि. १४) मुद्देमालासह अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शिवाजीनगर हुडको भागातील आनंदपाल बाविस्कर हे ११ जुलै रोजी पहाटे फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांचा पुतण्या घरात झोपलेला असल्यामुळे घराचा दरवाजा उघडाच होता. याचा फायदा घेत चोरट्याने दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही चोरी कृष्णा सोनवणे याने केली असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सुधीर साळवे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक अनिल भवारी, सहायक फौजदार सुनील पाटील, पोहेकों…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने जात असताना दुचाकी दुभाजकावर धडकल्याने मयूर नरेंद्र पाटील (२४ , रा. विठ्ठलवाडी) हे ठार झाले. अपघात शनिवारी (१३ जुलै) रात्री १२ वाजेच्या सुमारास न्यू, बी. जे. मार्केट समोर झाला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, खोटेनगर थांब्याजवळ मयूरच्या वडिलांचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज असून मयूर त्यांना मदत करायचे. शनिवार रात्री दुचाकीने ते बेंडाळे चौकातून पांडे चौकाकडे जात होते. यावेळी त्यांची दुचाकी न्यू, बी. जे. मार्केट समोरील दुभाजकावर धडकली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. रविवारी सकाळी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलवरून जेवण करून घरी परतत असताना कारचा ताबा सुटून ती थेट झाडावर धडकल्याने आनंद शांताराम सोनवणे (वय ३९, रा. कासमवाडी) हे ठार झाले. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. हा अपघात रविवारी (१४ जुलै) दुपारी ४:१५ वाजता जळगाव ते शिरसोली रस्त्यावरून मोहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाला. सविस्तर वृत्त असे कि, सामाजिक कार्यकर्ते असलेले आनंद सोनवणे हे रविवारी दुपारी त्यांचे मित्र भैरव उर्फ मुन्ना भगवान राणे (वय ३३), प्रवीण उर्फ पप्पू आढाव (वय ३५), योगेश भालचंद्र रेंभोटकर (वय ५५, सर्व…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी बीएसएनएल कार्यालयाच्या मागील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी बॅटरी केबल व इतर साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी रात्री घडली. यात एकास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सलमान शेरू पिंजारी (२१, रा. कुर्बान नगर, पाचोरा, ह.मु, जळगाव) यास अटक करण्यात आली. दुसरा पसार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा रोडवरील बीएसएनएल कार्यालयाच्या मागील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला यात अज्ञात चोरट्यांनी दहा हजार रुपये किमतीची बॅटरी, दोन हजार रुपये किमतीचे ट्रान्सफॉर्मर, तीन हजार रुपये किमतीची तांब्याची तार असा पंधरा हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. वॉचमन शरद पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला…

Read More

मेष मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांची आज समाजात वेगळी प्रतिमा तयार होणार आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल. तुम्ही सिंगल असाल तर आज कुणी तरी तुमच्याशी संपर्क साधेल. या व्यक्तीबाबत तुम्ही रोमांटिक व्हाल. नोकरी करणाऱ्यांना आज लाभ होईल. तसेच नोकरीच्या ठिकाणी नव्या संधी मिळातील. कुटुंबात चाललेला वाद बुजुर्गांच्या मदताने दूर होईल. वृषभ फावल्या वेळेचा सदुपयोग कराल. जे लोक गेल्या काही काळापासून आर्थिक संकट सहन करत आहेत. त्यांना अचानक धनलाभ होईल. त्यामुळे आयुष्यातील मोठ्या समस्या दूर होतील. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवा उद्योग टाकताना विचार करूनच निर्णय घ्या. पावसामुळे एखादं रखडलेलं…

Read More

इगतपुरी : वृत्तसंस्था नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भीषण अपघात घडला आहे. यामध्ये १३ ते १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवार (दि.१४) घडली असून कसारा घाटातील ब्रेकफेल पाँईट जवळ एका कंटेनरने सहा ते सात गाड्यांना भीषण धडक दिली. या धडकेत चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अपघातात १३ ते १४ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावर महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका रवाना झाली असून आज रविवार (दि.१४) वीकेंडमुळे कसारा घाटामध्ये वाहनांची गर्दी झालेली दिसत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातून गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच जळगाव शहर पोलीस स्थानकातील गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दुचाकींची चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी बाजारपेठ असल्याने याठिकाणी जिलह्यातील नागरिक खरेदीसाठ येत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हीच संधी साधत चोरट्यांनी शहरातील मार्केट परिसरातून दुचाकी चोरीचा धडाकाच लावला होता. हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक संदीप…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच विधान परिषदेची निवडणूक झाली असून यात महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप महायुतीवर केल्यावर त्याला आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी देखील प्रत्युत्तर देत राऊतांवर हल्लाबोल केला. काय म्हणाले संजय शिरसाट? संजय राऊत हा व्यक्ती पागल झालेला आहे. त्यांच्या विधानाला तुम्ही एवढे महत्त्व देण्याची मुळीच गरज नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असल्याने ते असे बेछूट आरोप करत आहेत. मुळात विधान परिषदेचा सदस्य होण्यासाठी कोणी 25-25 कोटी रुपये कोणी देईल का, असे जर झाले असते तर सदस्य होण्यासाठी एकाद्या आमदाराला सुमारे 200 ते 300 कोटी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दाणा बाजार परिसरात पीयूष प्रकाश बियाणी (३७, रा.नवीपेठ) यांचे प्रकाश भगवानदास बियाणी नावाचे दुकान आहे. १० जुलै रोजी आठ वाजता ते दुकान बंद करून गेले होते. त्यानंतर रात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकविले व आत प्रवेश करत गल्ल्यातून तीन हजार ५०० रुपये चोरून नेले. पीयूष बियाणी यांनी शुक्रवारी (१२ जुलै) शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएस कलम ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तपास पोहेकों गजानन बडगुजर करीत आहेत. दाणा बाजारात चोरीच्या घटना वाढल्याने व्यापारी वर्गात भीती पसरली आहे. चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी दाणा बाजार परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी व…

Read More