Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी दीड महिन्यापूर्वी नाशिक येथून दुचाकी चोरून जळगावात फिरवणाऱ्या कुणाल ललित तिवारी (१९, रा. लक्ष्मण भाऊ नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (१६ जुलै) पहाटे अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करत त्याला नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील यांचे पथक तयार केले. त्यात नाशिक येथून जळगावातील एकाने दुचाकी (क्र. एमएच १५, एचके २९६५) चोरल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने मंगळवारी पहाटे पेट्रोलिंग दरम्यान…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतात कामाला जात असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अलका विजय कोळी (३६, रा. श्रीराम चौक, असोदा रोड) या ठार झाल्या. ही घटना मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ८:३० वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अलका कोळी या पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. त्यांचे पती विजय कोळी हे महावितरणमध्ये वायरमन आहेत, तर त्या शेतमजुरी करायच्या, मंगळवारी १६ जुलै रोजी सकाळी इतर महिलांसोबत त्या शेतात जात असताना आसोदा रेल्वे गेटजवळ रेल्वेरूळ ओलांडताना अचानक धावत्या रेल्वेचा त्यांना धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Read More

जळगाव : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील एका धार्मिक संस्थानचे बनावट फेसबुक खाते तयार करून देवी-देवतांसह संस्थान पदाधिकाऱ्याचे छायाचित्र व अन्य आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ७ ते १५ जुलैदरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात खाते वापरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यात असलेल्या या धार्मिक संस्थानच्या नावाने एका जणाने बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यावर देवी-देवतांचे छायाचित्र अपलोड केले. तसेच फोटो स्टोरीमध्ये संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरले. त्यानंतर या खात्यावर आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करण्यात आली. यातून त्या संस्थानची व पदाधिकाऱ्यांची बदनामी झाली. या प्रकरणी संस्थानच्या पुजाऱ्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सुभाषवाडी येथील बद्रीसिंग पुना चव्हाण (५८) यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (१६ जुलै) सकाळी बाहेर खेळत असलेला नातू घरात पाणी पिण्यासाठी गेला, त्यावेळी ही घटना समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, बद्रीसिंग चव्हाण हे पत्नी, दोन मुले आणि सुना यांच्यासोबत राहत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी, दोन्ही मुले व सुना शेतात गेले होते. नातू आणि बद्रीसिंग चव्हाण हे घरी होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी घरात गळफास घेतला. नातू घरात आला, तेव्हा घटना उघडकीस आली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत…

Read More

मेष आज तुमची मनोकामना पूर्ण होईल. एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीचं मार्गदर्शन मिळेल. त्याचं सानिध्य मिळेल. त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. व्यापारात उन्नती होईल. नोकरीत मन लावून आणि प्रामाणिकपणे काम करण्याच्या तुमच्या गुणाची तारीफ होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर प्रभावीत होतील. एखाद्या जुन्या प्रकरणाचा तुमच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. व्यापारी असाल तर जीभेवर नियंत्रण ठेवा. मोठं नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खास आहे. वृषभ आज राग आणि जीभेवर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात कुणाशी तरी अकारण वाद होऊ शकतो. उद्योगात वारंवार निर्णय बदलू नका. त्यामुळे स्थैर्य जाते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी भटकंती करावी लागणार आहे. धर्मकार्यात भाग घ्याल. मित्रांकडून धोका होण्याची शक्यता आहे. उधारी देऊ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था एकीकडे चाळीसगाव तालुक्यात महाविकास आघाडीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार कोण असेल याचे राष्ट्रवादी शरद पवार गट व उबाठा गट यात सोशल मिडीयावर शीतयुद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांचा एकामागे एक विकास कामांचा झंझावात सुरु असतानाच महाविकास आघाडीला धक्के देणे सुरु ठेवले आहे. बोढरे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ कार्यकर्ते तसेच बंजारा समाजाचे जेष्ठ नेते श्री.रामदास रायसिंग जाधव यांनी आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबई येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. तालुकाभरात रामदासभाऊ म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याने नेहमीच विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये आघाडी घेतली असून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ ही तर जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ असून आता पर्यंत दीड लाख नोंदी झाल्या आहेत. सदर योजना यशस्वीतेसाठी आपण प्रत्येक तालुकास्तरावर याचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सुमारे सहा – सात लाख पात्र भगिनींना राखी पौर्णिमेला ओवाळणी मिळेल असा प्रयत्न करण्याचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांच्या या महत्वाकांक्षी योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर राबवा असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तर या योजनेच्या नोंदणीसाठी शहरात वॉर्डनिहाय नियोजन करण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकीच्या सुरुवातीला या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील एकाचे बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण २ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा येथील रहिवासी सौभाग्य चित्तरंजन सेनापती (वय-२८) हा तरुण आपल्या पत्नीसह वास्तव्यास असून दि.२ जुलै ते ६ जुलैच्या कालावधीमध्ये त्यांचे घर बंद असताना चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच लोक रक्कम असा एकूण २ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भाविक आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जात असतांना नुकतेच मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीतून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या खासगी बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ४२ जण जखमी झाले. सोमवारी मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर पनवेल येथील एमजीएम आणि उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हौसाबाई पाटील रा. घेसर, गुरुनाथ महाराज पाटील रा. नारिवली, रामदास नारायण मुकादम रा. नावाळी, अशी मृत वारकऱ्यांची नावे आहेत. अपघातानंतर मुंबई एक्स्प्रेस हायवेची मुंबई-लोणावळा लेन तीन तास बंद होती. क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आल्यानंतर पुन्हा वाहनांची वाहतूक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेततळ्यांचे काम मिळवून देण्यासाठी ४५ लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा आरोप करणारे कंत्राटदार अजय भागवत बढे यांना सोमवारी (१५ जुलै) तापी महामंडळाचे सेवानिवृत्त अभियंता तथा माजी विभागीय माहिती आयुक्त व्ही.डी.पाटील यांच्या नावाने धमकावण्यात आले. सविस्तर वृत्त असे कि, या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या पंकज वासुदेव नेमाडेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी सकाळी बढे यांच्या मोबाईलवर ‘व्ही.डी. पाटील यांना चांगले ओळखतात, तुम्ही जे केले त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील’ अशी धमकी दिली. नंतर नेमाडे याने तो मेसेज डिलिट करून टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Read More