Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी महिलेचा विनयभंग करत तिला शिवीगाळ करण्यासह जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १२ जुलै रोजी घडला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश गंगाधर सपकाळे (३५) हा अश्लील हावभाव करत वीट घेऊन महिलेच्या अंगावर धावत गेला. महिलेची आई समजावण्यासाठी गेली असता, तिलादेखील त्याने शिवीगाळ केली. घरात घुसून सर्वांना मारून टाकू अशी धमकी दिली. रमेशचे वडील गंगाधर भिवसन सपकाळे यांनीसुद्धा शिवीगाळ केली. महिलेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रमेश सपकाळे व गंगाधर सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

पारोळा : प्रतिनिधी नाशिक येथून मुलाची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आटोपून घरी असलेल्या परतत पित्याचा शुक्रवारी पारोळ्याजवळ अपघात झाला. चंद्रकांत अरुण चौधरी (वय ४६) असे या इसमाचे नाव आहे. पारोळा येथे चौधरी कारमधून खाली उतरले. त्यावेळी त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, चौधरी हे पत्नी आणि मुलगा कल्पेश याच्यासह नाशिक येथे प्रवेश प्रक्रियेसाठी गेले होते. दि. ७ रोजी नाशिकहून परत येत असताना चौधरी हे वाहन थांबवून खाली उतरले. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दि. १२ रोजी चंद्रकांत चौधरी हे आपल्या…

Read More

मेष राशी आज कामाच्या क्षेत्रात जास्त धांदल राहील. नोकरीत वरिष्ठांशी सहमती ठेवा. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. तुमचे मन इकडून तिकडे भटकू देऊ नका. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळू शकते. ज्याची चर्चा सहकाऱ्यांमध्ये होत राहील. कार्यक्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने कामे करणे शुभ राहील. भागीदारीच्या स्वरूपात व्यवसाय करण्याची शक्यता आहे. उआपल्या सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागल्यास नवीन आशेचा किरण निर्माण होईल. स्वतःवर अधिक विश्वास ठेवा. इकडे-तिकडे गोष्टींमध्ये अडकू नका. विद्यार्थ्यांशी जपून व्यवहार करा. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पडतील. वृषभ राशी आज नोकरदार लोकांना वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कंपनी मिळेल. कामाच्या ठिकाणी इतरांच्या समस्या वाढू शकतात.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी फैजपुर पोलीस ठाण्याचा हद्दीत २ ठिकाणी घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लांबाविणाऱ्या दोन संशयित आरोपींना फैजपूर पोलिसांनी शिरपूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फैजपुर पोलीस ठाण्यात २४ मे आणि १८ जून रोजी असे वेगवेगळे दोन घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही आणि तांत्रिक मदतच्या आधारे शोध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर रेल्वेची साखळी खेचून सुमारे अर्धा तास रेल्वे थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होती. भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशनवरून सकाळी 10 वाजून 50 मिनिटांनी सुरु झाली. या रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू त्या उरूसच्या ठिकाणी जाण्यासाठी बसले होते. भोरटेक रेल्वेस्टेशन पूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी धार टेकडीजवळ साखळी ओढत रेल्वेला थांबवले. यावेळी काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केली. सुमारे अर्धा तास दगडफेक झाल्याचे कळते आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खास योजना काढली आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. मात्र हा अर्ज करताना महिलांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी कमी व्हाव्यात यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 13 जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. माझी लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याच निर्णयात लाईव्ह फोटोसंदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी याबाबत या योजनेच्या अटीत आता नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महिलांना…

Read More

जामनेर : प्रतिनिधी शहरातील दामले प्लॉट भागामध्ये गावठी बनावटीचा पिस्तूल हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल हस्तगत केले आहे. पुढील कारवाईसाठी त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क कार्यालयाने शनिवारी 13 जुलै रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या प्रचिती पत्रकान्वये कळविले आहे. निलेश प्रल्हाद मोरे, वय २३, रा. दामले प्लॉट, जामनेर असे संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील दामले प्लॉट भागामध्ये शुक्रवारी 12 जुलै रोजी रात्री आठ वाजता जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रणजीत जाधव हे पेट्रोलिंग करत असताना परिसरात संशय आरोपी निलेश मोरे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील महिलांना सक्षम करण्यासोबतच त्यांचे कुटुंबातील निर्णय प्रक्रियेतील स्थान वाढावे यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी व सुलभ अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी शासनाने दि. १२ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्या सोबतच या योजनेचे यशस्वी अर्ज भरणारे अंगणवाडी सेविका, एनयुएलएम यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सीटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिध्द झाल्यावर, एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन अॅप /…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीतला विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन (वय १५) हा संध्याकाळी ४:३० च्या सुमारास शाळेत मैदानात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्याचवेळी त्याचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, घनःश्याम पडल्यानंतर लगेचच त्याला शिक्षकांनी सावरले व स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केली. त्याच्यावर प्रथमोपचार केले व त्वरित अमळनेर येथे खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासून मृत घोषित केले. घनश्याम हा आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. अत्यंत नम्र व हुशार असलेला हा गुणी विद्यार्थी क्रीडा, नाटक सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सर्व कार्यक्रमांत भाग घेणारा विद्यार्थी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गटारीच्या सांडपाण्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी होऊन एकमेकांना दगड मारून दुखापत करण्यात आली. ही घटना बुधवारी (१० जुलै) शिरसोली येथे इंदिरा नगरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून गुरुवारी (११ जुलै) एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जनाबाई रमेश पाटील (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध तर उज्ज्वला रवींद्र पाटील (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध बीएनएस कलम १२५ (अ), ११५ (२), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अधिकार पाटील करीत आहेत.

Read More