Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ८ दुचाकीसह तीन चोरटे शहर पोलिसांच्या ताब्यात !
    क्राईम

    ८ दुचाकीसह तीन चोरटे शहर पोलिसांच्या ताब्यात !

    editor deskBy editor deskJuly 14, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातून गेल्या काही महिन्यापासून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच जळगाव शहर पोलीस स्थानकातील गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दुचाकींची चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी बाजारपेठ असल्याने याठिकाणी जिलह्यातील नागरिक खरेदीसाठ येत असतात. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हीच संधी साधत चोरट्यांनी शहरातील मार्केट परिसरातून दुचाकी चोरीचा धडाकाच लावला होता. हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक भवारी यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन रवाना केले होते. काही संशयित चोरीची दुचाकी घेवून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील कर्मचारी अमोल ठाकूर, भास्कर ठाकरे, सुधिर साळवे व योगेश पाटील यांना मिळाली होती. सापळा रचून बसलेल्या पथकाने गोलाणी मार्केट परिसरातून संशयित शुभम भगवान चौधरी वय २५, मोईन मुक्तार मणियार वय १८, ओम सुरेश हटकर वय १८, तिघे रा. रिंगणगाव, ता. एरंडोल यांना शुक्रवार १२ जुलै रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे. त्यांनी आपण दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरी केल्याची कबुली देत आठ दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी त्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.

    यांनी केली कारवाई
    शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सुनिल पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, पोना किशोर निकुंभ, सुधिर साळवे, रतन गिते, अमोल ठाकूर यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्यावर वेगाचा कहर; जोरदार धडकेत ४९ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी अंत

    April 26, 2026

    भरवस्तीतून ३.११ लाखांचा गॅस माल गायब; चोरट्यांचा प्लॅनबद्ध डाव उघड

    April 26, 2026

    चुलत भावानेच घरात घुसून केला १० वर्षीय बालिकेचा विनयभंग !

    April 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.