Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी घरात सर्व जण झोपलेले असताना पहाटे ४:३० वाजेच्या सुमारास घराबाहेर ‘एसी’च्या आउट डोअरला वायरने गळफास घेत प्रमोद गुंड्या माचरेकर (३८, रा. कंजरवाडा) यांनी आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (११ जुलै) पहाटे कंजरवाडा परिसरात घडली. मयताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यावर पत्नीसह सासरच्या मंडळींची नावे असून, कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयताची आई व पुतण्याने केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणारे प्रमोद माचरेकर हे पत्नी, दोन मुली, मुलगा व आईसह कंजरवाडा परिसरात राहत होते. घरात सर्व सदस्य झोपलेले असताना गुरुवारी पहाटे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर सीआयडी अधिकारी असल्याचे सांगत व्यावसायिकाला जेवणातून गुंगीचे औषध देत त्याचे आक्षेपार्ह फोटो काढत खंडणी उकळणाऱ्या महिलेला रामानंदनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ‘हनी ट्रॅप’ करणारी ही महिला १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रायसोनी नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाची सोशल मीडियावर एका महिलेशी ओळख झाली. तिने व्यावसायिकाला आपण सीआयडी अधिकारी तर पती रेल्वेत टी.सी. असल्याचे सांगितले. ७ मार्च रोजी धुळे येथे ती व्यावसायिकाला भेटली. तेथे जेवणात गुंगीचे औषध देत एका फ्लॅटवर घेऊन गेली. याठिकाणी व्यावसायिकाचे आक्षेपार्ह फोटो काढत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान, या महिलेने व्यावसायिकाला…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी बसस्थानक परिसरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक करण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. गणेश तुकाराम पवार (वय २५, रा. बोरमाळी, पो.नागद, ता. कन्न्ड, जि संभाजीनगर, ह.मु, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, पोलिस बसस्थानक परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी एकजण बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षासमोर संशयितरीत्या बसलेला दिसला. त्याची विचारपूस केली असता त्याने नागद (ता. कन्नड) येथे जात असल्याचे सांगितले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे, मॅगझिन, दोन मोबाईल असा एकूण ५१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. पोकॉ. समाधान पाटील…

Read More

मेष राशी आज आईशी विनाकारण मतभेद होऊ शकतात. जमीन, वाहने, इमारतींच्या खरेदी-विक्रीत अडथळे येऊ शकतात. कामाच्या क्षेत्रात आराम आणि सोयी कमी होऊ शकतात. घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी चोरी होण्याची शक्यता आहे. अनावश्यक वादविवाद टाळा. अन्यथा, गोष्टी आणखी वाढल्यास, तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. काही महत्त्वाच्या कामात अडथळे आल्याने तुम्हाला वाईट वाटेल. काही सरकारी खात्यामुळे तुम्हाला व्यवसायात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. रोजगारासाठी इकडून तिकडे भटकावे लागेल. नोकरीत तुम्ही वरच्या अधिकाऱ्यांच्या रोषाला बळी पडू शकता. वृषभ राशी आज बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळेल. तुम्हाला तुमच्या आवडीचे काम करता येईल. औद्योगिक व्यवसाय योजना राबविण्यात येतील. सैन्याशी संबंधित लोक त्यांच्या साहस आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आजारी असतानाही शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी विधीमंडळात दाखल झाले. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नुकतेच ते बरे होऊन सांगोला तालुक्यातील आपल्या चिकमहूद या गावी आले होते. दरम्यान, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी आमदार शहाजीबापू पाटील गुरुवारीच मुंबईला आले आहेत. सध्या आमदार शहाजीबापू पाटील यांची तब्येत ठणठणीत असून ते रात्री आमदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशाचा सुपरहिट चित्रपट अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय आज अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहणार होता. पण तत्पूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाल्यामुळे त्याला आता या सोहळ्याला हजर राहता येणार नाही. ‘सरफिरा’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याने स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. त्याच्यावर डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. केवळ अक्षयच नाही तर ‘सरफिरा’च्या टीममधील आणखी काही जणांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने सूत्रांचा दाखला देत म्हटले आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सर्वच पक्षांनी आतापासून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे तर लोकसभा निवडणूक प्रचारात आणि निकालानंतर मोदींच्या ४०० पार घोषणेवर विरोधकांची टीका सुरूच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अबकी बार मविआ २२५ पार अशी घोषणा केली आहे. भाजपचे उदगीर येथील माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या शरद पवार गटात प्रवेशप्रसंगी आयोजित सोहळ्यात ते म्हणाले की, महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. आता विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडाच साफ होईल. महाविकास आघाडीला विधानसभेत २८८ पैकी २२५ जागांवर यश मिळेल. वाय बी. चव्हाण सभागृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना जळगाव येथील तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना चोपडा येथील श्रीरामनगरमध्ये बुधवारी रात्री घडली. मयूर राजेंद्र शिंदे (वय ३१, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण, जळगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, मयूर हा बुधवारी नातेवाईकाच्या लग्नानिमित्त चोपडा येथे आला होता हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना त्याच्या छातीत अचानक दुखू लागले आणि तो खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. नातेवाईकांनी मयूर याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले. तिथे डॉ. सागर पाटील यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत चोपडा शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शेषराव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आत्याच्या मुलासोबत लग्न ठरले होते. काही महिन्यांत लग्नाची तारीख काढण्यात येणार होती. मात्र, संसार फुलण्याआधीच दोन महिन्यांपूर्वी नियोजित वराचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्याच मृत्यूच्या विरहात असलेल्या तरुणीने विद्युत कॉलनीतील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, दुहिता संजयकुमार मोरे (वय २५, रा. विद्युत कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. दुहिता विद्युत कॉलनीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात आई, वडील, भाऊ यांच्यासह राहत होती. तिचे नुकतेच बारावीचे शिक्षण झाल्यानंतर ती घरीच होती. दरम्यान, नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुहिताचे आतेभावाशी लग्न ठरले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वडनगरी फाट्याजवळ एका रिक्षा चालकाने २३ वर्षीय मुलाला माझ्याकडे का पाहतोय ?, असा जाब विचारत त्याला मारहाण करत, त्याच्या हातावर चाकूने वार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. या प्रकरणी तालुका पोलिस स्टेशनला रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील धीरज राजाराम पाटील (वय २३) हा तरुण बुधवारी सायंकाळी वडनगरी फाट्याजवळील बडे जटाधारी महादेव मंदिर येथे दर्शनाला गेला हाता. दर्शन घेतल्यानंतर घरी जात असताना, मंदिरासमोरील रस्त्यालगत मयूर पाटील (पत्ता माहिती नाही) या रिक्षा चालकाने धीरजला माझ्याकडे का पाहतोय ? असे म्हणत जाब विचारला, त्यावर धीरजने पाहत नसल्याचे सांगितले. रिक्षा चालकाने वाद घालून,…

Read More