जळगाव : प्रतिनिधी मुलीच्या लग्न सोहळ्यादरम्यान तिच्या आईने दागिन्यांची ‘हॅण्ड बॅग’ एका कोपऱ्यात ठेवली आणि काही क्षणात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह मोबाइल, रोख रक्कम असलेली बॅग लांबविली. ही घटना रविवारी (१४ जुलै) सुरभी लॉन या लग्नाच्या हॉलमध्ये घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, महिला महाविद्यालयात उपप्राचार्य असलेले सतीश गुलाबराव जाधव (५२, रा. कोल्हे नगर) यांची मुलगी अचला हिचा लग्नसोहळा रविवारी औद्योगिक वसाहत परिसरातील सुरभी लॉन येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यादरम्यान नववधूच्या आईने त्यांचे चार लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख दोन हजार रुपये, एक मोबाईल असा…
Author: editor desk
रावेर : प्रतिनिधी घरभरणीचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला बसने धडक दिली. यात महिला चाकाखाली बसच्या आल्याने चिरडून ठार झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली. मृत महिलचे नाव आरती संदीप पाटील (३२, रा. आमोदा, ता यावल) असे आहे. याप्रकरणी बसचालकावर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मोरगाव खुर्द (ता. रावेर) येथील जितेंद्र जगन्नाथ पाटील यांच्या कन्येचा शाहपूर (मध्यप्रदेश) येथे रविवारी विवाह झाला. सोमवारी बंभाडा, जि. ब-हाणपूरला घरभरणीचा कार्यक्रम आटोपून संदीप सीताराम पाटील व आरती पाटील हे दाम्पत्य मोटारसायकलने (एम. एच. १४/ए क्यू ११९६) आमोदा येथे जात असताना रावेरनजीक बालाजी टोलनाक्यासमोर भरधाव…
मेष राशी आज प्रेमसंबंधांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात. वाद शांततेने सोडवा. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये वैवाहिक सुखाची कमतरता जाणवू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद आणि पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह कोणत्याही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. सामाजिक कार्यात तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल. तुमच्या कामाने लोकांना प्रभावित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्ही नवीन मित्र बनवाल. वृषभ राशी आज मित्राकडून मनोबल मिळाल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्याबद्दल आकर्षणाची भावना निर्माण होईल. तुम्ही मित्रांसोबत मजा करायला उत्सुक असाल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. तुमच्या पालकांचा…
जळगाव : प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अपडेट झालेले जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सर्वसामान्य रुग्णालय झाले असून इथल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, गोर गरिबांच्या आरोग्य सेवेसाठी हे अत्यंत महत्वाचे होते. म्हणून गेल्या एक वर्षात दोन्ही रुग्णालयाचे अत्याधुनिकरणासाठी 50 कोटी पेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आला होता. आता जिल्ह्यातील रुग्णांसाठी DPDC च्या माध्यमातून 15 कोटीचे अत्याधुनिक सिटी स्कॅन लवकरच उपलब्ध करणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यांच्या हस्ते सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी नवे मोड्युलर आय. सी. यु. आणि मोड्युलर ऑपरेशन थियटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खा.…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे राज्यातील विविध धरणे, नद्या ओसंडून वाहत आहेत. यामुळे पर्यटन स्थळांवर देखील मोठी गर्दी होत आहे. मात्र या पर्यटनस्थळांवर अनेक दुर्घटना समोर येत आहेत. नाशिकमधून देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंजनेरी गडावर रविवारी दहा पर्यटक अडकून पडले होते. मात्र आता अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, नाशिकच्या अंजनेरी गडावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने १० पर्यटक अडकल्याची घटना घडली होती. रविवारी सुट्टीच्या दिवशी हे पर्यटक अंजनेरी गडावर फिरायला आले होते. मात्र दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने हे सर्व पर्यटक अडकून पडले होते. मात्र…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना बोदवड पोलिसांनी भुसावळ व वरणगाव शहरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चोरीच्या ३४ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, बोदवड शहरातील विजय पुंडलिक माळी यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीए ५१८७) ही चोरी झाल्याची घटना १९ जून रोजी दुपारी घडली होती. त्यानुसार बोदवड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असताना ही दुचाकी भुसावळ शहरातील जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे वय-३१ याने चोरी केल्याचे…
पुणे : वृत्तसंस्था राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापेलला असताना या भेटीत हाच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी असेल असा तर्क लावला जात आहे. विशेष म्हणजे भुजबळ अचानक पवारांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण रविवारी बारामतीमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम काही लोक करत आहेत. तसेच बारामतीमधून फोन आला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात सध्या पावसाने हाहाकार माजविला आहे. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे धरणाच्या प्रवाहात 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर सध्या शोधमोहीम सुरू आहे. जयेश रामचंद्र असे या तरुणाचे नाव आहे. खेड तालुक्यातील शेल्डी धरणातून अचानक पाणी पातळीत वाढ झाल्याने हा तरुण वाहून गेला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. सध्या महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, रविवारी रत्नागिरीतील खेड तालुक्यातील शेल्डी धरणात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे 32 वर्षीय तरुण वाहून गेला. पाण्याच्या पातळीत अचानक…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री खुर्द गावाजवळील चैताली जिनिंगजवळ कार आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात पिंप्री येथील दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. रॉबिन संजय सोनवणे (२२, पिंप्री, ता. धरणगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे कि, पिंप्री गावातील जिनिंगजवळील रस्त्यावर रॉबिन सोनवणे आणि त्याचा भाऊ रोहित सोनवणे हे दुचाकी क्रमांक (एमएच१९/डीई ६६४९) ने निघाले होते. त्यावेळी दुचाकी जळगाव- धरणगावच्या मुख्य रस्त्यावर लागल्यानंतर जळगावकडून धरणगावकडे जाणारी भरधाव कार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यात रॉबिन सोनवणे याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला त्याचा…
पाचोरा : प्रतिनिधी शहरातील कॉलेज चौकात शनिवारी मध्यरात्री १:०० वाजेच्या सुमारास भरधाव अवजड वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली होती. या धडकेत दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते. यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान जळगावात मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे कि, संतोष शिवसिंग परदेशी (३७, गाळण, ता. पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते मार्केटिंग क्षेत्रातील कंपनीत काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होते. पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शनिवारी मध्यरात्री १२:०० वाजेच्या सुमारास ते कल्याण स्टेशनवरून पाचोरा रेल्वे स्टेशनवर उतरले. स्टेशनवर उतरल्यानंतर गाळण येथे घरी जाण्यासाठी त्यांनी एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. या दचाकीस्वारासोबत जात असताना कॉलेज चौकात आल्यावर भरधाव अवजड…

