जळगाव : प्रतिनिधी
दाणा बाजार परिसरात पीयूष प्रकाश बियाणी (३७, रा.नवीपेठ) यांचे प्रकाश भगवानदास बियाणी नावाचे दुकान आहे. १० जुलै रोजी आठ वाजता ते दुकान बंद करून गेले होते. त्यानंतर रात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकविले व आत प्रवेश करत गल्ल्यातून तीन हजार ५०० रुपये चोरून नेले. पीयूष बियाणी यांनी शुक्रवारी (१२ जुलै) शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएस कलम ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तपास पोहेकों गजानन बडगुजर करीत आहेत.
दाणा बाजारात चोरीच्या घटना वाढल्याने व्यापारी वर्गात भीती पसरली आहे. चोरीच्या घटनांना आळा बसण्यासाठी दाणा बाजार परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी व रात्री कोणतेही माल वाहतूक वाहन या परिसरात उभे राहू देऊ नये, अशी मागणी दाणाबाजार असोसिएशनतर्फे करण्यात आली. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष अशोक धूत यांच्यासह पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.