Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.अमळनेर येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली होते. त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी आ. शिरीष चौधरी, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक राजेश पांडे,प्र कुलगुरू जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून विविध अभ्यासक्रमाबरोबर गरीब…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बांगलादेशात आंदोलक आणि सत्ताधारी अवामी लीगच्या समर्थकांमध्ये पुन्हा हिंसाचार झाले. रविवारी झालेल्या संघर्षात 91 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या चकमकीत डझनभर लोक जखमीही झाले. या पार्श्वभूमीवर भारताने बांगलादेशात आपल्या नागरिकांना संपर्कात राहण्यास आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्यासाठी भारताच्या सहाय्यक उच्चायुक्ताने +88-01313076402 आपत्कालीन क्रमांक जारी केला. बांगलादेशातील आरक्षण प्रणालीत 1971 मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधातील निदर्शनांनी रविवारी पुन्हा जोर धरला. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याचा मागणी लावून धरली आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेशात पोलिस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत 200 हून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तशा जळगाव जिल्ह्यात राजकीय घडामोडी नाही आता वेग आला आहे. त्यात धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सामूहिक राजीनामांमध्ये पदाधिकाऱ्यांनी असे नमूद केले आहे की, मंत्री अनिल पाटील, जिल्हा बँक चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची कोणत्याही समितीवर नियुक्ती नाही. तसेच कोणतेही काम होत नाहीत. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की आपण शिवसेना भाजपा सोबत सत्तेत आहोत वर्ष उलटूनही कोणत्याही तालुक्याच्या कमिटीवर आपल्या कार्यकर्त्याची नियुक्ती होत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वात मोठी आघाडी घेतली असून त्यांनी विधानसभेच्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली आहे. आपण राज्यातील जवळपास 250 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्यानुसार मनसेच्या वतीने दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना मनसेच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंढरपूर विधानसभेमध्ये समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात मनसेने दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर अजय चौधरी शिवडी विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान आमदार…

Read More

धुळे : वृत्तसंस्था तालुक्यातील लळींग आणि चौगाव गावात सर्पदंशामुळे दोन बालकांनी आपला प्राण गमावल्याची घटना घडली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. यात एका बालकासह बालिकेचा समावेश असून या प्रकरणी दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लळींग गावात दुर्गा सोमा पवार (वय 7 रा. लळींग ता. धुळे) ही बालिका तिच्या मैत्रिणीच्या राहत्या घराच्या पाठीमागे खेळत असताना सर्पाने दुर्गाच्या उजव्या पायाला दंश केला असता उपचारार्थ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचाराअंती दुर्गा हिचा मृत्यू झाला. डॉ. अर्जुन यांनी तपासणी अंती मृत घोषित केले. या प्रकरणी मोहाडी उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी तीन महिन्यांपासून दरोडा टाकून फरार असलेल्या सुलतान खालीद पिंजारी उर्फ सुलतान बिल्डर (वय २७, रा. दोडाईचा, ता. शिंदखेडा) हा शिरपुरकडे जात असतांना त्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पाच हजार ७०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शहर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडा व आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातील सुलतान पिंजारी हा तीन महिन्यांपासून फरार होता. तो दोंडाईचाहून शिरपूरकडे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउनि गणेश वाघमारे, अनिल जाधव, पोहेकॉ विलेश सोनवणे, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, प्रदीप चवरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने शिरपूर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पत्नी माहेरी गेलेली असताना विजय काव्या पावरा (१९, रा. खळवाडी, जुने जळगाव) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी (४ ऑगस्ट) साडेआठ वाजेच्या सुमारास वडील त्याला बोलविण्यास गेले त्यावेळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मूळ चोपडा तालुक्यातील रहिवासी असलेले पावरा कुटुंब सध्या जुने जळगाव परिसरात राहते. यातील विजय पावरा याची पत्नी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहेरी गेली आहे. त्यामुळे विजय हा घरी एकटाच होता. त्याच्या खोलीच्या शेजारी त्याचे आई- वडील, भाऊ राहतात.

Read More

जळगाव : प्रतिनिधी पती चेन्नई येथे गुरू महाराजांच्या दर्शनासाठी, तर पत्नी धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या असताना चोरट्यांनी भरदिवसा खिडकीचे ग्रील कापून रोख एक लाख ५० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात आठ तोळे सोने आहे. ही चोरी रविवारी (४ ऑगस्ट) दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोड परिसरातील लोकमान्य हौसिंग सोसायटी परिसरात राहणारे कांतीलाल कटारिया हे गुरू महाराजांच्या दर्शनासाठी चेन्नई येथे गेले आहेत, तर त्यांच्या पत्नी शशिकला कांतीलाल कटारिया (६४) या सकाळी साडेसात वाजता धार्मिक कार्यक्रमासाठी गणपतीनगरात गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख एक लाख ५० हजार…

Read More

बोदवड : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ट्रक आणि दूध वाहिनीचा येथे जोरदार अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजेच्या सुमारास बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावरील बोदवड शहरातील अमर डेअरीजवळ मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या ट्रकची (एमपी ०९- एचजी ८८९१) धडक वळण घेत असलेल्या दूध वाहिनीला बसली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यात ट्रकच्या पुढील भागाचे तर दूध वाहिनीच्या मागील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दूध वाहिनीच्या आत असलेल्या मालाचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र कोणासही सुदैवाने फारशी इजा झाली नाही. याबाबत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु असून आता पुणे, नाशिकमध्ये रविवारी जोरदार पाऊस झाला. नाशिकला गाेदावरीला पूर आला असून, पुण्यात मुसळधार पावसामुळे खडकवासलासह ४ धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला आहे. नाशिकसह जायकवाडीच्या वरील भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पात्रात ३१ हजार २८० क्युसेक आवक होत आहे. रविवारी संध्याकाळी ६ वाजता धरणात १५ हजार १८५ क्युसेकने आवक सुरू होती. त्यामुळे रविवारी साठ्यात १.२०% वाढ झाली, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत जाधवसह गणेश खराडकर यांनी दिली. रविवारी पाणीसाठा ११.२० टक्क्यांवर होता. सध्याचा साठा बघता पुढील आठ महिने पिण्यासाठी व उद्योगासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे,…

Read More