जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे त्यातच जळगाव शहरात भाजपाला मानणारा मोठा वर्ग व मतदार आहे, परंतु गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहरातील आमदार मामा आहे. अजूनही नगरसेवकाच्या भूमिकेतून बाहेर आले नाही. भाजपा नेते गिरीश महाजन यांनी महापालिकेत एक हाती सत्ता मिळवली तसेच मामाच्या घरात महापौर पद दिले परंतु आमदार मामाला भाजपाचे ते नगरसेवक ही सांभाळता आले नाही 28 नगरसेवक भाजपाचे फुटले यामुळे राज्यभर जळगाव शहरातील निष्क्रिय मामाचे नाव भाजपाच्या गोटात चर्चेत झाले. त्यातच शहरात संघटन आहे. परंतु मामा त्या संघटनेचे नेतृत्व करू शकले नाही, काल परवा झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत समांतर रस्त्याचे काय झाले असा प्रश्न शहराचे…
Author: editor desk
लातूर : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली असून नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्रातील जवळपास 250 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात येतील, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना सोलापूर आणि शिवडी येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली होती. उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात राज ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे लातूर जिल्हा दौऱ्यात देखील त्यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी जाहीर केलेला हा तिसरा उमेदवार आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा…
जळगाव : प्रतिनिधी जळगावच्या उपविभागीय अधिकारीपदी विनय गोसावी यांची नियुक्ती करण्यात आले आहे. प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांची धुळे येथे भूसंपादन विभागात बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी आता मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जिल्हाधिकारी विनय गोसावी यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील आदेश राज्य शासनाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता काढले आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत कार्यालयातील प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांची दोन दिवसांपुर्वी धुळे येथील भुसंपादन विभागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे जिल्हाधिकारी विनय गोसावी यांची नियुक्तीचे आदेश नुकतेच काढण्यात आले आहे. विनय गोसावी यांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विभागाचे प्रांताधिकारी म्हणून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक कृत्याचा व्हिडीओ काढत तो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर शहरातील मेहरूण परिसरातील एका ट्रॅकवर एका वाहनात तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मार्च ते जुलै २०२४ दरम्यान स्नेह किशोर लाठीग्रा उर्फ किशन सोनी वय २० रा. शांती नगर, जुनाखेडी रोड, जळगाव याने ओळखीचा फायदा घेत वेळोवेळी फोनद्वारे पिडीत मुलीला बोलावून त्यांच्या फोनमध्ये लैंगिक कृत्याचे व्हिडीओ बनवून घेतला. त्यानंतर संशयित आरोपी किसन…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली असून महायुतीमध्ये जागावाटपापासून उमेदवार निवडून आणेपर्यंत त्यांना मोठी कसरत करावी लागेल. मात्र, तत्पूर्वी जागावाटपात अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी दादांसमोर मोठे चॅलेंज असणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सामोरे जाण्याचे आव्हान देखील दादांसमोर असेल. महायुतीतील जागावाटप झाल्यानंतर तब्बल 19 मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 19 विद्यमान आमदारांच्या विधानसभा मतदार संघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामध्ये, सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या, काही मंत्र्यांच्या मतदारसंघातही बंडखोरीची शक्यता आहे. यात प्रामुख्याने मंत्री हसन मुश्रीफ,…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील तामसवाडी येथे मटनच्या दुकानातील रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, आडगाव येथील विकास हरदास राठोड हे तामसवाडी येथे दि. ४ रोजी मटन घेण्यासाठी गेले. याठिकाणी हेमंत उर्फ नाट्य मच्छिद्र पवार (वय २२, रा. तामसवाडी, ता. पारोळा) याने राठोड यास मटन दुकानात असलेल्या रांगेतील नंबरच्या कारणावरून शिवीगाळ केली. तसेच त्याच्या हातातील चाकू काढत राठोड यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये राठोड यांच्या डाव्या खांद्याला दुखापत केली झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित हेमंत उर्फ नाट्य पवार या तडीपार असलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दापोरा येथे कर्जाच्या जाचाला कंटाळून दशरथ भीमराव तांदळे (वय ५२, रा. दापोरा) या शेतकऱ्याने गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांदळे हे पत्नी व मुलासोबत दापोरा येथे वास्तव्याला होते. दुपारी घरी कोणीही नसताना त्यांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेतला. त्यांच्या मुलाने दरवाजा उघडल्यानंतर प्रकार उघडकीस आला. तांदळे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता तांदळे, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. ते दापोरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक तुकाराम भीमराव…
यावल : प्रतिनिधी शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला तीन जणांनी आठवडी बाजारातून घेऊन गेले. आणि तिला तालुक्यातील एका गावात नेऊन झोपडीत दोन दिवस ठेवले आणि तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, ही अल्पवयीन मुलगी दि. २६ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता शहरातील आठवडे बाजारात आली होती. तेथून तिला दोन पुरुष आणि एका महिलेने तालुक्यातील एका गावात नेले. या घटनेनंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीला तेथून आणत कुटुंबाच्या स्वाधीन केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तिघांविरोधात पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस…
रावेर : प्रतिनिधी जळगावमधील रामेश्वर कॉलनी परिसरातील शाळकरी मुलगा रावेरमध्ये सापडला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुलाने अपहरण झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रावेर आणि जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. सविस्तर वृत्त असे कि, रामेश्वर कॉलनीतील शाळकरी मुलगा मंगळवारी रावेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे रडत येत होता. त्यावेळी रावेरमधील रहिवासी विक्रम राठोड यांच्या नजरेस पडला. राठोड यांनी मुलाला धीर दिला. आणि त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने अपहरण झाल्याचे सांगितले. राठोड यांनी मुलाला पोलिसांकडे नेले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मुलाने रामेश्वर कॉलनीतील एका दुकानाजवळ कारचालकाने पत्ता दिला.…
मेष राशी महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल. पण परिस्थिती काहीशी अनुकूल राहील. सामाजिक क्षेत्रात नवीन ज्ञान आणि ओळख वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांशी समन्वय राखण्याची गरज भासेल. खाजगी व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास फायदा होईल. शेतीच्या कामात लोकांना काही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागेल. राजकारणाच्या क्षेत्रात प्रचंड जनसमर्थन मिळाल्याने राजकीय वर्चस्व वाढेल. वृषभ राशी दिवस आनंदाचा, लाभाचा आणि प्रगतीचा असेल. काम पूर्ण होईपर्यंत कोणालाच सांगू नका. अन्यथा काम बिघडू शकते. तुमच्या भावनांना सकारात्मक शिक्षण द्या. उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अधिक मेहनत केल्यास परिस्थिती सुधारेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अडथळे येतील. काही…

