पुणे : वृत्तसंस्था पुण्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडली. त्यांचं मराठ्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी पुन्हा सरकारला सुपडा साफ करण्याचा इशारा जरांगेंनी दिला. मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र जरांगे मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण मिळणार नाही, असं भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. छगन भुजबळांनी पुन्हा आपल्या ओबीसी एल्गार सभा सुरू केल्या असून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाहीच, असं सांगलीतील सभेतून छगन भुजभळ म्हणालेत. यालाच पलटवार म्हणून जरांगेंनी सुपडा साफ करण्याचा इशारा दिला…
Author: editor desk
जळगाव | राजकीय विशेष राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला असल्याने नुकताच भाजपाचा नवीन सर्व्हे आला असून चेहरे बदलले तर यात 80 ते 90 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना भाजप संधी देण्याच्या तयारीत आहे यात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे ही नाव आहे. यामुळे मामाची चांगलीच कोंडी होणार असल्याचे बोलले जात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपाला 105 जागा मिळाल्या त्यानंतर 2024 ला लोकसभा निवडणुकीत 25 पैकी 23 खासदारांना जनतेने नाकारले आहे केवळ दोनच खासदार जुने चेहरे आहेत. भाजपाने नुकताच सर्वे केल्यानुसार असे चित्र राहिले तर राज्यात केवळ भाजपाच्या 80 ते…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात सध्या गंभीर घटना घडत असतांना नुकतेच श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणीच्या चौथ्या सोमवारी बिहारच्या जेहानाबादमध्ये सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 7 कावड धारकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. तेथे बरेच लोक पडले होते. ही घटना रविवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. लाठीचार्ज झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. बराबर टेकडीवर भाविक एका बाजूने उतरत होते आणि दुसऱ्या बाजूने चढत होते. गोंधळ झाल्यावर बंदोबस्तात सहभागी असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. यामुळे चेंगराचेंगरी झाली, भाविक जीव वाचवण्यासाठी धावू लागले आणि…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे रोडवर स्वामी समर्थ के समर्थ केंद्राच्या पुढे दि. ११ रोजी सकाळी ८:२० वाजेच्या सुमारास चोपडा शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडे २ गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, चाकू आणि चोरीची दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, चोपडा शिवारात चुंचाळे रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्राच्या पुढे शहर पोलिसांनी सापळा लावला. ईश्वर किसन डावर (१९, आसरापानी), पप्पू जयराम डावर, (१८, मध्य प्रदेश) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूस, एक चाकू आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव रेल्वे स्टेशनलगत सार्वजनिक जागेवर असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १४७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. ८ रोजी रात्री करण्यात आली. यात बंटी राजकुमार बसवाणी, गोकुळ गमणू चव्हाण, चेतन रवींद्र पवार, गोकुळ एकनाथ बोरकर, सलमान शेख, बबन शेख यांना पकडले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश कुवर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्टेशनला मुंबई जुगार कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक चाळीसगावचे पोलिस तपास करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी सायकलने शिकवणीला जात असलेल्या तनिष्का परेश नेवे (१२, रा. भोईटे नगर) या विद्यार्थिनीला कारने धडक दिल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (१० ऑगस्ट) गुड्डुराजा नगरजवळ झाली. अपघातानंतर कारचालक न थांबता पसार झाला. सविस्तर वृत्त असे कि, व्यावसायिक परेश सुधाकर नेवे यांची इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी तनिष्का ही शनिवारी सायकलने क्लासला जात होती. त्या वेळी एका कारने तिच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात तिच्या डोक्याला जबर मार लागण्यासह डोळ्ळ्यांच्या वरील हाडाला टीच गेली आहे. या सोबतच हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. धडक दिल्यानंतर कारचालक तेथे न…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव कारने पादचारी महिला व दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. त्यानंतर ही कारहीदेखील रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये महिला व दुचाकीस्वारासह कारमधील दोघे असे एकूण चार जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री म्हसावद ते विटनेर दरम्यान घडली. संबंधित कारचालकाने एकाला कट मारला होता, त्यामुळे पाठलाग करणाऱ्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने पादचारी महिलेसह दुचाकीला धडक दिल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावदकडून नेरीकडे जाणाऱ्या कारने (क्र. एमएच १५, सीडी ८१९४) एकाला कट मारला होता; त्यानंतर कुणी पाठलाग करेल या भीतीने कारचालकाने आपली कार दामटली. ही कार भरधाव वेगाने वावडद्याकडे निघाली असता या ठिकाणी सुनबाई भिका राजपूत ही महिला रस्ता ओलांडत…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ आहे. तुम्हाला लोकांचा आदर आणि सन्मान मिळेल. नोकरदारांनो तुमच्या कामामुळे तुमचे बॉस तुमच्यावर खूप खुश होतील आणि तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घर, गाडी किंवा इतर काही संपत्ती खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुमचे जे काम बऱ्याच दिवसांपासून अडकले होते, ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते पैसे परत करण्यास सक्षम व्हाल. तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहात. वृषभ राशी आजचा दिवस नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. कार्यक्षेत्रात त्यांना काही मोठी उपलब्धी मिळू शकते. आई-वडिलांची सेवा करण्यासाठी तुम्ही तत्पर असाल. तुम्हाला काही शारीरिक त्रास…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅप, ई-मेल, फोन हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही खातीही हॅक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एका खासदाराचा फोन हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. तसेच सुप्रिया सुळे यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन आज दुपारी 1 च्या सुमारास एक ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे…
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ दि.१० रोजी मध्यरात्री १२ ते ४ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमांनी एका २५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा या गावात दि.१० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास याच गावातील जुनी भिलाटी येथील रहिवासी इंदल प्रकाश वाघ (वय २५) हा दगड फोडून आपल्या परिवाराचा उदरनिवार्ह करीत असून गेल्या काही दिवसापासून त्याची पत्नी त्याच्या सोबत राहत नसून तो आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असून दि.१० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरून बाहेर पडला असता.…

