• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१९ दुचाकीसह चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात : पारोळा पोलिसांची कारवाई !

editor desk by editor desk
September 13, 2024
in क्राईम, जळगाव, राज्य
0
१९ दुचाकीसह चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात : पारोळा पोलिसांची कारवाई !

पारोळा : प्रतिनिधी

पारोळा पो. स्टे, च्या गुन्हे शोध पथकास गोपनिय माहिती मिळाली की, किशोर संजय चौधरी रा. तरवाडे ता. पारोळा ह. मु. सातपुर कॉलनी, नाशिक. हा नाशिक शहरातुन व इतर परीसरातुन दुचाकी चोरुन पारोळा पो. स्टे. हद्दीतील आडगाव, तरवाडे, शिवरे या परीसरात कमी किमतीत विकतो. तो पुन्हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यास पारोळा पो. स्टे. हददीत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यावरुन पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी पारोळा पो. स्टे च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, पोहेकॉ/ प्रविण पाटील, पोना/ संदिप सातपुते, पोकों/अभिजित पाटील यांना तात्काळ किशोर संजय चौधरी याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

त्यावरुन नमुद पथक हे साधारण ३ दिवसा पासुन पारोळा शहर व हद्दीत किशोर संजय चौधरी याचा कसोशीने शोध घेत होते. दिनांक १२/०९/२०२४ रोजी पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात किशोर संजय चौधरी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता आरोपी किशोर संजय चौधरी याने नाशिक शहर हद्दीतुन व परिसरातुन मोटार सायकली चोरी केले असल्याची कबुली दिली असुन त्याचेकडुन चोरी केलेल्या १९ मोटार सायकली हस्तगत करुन जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक शहर व परिसरातील विविध पोलीस स्टेशन कडील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदर कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगाव, कविता नेरकर पवार, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, सुनिल नंदवाळकर उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, असे पारोळा पोलीस स्टेशनच्या वतीने प्रेस नोट जारी करीत कळविण्यात आले.

Previous Post

मोठ्या भावाने केली लहान भावाची हत्या : पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या २५ उमेदवारांच्या नावाची यादी फायनल ?

Next Post
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या २५ उमेदवारांच्या नावाची यादी फायनल ?

मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या २५ उमेदवारांच्या नावाची यादी फायनल ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 19, 2025
चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !
क्राईम

चारचाकीचे नियंत्रण सुटले : दोन वर्षाच्या मुलीसह आई जागीच ठार !

May 19, 2025
बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !
क्राईम

बस व दुचाकीचा भीषण अपघात : तरुणाचा जागीच मृत्यू !

May 19, 2025
खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !
क्राईम

खळबळजनक : मुंबईतील विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग !

May 19, 2025
जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी
जळगाव

जळगावच्या खा.वाघ ठरल्या संसदरत्न २०२५ पुरस्काराच्या मानकरी

May 18, 2025
सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !
lifestyle

सुंदर त्वचेसाठी ‘या’ टिप्स आहे महत्वाच्या !

May 18, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group