मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअॅप, ई-मेल, फोन हॅक होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. तसेच अनेक सरकारी अधिकाऱ्यांचीही खातीही हॅक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एका खासदाराचा फोन हॅक झाल्याच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:च ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. तसेच सुप्रिया सुळे यांनी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन आज दुपारी 1 च्या सुमारास एक ट्वीट केले आहे. या ट्वीटद्वारे त्यांनी फोन आणि व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ दि.१० रोजी मध्यरात्री १२ ते ४ वाजेच्या सुमारास अनोळखी इसमांनी एका २५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील सावदा प्र.चा या गावात दि.१० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास याच गावातील जुनी भिलाटी येथील रहिवासी इंदल प्रकाश वाघ (वय २५) हा दगड फोडून आपल्या परिवाराचा उदरनिवार्ह करीत असून गेल्या काही दिवसापासून त्याची पत्नी त्याच्या सोबत राहत नसून तो आपल्या परिवारासोबत वास्तव्यास असून दि.१० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरून बाहेर पडला असता.…
जळगाव : प्रतिनिधी पारोळा-एरंडोलमध्ये पन्नास खोके एकदम ओके आणि गोरगरिबांच्या आदिवासींच्या जमिनीवर डोळा ठेवून राजकारण सुरू असून पैशांच्या जीवावर सर्व काही मिळू शकते हे ब्रीद वाक्य घेऊन गद्दाराच्या निष्क्रिय मुलाचे राजकारण सध्या प्रचंड जोरात सुरू असून युज अँड थ्रो म्हणजेच कार्यकर्त्याला वापरा आणि फेका अशा पद्धतीचे राजकारण एरंडोलमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एरंडोल मध्ये 2009 मध्ये माळी समाजाच्या एका ज्येष्ठ नेत्याला म्हणजेच देवदास भाऊंचा वापर झाला. सोबतीला दशरथभाऊ होतेच तसेच निंबाळकर बंधू देखील जोरात होते यांच्या जीवावर आमदारकी सोबत घेतली. त्यानंतर 2014 ला नवीन समीकरण या गद्दाराने तयार केले. एका गावात दोन मराठा समाजाचे नेते आमने-सामने उभे केले. आजही त्यांचे राजकारण…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या चार दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी राज्यातील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाची उघडीप असणार आहे. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये रविवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाची शक्यता आहे. दरम्यान, उद्यापासून तीन दिवस राज्यात पावसाची उघडीप असणार आहे. राज्यातील काही ठिकाणी पुढील तीन-चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे व रायगडसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील पालघर, रायगड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील राष्ट्रीय महामार्गावर वाकोद गावाच्या पुढे हॉटेल सिंहगड जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने एका ४० वर्षीय अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. ९ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत असे कि, छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने रात्री अकरा वाजता हॉटेल सिंहगड जवळ एका चाळीस वर्षीय इसमाला चिरडले. यामध्ये त्या अनोळखी इसमाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पहुर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आणला. दरम्यान, शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेहाला ग्रामीण…
जळगाव : प्रतिनिधी बँकेत कामाला असल्याचे सांगून कपिल राजू पाटील (२१, रा. चंदू अण्णानगर) याने बांधकाम व्यावसायिक विनोद हंसराज बडगुजर (४८, रा. इंद्रप्रस्थनगर) यांचे बंद पडलेले क्रेडिट कार्ड सुरू करून परस्पर एक लाख १३७ रुपये काढून घेतले. मात्र पोलिसात तक्रार देण्याविषयी सांगताच या तरुणाने ९७ हजार रुपये बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यावर जमा केले. उर्वरित रक्कम जमा न करता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली. ही घटना ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. त्यानंतर शुक्रवारी (९ ऑगस्ट) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक विनोद बडगुजर यांनी वर्षभरापूर्वी घेतलेल्या क्रेडिट कार्डचा वापर दोन महिन्यांपासून न केल्यामुळे ते कार्ड बंद पडले.…
जळगाव : प्रतिनिधी चुकीच्या दिशेने (राँग साईड) जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे कामावरून घरी परतणारे योगेश भास्कर ढाके (४५, रा. सदोबा नगर) हे ठार झाले. हा अपघात शुक्रवारी (९ ऑगस्ट) रात्री महामार्गावर तरसोद ते नशिराबाद दरम्यान झाला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सदोबा नगरातील रहिवासी योगेश ढाके हे नशिराबाद येथील एका पेट्रोलपंपावर कामाला होते. शुक्रवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीने (क्र. एमएच १९, डीपी ४६६०) घरी परतत होते. नशिराबादपासून काही अंतरावर आल्यानंतर समोरून राँग साईडने एक ट्रक (क्र. एमएच १८, बीजी २९३७) नशिराबादकडे जात होता. या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ढाके हे बाजूला फेकले गेले व ते ठार झाले. अपघातानंतर ट्रक…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरेल. कुटुंबात एखाद्याच्या लग्नात अडचणी आल्या असतील तर तुम्ही मोठ्यांशी बोलून त्यांचे निराकरण करू शकता. विद्यार्थी असाल तर तुम्ही शांत वातावरणात अभ्यास करण्यासाठी घरापासून दूर जाऊ शकता. प्रेमात असाल तर तुमचा जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी कोणतीही महत्त्वपूर्ण गोष्ट सांगू नका. पैश्याच्या बाबतीत सावध रहा. वृषभ राशी आजचा दिवस व्यापार करणाऱ्या लोकांसाठी चांगला-वाईट असू शकतो, म्हणून तुम्ही तुमच्या कामाची योजना आखून पुढे जावे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत कुठे तरी बाहेर जाऊ शकता. तुम्ही एखाद्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये, नाहीतर तुमच्या कामाच्या ठिकाणी वादळे निर्माण होऊ शकतात, म्हणून तुम्ही काळजी घ्या. जर तुम्हाला…
मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभेपूर्वी सर्वच पक्षातील नेते सध्या राज्यातील दौऱ्यावर असतांना मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरे हे देखील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. या घटनेचे प्रत्युत्तर मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात दिले आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांकडून आणि महिला कार्यकर्त्यांकडून बांगड्या आणि शेण फेकले आहे. तर गडकरी रंगायतन परिसरातही मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सभेसाठी गडकरी रंगायतनमध्ये जमलेले उबाठा गटाचे कार्यकर्तेही यावेळी समोरासमोर आल्याने या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर…
जळगाव : प्रतिनिधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अपेक्षित असे यश आलेले नाही नऊ खासदारांपैकी सात नवीन चेहऱ्यांना संधी जनतेने दिलेले आहे. नितीन गडकरी व रक्षा खडसे वगळता भाजपाचे सात नवीन चेहरे खासदार झाले असल्याने हाच फार्मूला आगामी विधानसभा निवडणुकीत राबविला जाणार आहे. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत देखील भाजपा भाकरी फिरवणार असल्याचे बोलले जात आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत 25 खासदार भाजपाचे निवडून आले होते. आता केवळ नऊ खासदार निवडून आलेले आहे. महाराष्ट्रातील जनतेने नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये झालेल्या चर्चेत जळगाव शहर विधानसभेच्या जागेवर नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जनतेमध्ये मामा…

