Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवेसेंदिवस वाढत असतांना नुकतेच पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील येरवडा जेलमध्ये पुर्ववैमनस्यातून एका आरोपीची हत्या करण्यात आलेली आहे. हा आरोपी सराईत गुंड असल्याचे सांगण्यात येत आहे. जेलमधील तिघांनी त्याची एका धारधार हत्याराने हत्या केली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि किरण रामचंद्र आचार्य यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर गवसचे आरोपी कुटुंबासोबत पुर्वीपासून वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता. मंगळवारी जुन्या वादातून…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणाचा वाद मोठा होत असतांना दिसत असतांना नुकतेच राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची अचानक घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. मात्र, आज शरद पवार यांनी त्या भेटीमागील उद्देश देखील सांगितला. आरक्षणासंदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत विरोधक का सहभागी झाला नाही. विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला, रणनीती कुठे चुकली व बारामती लोकसभेतील लोक सुप्रिया सुळेंच्या पाठिशी कसे उभे राहिले यावर पवारांनी स्पष्ट भाष्य केले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. छगन भुजबळ घरी आले, ते मला भेटले, त्यांनी…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी स्टायपंड देण्याच्या योजनेची घोषणा केली. बारावी झालेल्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार, पदवी (डिग्री) झालेल्या तरुणांना महिन्याला १० हजार रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज बुधवारी (दि.१७) पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने बोलताना जाहीर केले. तो वर्षभर कारखान्यात अप्रेंटशिप करेल आणि त्याला तिथे नोकरी लागले. यामु‍ळे कौशल्यपूर्ण असे मनुष्यबळ उद्योजकांना मिळेल. पण अप्रेंटशिपचे पैसे सरकार भरेल, असे शिंदे यांनी सांगितले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा केली. यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई शंकर अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. राज्यातील जनतेला सुखी, समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, असे मागणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी मागितले. आषाढी सोहळा आज बुधवारी (दि. १७) भक्तिमय वातावरणात व प्रचंड उत्साहात साजरा होत आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडा बुद्रुक गावातून चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा (क्र. एमएच १९, एपी ५०७६) शोध घेत असताना ते रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (३२, रा. सावखेडा बुद्रुक) याने चोरल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर पोउनि राहुल तायडे, गणेश वाघमारे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील, ईश्वर पाटील यांनी मंगळवारी (१६ जुलै) रमेश सोनवणे याला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी दीड महिन्यापूर्वी नाशिक येथून दुचाकी चोरून जळगावात फिरवणाऱ्या कुणाल ललित तिवारी (१९, रा. लक्ष्मण भाऊ नगर, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (१६ जुलै) पहाटे अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करत त्याला नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील यांचे पथक तयार केले. त्यात नाशिक येथून जळगावातील एकाने दुचाकी (क्र. एमएच १५, एचके २९६५) चोरल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने मंगळवारी पहाटे पेट्रोलिंग दरम्यान…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शेतात कामाला जात असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अलका विजय कोळी (३६, रा. श्रीराम चौक, असोदा रोड) या ठार झाल्या. ही घटना मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ८:३० वाजता घडली. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील अलका कोळी या पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. त्यांचे पती विजय कोळी हे महावितरणमध्ये वायरमन आहेत, तर त्या शेतमजुरी करायच्या, मंगळवारी १६ जुलै रोजी सकाळी इतर महिलांसोबत त्या शेतात जात असताना आसोदा रेल्वे गेटजवळ रेल्वेरूळ ओलांडताना अचानक धावत्या रेल्वेचा त्यांना धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Read More

जळगाव : प्रतिनिधी रावेर तालुक्यातील एका धार्मिक संस्थानचे बनावट फेसबुक खाते तयार करून देवी-देवतांसह संस्थान पदाधिकाऱ्याचे छायाचित्र व अन्य आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ७ ते १५ जुलैदरम्यान घडला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात खाते वापरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यात असलेल्या या धार्मिक संस्थानच्या नावाने एका जणाने बनावट फेसबुक खाते तयार केले. त्यावर देवी-देवतांचे छायाचित्र अपलोड केले. तसेच फोटो स्टोरीमध्ये संस्थानच्या पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरले. त्यानंतर या खात्यावर आक्षेपार्ह छायाचित्र अपलोड करण्यात आली. यातून त्या संस्थानची व पदाधिकाऱ्यांची बदनामी झाली. या प्रकरणी संस्थानच्या पुजाऱ्यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सुभाषवाडी येथील बद्रीसिंग पुना चव्हाण (५८) यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (१६ जुलै) सकाळी बाहेर खेळत असलेला नातू घरात पाणी पिण्यासाठी गेला, त्यावेळी ही घटना समोर आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, बद्रीसिंग चव्हाण हे पत्नी, दोन मुले आणि सुना यांच्यासोबत राहत होते. त्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. मंगळवारी सकाळी त्यांची पत्नी, दोन्ही मुले व सुना शेतात गेले होते. नातू आणि बद्रीसिंग चव्हाण हे घरी होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांनी घरात गळफास घेतला. नातू घरात आला, तेव्हा घटना उघडकीस आली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत…

Read More

मेष आज तुमची मनोकामना पूर्ण होईल. एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीचं मार्गदर्शन मिळेल. त्याचं सानिध्य मिळेल. त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. व्यापारात उन्नती होईल. नोकरीत मन लावून आणि प्रामाणिकपणे काम करण्याच्या तुमच्या गुणाची तारीफ होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर प्रभावीत होतील. एखाद्या जुन्या प्रकरणाचा तुमच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. व्यापारी असाल तर जीभेवर नियंत्रण ठेवा. मोठं नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खास आहे. वृषभ आज राग आणि जीभेवर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात कुणाशी तरी अकारण वाद होऊ शकतो. उद्योगात वारंवार निर्णय बदलू नका. त्यामुळे स्थैर्य जाते. नोकरी शोधणाऱ्यांसाठी भटकंती करावी लागणार आहे. धर्मकार्यात भाग घ्याल. मित्रांकडून धोका होण्याची शक्यता आहे. उधारी देऊ…

Read More