• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सातबाऱ्यावर लागणार आईचे नाव ; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

editor desk by editor desk
September 13, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
सातबाऱ्यावर लागणार आईचे नाव ; सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात लाडकी बहिण योजना जोरदार सुरु असतांना नुकतेच राज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लावण्याच्या निर्णयानंतर महायुती सरकारने सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ नोव्हेंबर २०२४ रोजी पासून करण्यात येणार आहे.

महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाची म्हणजे सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ नोव्हेंबर २०२४ रोजी पासून करण्यात येणार आहे. जर १ मे २०२४ रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर त्यावर त्या व्यक्तीच्या आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर वडिलांचे नाव लावणे बंधनकारक नाही आहे. जर संबधित व्यक्तीची इच्छा असेल तरच वडिलांचे नाव लावू शकते.

जर आहे त्या सातबारा उताऱ्यात कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर, त्यावर आईचे नाव लावले जाणार आहे. जर एखादी महिला विवाहित असेत तर तिला पती किंवा वडिल यापैकी कोणाचेही नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे. राज्य सरकारने मान्यता दिल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जमिनीबाबत माहिती देणारा सातबारा मराठीसह २४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. गेल्या वर्षी मोदी सरकारने सातबारा मराठीसह २४ भाषांमध्ये उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. आणि या निर्णयाची अंमलबजाबणी प्रथम महाराष्ट्रात झाली.

Previous Post

रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल : आमदार – खासदारांनी केली सोय !

Next Post

आर्थिक कारणांमुळे काही महत्त्वाची कामे अपूर्ण राहणार !

Next Post
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !

आर्थिक कारणांमुळे काही महत्त्वाची कामे अपूर्ण राहणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !
कृषी

महायुती सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा : आता शेतरस्त्याची होणार नोंद !

May 24, 2025
दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !
क्राईम

दुचाकी व पिकअपचा अपघात : दोन जण ठार !

May 24, 2025
भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !
क्राईम

भुसावळच्या तरुणाने हरयाणातील डॉक्टराला १७ लाखात फसवले !

May 24, 2025
वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !
क्राईम

वृद्ध आजोबांचा आधारच हिरावला : नातवाचा आजाराने मृत्यू !

May 24, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून चांगली बातमी मिळणार !

May 24, 2025
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते योजनांचा थेट लाभवाटप

May 23, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group