लातूर : वृत्तसंस्था लोकसभेच्या महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश आल्यानंतर आता महाविकास आघाडी राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली असून आता कॉंग्रेस देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी सज्ज झाली असून नुकतेच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले हे मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित तीन खासदारांचा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते लातूरमध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर कर्नाटक सारखी महालक्ष्मी योजना सुरू करू, असा दावा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेच्या विरोधात काँग्रेसने ही नवी रणनीती आखली असल्याचे बोलले जात आहे. राज्य…
Author: editor desk
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या १ ऑगस्टपासून राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले असल्याने ते सध्या मराठवाडा दौऱ्याचा आज समारोप होत असून १ वाजेच्या दरम्यान त्यांचे शहरात आगमन झाले. हर्सुल परिसरात येताच मोठ्या उत्साहात जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यानंतर राज ठाकरेंचा ताफा पुढे रवाना झाला. यावेळी राज ठाकरे म्हणाले कि, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागून शरद पवार व उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आपल्याकडे सध्या केवळ जातीचे राजकारण केले जाते. जातीच्या राजकारणातून जनतेची माथी भडकवली जात आहेत. काल बीडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या पोरांनी मार मार…
चाळीसगाव : प्रतिनिधी रुग्णवाहिकेतून नाशिक येथे नेत असताना रुग्णवाहिकेतील अपघाग्रस्त युवकाचा मृत्यू झाला. तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी सायंकाळी कळवाडी फाट्यानजीक घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. ज्ञानेश्वर हरी बच्छे यांचा काही दिवस आधी दुचाकीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात आले. सायगाव येथे परतल्यावर त्यांना पुन्हा मुत्रपिंडाचा त्रास जाणवू लागला. त्यांना नाशिक येथे रुग्णवाहिकेने जात असताना शुक्रवारी सायंकाळी कळवाडी फाट्याजवळ अपघात झाला. त्यात बच्छे (वय २७) यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. त्यांच्या रुग्णवाहिकेची धडक अन्य चारचाकी वाहनाशी झाली. बच्छे हे सायगाव परिसरातील भजनी मंडळात वादक म्हणून काम करत होते. काही…
जळगाव : प्रतिनिधी घर बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये आणावेत, तसेच लग्नात एसी व बुलेट दिली नाही म्हणून उजमाबी रिजवान शेख (वय २४) या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांत पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वर्ष २०१९ पासून ते जुलै २०२४पर्यंत सुरू होता. तसेच पतीने २२ जून २०२४ रोजी ‘मी तुला पहिला तलाक देत आहे’ असा मजकूर लिहून पत्र पाठविले. याप्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती रिजवान मोहम्मद रफिक शेख याच्यासह सासरच्या चारजणांविरुद्ध बीएनएस कलम ८५, ११५(२), ३५२, ३ (५), मुस्लिम महिला विवाह अधिनियम २०१९ कलम ४ प्रमाणे…
जळगाव : प्रतिनिधी शहराच्या आमदारांना महापालिकेत सत्तेच्या माध्यमातून नियोजन करता आले नाही. तसेच शहरातील अनेक कामेही विकासात्मक झाली परंतु त्या दर्जाची झाली नाही. भाजपाच्या पाठीशी पारंपारिक असलेला कोळी समाज हा ‘मामा’च्या कामगिरीवर नाराज असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. तसेच मराठा समाजही अंतर ठेवून असल्याने आगामी निवडणुकांमध्ये हे चित्र जळगाव शहरासाठी भाजपाला धक्कादायक ठरणार आहे. जळगाव शहर भाजपाचा बालेकिल्ला आहे. परंतु शहरात पाहिजे त्या प्रमाणात लोकप्रतिनिधीकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही. मामा फक्त मामा पार्टी असे म्हणण्याची वेळ आली आहे. स्वभावाने खूप चांगले आहेत परंतु व्हिजन हे फार नसल्यामुळे शहराची वाताहात होत असतांना दिसत आहे. जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था…
जळगाव : प्रतिनिधी नेहमीच विविध निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता तशी उपभोगली परंतु गेल्या पाच वर्षातील आर्थिक आलेख पाहता गद्दारी व खोक्यांमुळे फार मोठा उंचावला असून जळगाव शहरातील सहकाराची शंभर कोटीची जागा केवळ पाच ते सहा कोटीमध्ये पचवल्याचे प्रकरण ताजे आहे. हे सर्व खोक्यांच्या मस्तीवर चालू आहे. सत्तेचा कसा उपभोग करायचा हे खोक्यावाल्याकडून समजून घ्यावे. सहकार विभागाचे उपनिबंधक यांना हाताशी धरून कागदाची फेरफार करून पद्धतशीरपणे शंभर कोटीची जागा पाच ते सहा कोटी मध्ये या गद्दाराच्या पुत्राने पचवली असल्याचे समोर आहे. विशेष म्हणजे शासनाचे दोन ते तीन कोटी रुपये नजरांना रक्कम देखील सत्तेच्या बळावर भरली नाही. महसूल विभागाला मॅनेज करून ते तीन कोटी…
मेष राशी उद्योगात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या ठिकाणी सजावटीवर लक्ष दिले जाईल. नोकरीमध्ये इच्छित ठिकाणी बदली होईल. एखाद्या महत्त्वाच्या कामातील अडचण दूर होईल. राजकारणात वर्चस्व मिळेल. संघर्षाची स्थिती वाढेल. कला, अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. कुटुंबात एखाद्या शुभ कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कुशल व्यवस्थापनाचे कौतुक होईल. बौद्धिक कार्यात चांगली बुद्धिमत्ता असेल. विदेश प्रवासाला जाऊ शकता. गृहस्थ जीवनात जीवनसाथीकडून सहकार्य आणि साथ मिळेल. व्यापारात नवीन मित्र फायदेशीर ठरतील. वृषभ राशी वाहन अपघात होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जास्त ताणतणाव असल्यामुळे मानसिक तणाव वाढेल. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. व्यवसायात खर्च जास्त…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच हैदराबादहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका प्रवासी बसला अचानक आग लागल्याची थरारक घटना हवेली तालुक्यातील पुणे – सोलापूर मार्गावर घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. पण संपूर्ण बस भस्मसात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरील कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत ग्रँड हॉटेलपुढे शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमरास ही घटना घडली. या बसमधून 17 प्रवाशी प्रवास करत होते. ही बस हैदराबादहून पुण्याच्या दिशेने येत होती. अचानक बसधून धूर निघत असल्याची बाब प्रवाशांच्या लक्षात आली. हे पाहून त्यांनी एकच आरडाआरोडा सुरू केला. यामुळे चालकाने तत्काळ बस…
नाशिक : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झालेल्या सभेत बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, लोकसभेला जो झटका दिला तो जोरात लागला, कंबर मोडली, आमची चूक झाली, माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांसमोर चुकीची कबूल दिली आहे. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, वीज बिल माफ केले, असे निर्णय घेतले असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही अभ्यास करणारी माणसे आहोत. हवेत गप्पा मारणारे नाही. केंद्र सरकार आमच्या विचारांचे आहे. आता कांदा निर्यात…
जळगाव : प्रतिनिधी माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कामगार निरीक्षकाला ३६ हजारांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती दिल्यानंतर त्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त येथे सुनावणी सुरू असतांना निकाल लावण्यासाठी लावून देतो असे सांगून ५० हजारांची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चंद्रकांत पाटील वय ५७, रा. जळगाव) असे अटक केलेल्या कामगार निरीक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहेत. ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी…

