जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील तरुणाचा त्याच्याच मित्राने निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून नदीपात्रात शोध घेतल्यानंतर तब्बल ९ तासांनी त्याचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत असून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शिवारातील डोलारखेडा भागात कुंड परिसरात आज शुक्रवार दि. १९ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली. नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, असोदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे…
Author: editor desk
जालना : वृत्तसंस्था राज्यात सध्या आषाढी एकादशीनिमित्त अनेक भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना दुचाकीला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव काळीपिवळी जीप विहिरीत कोसळली. या विचित्र अपघातात सात जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. जालना – राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारातील वसंतनगर येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पंढरपूरहून परतणारे ६ वारकरी, तर एका प्रवासी महिलेचा समावेश आहे. मृतांपैकी पाच जण बदनापूर तालुक्यातील चनेगावचे, एक भोकरदन तालुक्यातील तुपेवाडी, तर एक जण खामखेडा येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील चनेगाव, तुपेवाडी, राजूर येथील भाविक हे १५ दिवसांपूर्वी आषाढीनिमित्त पंढरपूर येथे अगस्त ऋषी महाराज…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील लोंढरी बु., येथे पैशाच्या व्यवहारातून जावयाने सासऱ्याच्या पोटात चाकू मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जावई अटकेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई अमोल कृष्णा ठुबे (लोंढरी) याच्याकडे सासरे कैलास रामधन पाटील (सवतखेडा) यांचे पैसे घेणे होते. या व्यवहारासाठी अमोल याने बुधवारी सासरे कैलास पाटील यांना घरी बोलावून घेतले. यादरम्यान दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीत रूपांतर झाले. यावरच अमोल न थांबता त्याने चक्क सासऱ्याच्या पोटात खोलवर चाकू घालून आतडे बाहेर काढून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या जबाबात कैलास पाटील यांनी म्हटले आहे. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, पोलिस…
जळगाव : प्रतिनिधी बालाजीपेठ परिसरातून एका वृध्दाच्या उघड्या घरातून १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी दुपारी साडेतीन वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओंकार सोनवणे (वय २०, रा. रिधूरवाडा ता. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप कन्हैय्या प्रजापती (वय ६२, रा. ओम नगर) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्यांचे बालाजी पेठमधील ओम नगरात जुने घर आहे. त्या ठिकाणी ते जेवण करून आराम करण्यासाठी जात असतात. ते दरवाजा उघडा ठेवून पलंगावर झोपले असतांना संशयिताने घरात घुसून १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील राखुंडे नगरातील रहिवासी असलेल्या एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणास तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवीत चारचाकी वाहनातून अपहरण करीत मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेली माहितीनुसार, सटाणा गावाजवळील पेट्रोलपंपावर अपहरणकर्ते गाडीत पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता या तरुणाने आरडाओरड केल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांमुळे या तरुणाची सुटका झाली. या प्रकरणी १८ रोजी अनिकेत महेंद्र उर्फ बाळू मोरे, कृष्णा जिभाऊ झालटे, मेहुल मोरे (सर्व चाळीसगाव) यांच्यासह तीन अनोळखी इसमांच्या विरोधात कलम १०९, १७३ (२), १४० (१), १४० (२), १४२ आणि ६०नुसार गुन्हा दाखल झाला आहे. १७ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कल्पेश सुनील पाटील हा…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील सांगवी येथील ऊसतोड मुकादम महादू राठोड यांना संत मुक्ताई शुगर फॅक्टरी घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) यांच्याकडील उचलचे पैसे देणे-घेणे असल्याच्या कारणावरून पाच जणांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर संत मुक्ताई शुगर फॅक्टरीत एका खोलीत डांबून ठेवले. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा १६ रोजी रात्री दाखल करण्यात आला आहे. यात कारखान्याचे शेतकी अधिकारी, कृषी सहाय्यक, ऊस पुरवठा अधिकारी, गेट सुपरवायझर व वाहन चालकांचा समावेश आहे. ही घटना २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकी अधिकारी मुकेश भामरे, कृषी सहाय्यक विठ्ठल तिवटे, ऊस पुरवठा अधिकारी संदीप कोळी, गेट सुपरवायझर नरेंद्र पाटील आणि चालक प्रमोद…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूण परिसरातील मंगलपुरी भागात घरासमोर गप्पा करीत असलेल्या पाच महिलांसह दोन चिमुरड्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. या घटनेत शोभा रमेश पाटील (वय ६०, रा. साईप्रसादनगर) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला असून, चार महिलांसह दोन चिमुरडे जखमी झाले आहेत. पवन कैलास पाटील (वय २५, रा.सप्तशृंगी नगर) असे संशयिताचे नाव असून त्याने ब्रेकऐवजी अॅक्सिलेटरवर पाय ठेवल्याने ही घटना घडल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, दरम्यान, या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुरड्यासदेखील दुखापत झाली आहे. सुदैवाने चिमुरड्यांचे…
अमळनेर : प्रतिनिधी कर्जबाजारी झाल्याने सुनील मधुकर पाटील (माळी) (४०) या इसमाने मध्यरात्रीच्या बुधवारी सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. येथील जिल्हा बँक शाखेच्या स्वच्छतागृहात गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षापूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाले होते. मोठा भाऊ रवींद्र आणि वयोवृद्ध आईवडील हे तीनही कुटुंब विभक्त राहत होते. परेश व निखिल या शाळकरी या दोन मुलांसह सुनील हा आठ दिवसांपूर्वीच बँकेशेजारच्या घरात भाडेकरू म्हणून राहायला आला होता. बुधवारी रात्री आषाढी एकादशीनिमित्त गावात रात्री पालखी मिरवणूक होती. सुनील याने रात्री उशिरा शेजारीच असलेल्या स्वच्छतागृहात दोरीने गळफास घेतला असावा असा अंदाज आहे. गुरुवारी सकाळी मुलांना जाग आल्यावर त्यांनी शोधाशोध…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अधिक लाभाचा आणि शांतीचा दिवस असेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात सामान्य चढ-उतार होतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारा. नोकरी करणाऱ्या लोकांना फायदा आणि प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात नवीन उत्पन्नाच्या स्त्रोताचा फायदा होण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या कामात सावध राहा. भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वृषभ राशी व्यवसायातील योजना गुप्तपणे पार पाडा. अन्यथा, कोणत्याही विशिष्ट शत्रूला माहिती मिळाल्यास, तो विघ्न आणू शकतो. नोकरदार किंवा व्यवसायात काम करणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवा. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्हाला उच्च यश आणि सन्मान मिळेल. राजकारणात तुम्हाला काही महत्त्वाच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशमधील गोंडा रेल्वे स्थानकाजवळदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना आज (दि.१८ जुलै) दुपारी घडल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्याचे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. संबंधित घटनेचा तपशील अपडेट होत आहे.

