• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात भीषण अपघात : ६ वारकऱ्यांसह ७ ठार !

editor desk by editor desk
July 19, 2024
in क्राईम, राज्य
0
राज्यात भीषण अपघात : ६ वारकऱ्यांसह ७ ठार !

जालना : वृत्तसंस्था

राज्यात सध्या आषाढी एकादशीनिमित्त अनेक भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना दुचाकीला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव काळीपिवळी जीप विहिरीत कोसळली. या विचित्र अपघातात सात जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. जालना – राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारातील वसंतनगर येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पंढरपूरहून परतणारे ६ वारकरी, तर एका प्रवासी महिलेचा समावेश आहे. मृतांपैकी पाच जण बदनापूर तालुक्यातील चनेगावचे, एक भोकरदन तालुक्यातील तुपेवाडी, तर एक जण खामखेडा येथील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील चनेगाव, तुपेवाडी, राजूर येथील भाविक हे १५ दिवसांपूर्वी आषाढीनिमित्त पंढरपूर येथे अगस्त ऋषी महाराज तपोवन यांच्या दिंडीत पायी गेले होते. गुरुवारी दुपारी ते पंढरपूरहून एसटीने जालना बसस्थानकावर आले. पंढरपूरच्या यात्रेमुळे बसेसची संख्या कमी असल्याने ते काळीपिवळी (एमएच २१-३८५०) जीपमध्ये बसून राजूरकडे निघाले हाेते. या वाहनात १४ पेक्षा जास्त प्रवासी असल्याचाही संशय आहे. त्यामुळे हे चारचाकी वाहन विहिरीबाहेर काढल्यानंतरही पाण्यात गळ टाकून मृतदेहांची शोधमोहीम उशिरापर्यंत सुरू होती. जालना,भोकरदन व अंबड येथील प्रत्येकी एक अग्निशमन दलाचे वाहनही मदत कार्यासाठी येथे दाखल झाले होते. अपघाताची माहिती मिळताच राजूर, तपोवन, तुपेवाडी, वसंतनगर तांडा भागातील रहिवाशांनी बचावकार्यासाठी धाव घेतली. दहा ते बारा मिनिटांतच बचावकार्य सुरू केले. तरुणांनी दोरीच्या साहाय्याने पाण्यात उतरून प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, तर जखमींवर उपचारांचा खर्च सरकार करणार आहे, अशी माहिती आमदार नारायण कुचे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांनी हे जाहीर केले.

जवळपास १४ जण कोंबलेले होते. राजूर ८ किमीवर असताना एका दुचाकीस्वार अचानक जीपसमोर आला. त्याला वाचवण्याच्या नादात जीपचालकाचे नियंत्रण सुटले व भरधाव जीप रस्त्याच्या बाजूला पाच ते सहा फूट अंतरावरील कठडे नसलेल्या विहिरीत कोसळली.  पोलिस येण्यापुर्वीच काही मृतदेह तसेच जखमी प्रवाशांना नागरिकांनी विहिरीबाहेर काढले. काही वेळातच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले व क्रेनच्या साहाय्याने जीपही बाहेर काढण्यात आली. जखमींना राजूर येथील रुग्णालयात, तर काहींना जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

भगवान मालुसरे (रा. तपोवन), आर. पी. तायडे, सखुबाई प्रल्हाद महाजन (दोघे रा. चनेगाव, ता. बदनापुर), चालक बाबूराव हिवाळे ( मानदेऊळगाव, ता. जालना) हिंमत चव्हाण (तपोवन तांडा,ता. बदनापूर), ताराबाई गुळमकर ( चनेगाव, ता. बदनापूर), अशोक पुंगळे (रा. राजूर, ता. भोकरदन) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

Previous Post

पैशाच्या वादातून सासऱ्याच्या पोटात मारला चाकू ; जावई अटकेत

Next Post

उसनवारी पैश्याचा वाद : जळगावातील तरुणाचा खून करून मृतदेह फेकला नदीत !

Next Post
उसनवारी पैश्याचा वाद : जळगावातील तरुणाचा खून करून मृतदेह फेकला नदीत !

उसनवारी पैश्याचा वाद : जळगावातील तरुणाचा खून करून मृतदेह फेकला नदीत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group