जळगाव : प्रतिनिधी पटेल जहाँआरा अब्दुल मुनाफ यांना त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल मौलाना अबुल कलाम आझाद ग्रंथालय, रावेर यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा सन्मान असून, त्यांच्या दीर्घकालीन सेवेमुळे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी केलेल्या मेहनतीमुळे त्यांना हे मानपत्र मिळाले आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेले डॉ. करीम सर (अध्यक्ष, इकरा एज्युकेशन सोसायटी), डॉ. हारून (अध्यक्ष, डायमंड एज्युकेशन सोसायटी), प्रल्हाद पाटील (जि. प. अध्यक्ष) आणि दारा मोहम्मद (नगराध्यक्ष, रावेर) यांनी पटेल जहाँआरा यांच्या कार्याचे कौतुक केले. या मान्यवरांनी आपल्या भाषणात त्यांच्या शैक्षणिक पद्धती, विद्यार्थ्यांवरील निष्ठा, आणि समाजातील योगदानाची…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी किराणा साहित्यासह सर्वच वस्तूंचे भाव वाढत असताना चोरट्याने सुपर शॉपमधून रोख रकमेसह तांदळाच्या २५ गोण्या, तेलाचे १० बॉक्स (१ एक लिटरचे १०० पाऊच) चोरून नेले. ही चोरी करताना बाहेरील सीसीटीव्ही कॅमेराला कापड बांधून व आतील कॅमेरा तोडून चोरट्याने चोरी केली. ही घटना दि. ४ ते ५ ऑक्टोबर दरम्यान शेरा चौकात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किराणा व्यावसायिक कच्छी इब्राहिम अब्दुल सत्तार (५१, रा. शेरा चौक) यांचे घरापासून काही अंतरावर सहाना सपर शॉप आहे. ४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सुपर शॉपच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कापड बांधन दोन…
जळगाव : प्रतिनिधी बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छतेचे काम करत असताना तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून पडल्याने प्रमिलाबाई शंकर चव्हाण (५५, रा. सुप्रीम कॉलनी) या गंभीर जखमी झाल्या. ही घटना २ ऑक्टोबर रोजी औद्योगिक वसाहत परिसरात ई- सेक्टरमध्ये घडली. याप्रकरणी सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याच्या तक्रारीवरून ६ ऑक्टोबर रोजी बांधकाम मालक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ई-सेक्टरमध्ये एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे साफसफाई करून वेस्ट मटेरियल खिडकीतून फेकत असताना प्रमिलाबाई चव्हाण यांचा तोल जाऊन त्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्या व गंभीर जखमी झाल्या. बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम मालक धीरज युवराज महाजन आणि ठेकेदार शेख अल्ताफ शेख उस्मान यांनी बांधकामाच्या ठिकाणी मजुरांसाठी सुरक्षेच्या…
मेष राशी कामाच्या ठिकाणी संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. परिस्थिती अनुकूल राहील. धर्मादाय कार्यात तुमची आवड वाढेल. कार्यक्षेत्राच्या दृष्टीकोनातून काही उत्तरेकडे वाढ होईल. अधिक परिश्रम करून व्यावसायिक जीवनमानात सुधारणा होईल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. ते तुमचा फायदा उठवू शकतात. वृषभ राशी तुमचे महत्त्वाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपले वर्तन नम्र ठेवा. राग टाळा. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात लोकांना नोकरीच्या वाढत्या संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. संयमी वर्तन ठेवा. तुम्हाला विशेष यश आणि सन्मान मिळेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना महत्त्वाची पदे मिळतील. व्यापाराता आलेलं विघ्न दूर होईल. मिथुन राशी समाजातील प्रतिष्ठित…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी भाजपच्या नाराज नेत्यांना आपल्या सोबत घेवून विधानसभेला सामोरे जात आहे. त्यापूर्वी आता अजित पवार गटातील नेत्याना आपल्या सोबत घेणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगू लागली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपला धक्का मानला जात आहे. भाजपचा मोठा मोहरा आपल्या हाती घेतल्यानंतर आता शरद पवार यांनी अजित पवार गटातील नाराज नेत्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेश सोहळ्यादरम्यान केलेल्या भाषणात शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. आता मी फलटणला…
बडोदा : वृत्तसंस्था गुजरातमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अंबाजी सोमवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 35 हून अधिक जण जखमी झाले. ५ ते ६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजीतील त्रिशूलीया घाटात बसचे नियंत्रण सुटून दरीच्या रेलिंगला धडकून बस उलटून अपघात झाला. जखमींना पालनपूर आणि अंबाजी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका प्रवाशाने सांगितले की, घाटावर बस चढत असताना ड्रायव्हर मोबाइलने रील बनवत होता. आम्ही त्याला मनाई केली होती तरीही तो रील बनवण्यात व्यस्त राहिला. दरम्यान, घाटावरील हनुमान मंदिराजवळ रेलिंगला धडकल्याने बस पलटी झाली. चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याचवेळी बसमधील काही प्रवाशांनी…
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणूक यंदा दिवाळीनंतर होणार असल्याचे चित्र असल्याने सरकारने यंदाची दिवाळी लाडक्या बहिणींना गोड केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत २.५२ कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील दोन कोटी ४१ लाख ३५ हजार महिलांचे अर्ज पात्र ठरले असून त्यांच्यासाठी दरमहा ३६२० कोटींची गरज आहे. आतापर्यंत एक कोटी ८५ लाखांहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. विधानसभा आचारसंहितेची शक्यता असल्याने सध्या जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या पात्र अंदाजे दीड कोटी महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबर, नोव्हेंबरचे ॲडव्हान्स हप्ते (प्रत्येकी तीन हजार) दिले जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले असतांना नुकतेच भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या या प्रवेशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रत्युत्तर दिली आहे. या संदर्भातला प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर तुम्ही नवीन काय सांगताय? ही तर जुनी न्यूज आहे. ती आजची न्युज थोडीच आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघावर अजित पवार यांच्या पक्षाचा दावा आहे. विद्यमान आमदार…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अनेक कार्यकर्त्यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. कुसुंबा माजी सरपंच भाऊलाल नामदेव पाटील यांचे चिरंजीव मयुर भाऊलाल पाटील विकास सोसायटी सदस्य. तसेज ग्रा. पंचायत सदस्य बापूराव देवराम पाटील यांचे चिरंजीव किरण बापु पाटील. किरण पाटील अमोल पाटील, भूषन पाटील गिरीश पाटील, पंकज पाटील राहुल पाटील, पवन पाटील, वेदांत पाटील, साई पाटील, बंटी पाटील, चेतन पाटील अक्षय पाटील, विकास गायकवाड, समाधान कोळी, रामभाऊ पाटील, कार्तिक पाटील, करण पाटील, रोहित पाटील यांनी आज पाळधी येथे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील , जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या…
जळगाव : प्रतिनिधी घराकडे का पाहतो? असा जाब विचारल्याच्या कारणावरून गोपाल भगवान पाटील (४०, रा. देव्हारी, ता. जळगाव) यांच्यासह भांडण सोडविण्यासाठी आलेल्यास तीन जणांनी मारहाण करीत विळ्याने वार केला. ही घटना तालुक्यातील देव्हारी येथे शनिवारी (५ ऑक्टोबर) घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल पाटील यांच्या घराकडे एक जण पाहत जात होता. त्याला याविषयी विचारणा केली असता या रागातून पाटील यांना तीन जणांनी शिवीगाळ करून विळ्याने वार करीत दुखापत केली. भांडण सोडविण्यासाठी कैलास भगवान पाटील हे तेथे आले असता त्यांच्यावरही वार करण्यात आला.

