भुसावळ : प्रतिनिधी शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी नितीन पथरोड याचा नंदुरबार येथे उपचार घेत असतांना मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहराचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे २९ मे रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान भुसावळ शहरातील जुना सातारा रोडवरून रस्त्याने कारमधून येत होते. त्यावेळी जुन्या वादातून राजेश सूर्यवंशी व बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून काही हल्लेखोरांनी त्यांच्या कारचा रस्ता अडवून त्यांच्यावर गोळीबार केल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी श्री वज्रेश्वरी देवी गणेश मित्र मंडळा तर्फे मंडळाचे सभासद दि. ३१ ऑगस्ट रोज़ी श्रीं ना आणायला मुंबई येथे रवाना झाले होते. श्रीं ची मूर्ती मुंबई येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार उदय खातू यांच्या कारखान्यात साकार झाली. सुवर्णनगरी जळगाव शहरात येण्या आधी लालबाग मुंबई येथे स्वरशाही ढोल ताशा व ध्वज पथक यांच्या विशेष आकर्षणात श्रीं चा प्रस्थान सोहळा करण्यात आला. यंदा मंडळाचे १५ वे वर्ष आहे आणी यंदा रुद्राक्ष वाटप ही करण्यात आले.यंदा मंडळाने भव्य असे आदियोगी मंदिर, कोयम्बटूर येथिल आरास साकारली आहे. तसेच विसरजन मिरवणुकीत केरळ येथिल ढोल पथक याचे विशेष आकर्षण आहे. मंडळाची कार्यकारणी पुढील प्रमाणे संस्थापक अध्यक्ष…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील शिवरे दिगर येथील सारंग माध्यमिक विद्यालयात आयोजित भंडाऱ्यानंतर तब्बल ७० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांवर पारोळा कुटीर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला. मिळालेली माहिती अशी कि, शाळेत भंडाऱ्याचा कार्यक्रम दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी भोजन केले आणि घरी परतले. मात्र काही वेळानंतर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. हळूहळू अनेक विद्यार्थ्यांना अस्वस्थता जाणवू लागली. पालकांनी घाबरून या मुलांना तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात आणले, जिथे जवळपास ७० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनी तातडीने विद्यार्थ्यांवर उपचार केले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर…
जळगाव : प्रतिनिधी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण राहण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून महामार्गावर गतिरोधक टाकण्याची विनंती केली होती. अखेर शुक्रवारी दि. १३ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक टाकण्याचे काम सुरू झाले आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भीषण अपघात होऊन तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर काही जण जखमी देखील झाले होते. या पार्श्वभूमीवर जनमानस संतप्त झाले होते. काही नागरिकांनी आंदोलन देखील केले होते. त्यामुळे शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी दालनात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध सूचना मांडल्या होत्या. त्यामध्ये महामार्गावर अपघात होण्याचे…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भऊर शिवारात झाडावरून बिबट्याने उडी घेत शेळ्यावर हल्ला चढविला यात पाच शेळ्या ठार झाल्या आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली. याबाबत वन विभागाने पंचनामा केला आहे. परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भऊर शिवारात जामदा स्टेशनजवळ ज्योती किशोर पाटील यांचे शेत आहे. त्या शेतातच राहतात. शेतात तारेच्या जाळ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. गुरुवारी रात्री बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांनी पाहिले. बिबट्या गेल्यानंतर त्यांनी पाहिले असता चार शेळ्या मृत झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. तर एका शेळीचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत.…
जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेतून पडल्याने कमल रेवाराम पटेल (५३, रा. लोणारा, जि. खरगोन, मध्य प्रदेश) या परप्रांतीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (१२ सप्टेंबर) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली रेल्वेस्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१२ सप्टेंबर) रात्री सव्वानऊ वाजेच्या दरम्यान जळगाव ते भादली रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे खांबा क्रमांक ४२४/१४ ते ४२४/१६ दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ सुधाकर शिंदे व जयेंद्रसिंग पाटील हे घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. या प्रकरणी सुरुवातीला तालुका…
जळगाव : प्रतिनिधी भांडण सोडविण्यासाठी गेलेले चेतन वसंत देऊळकर (२१, रा. कुसुंबा, ता. जळगाव) व त्यांच्या मित्राला चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना गुरुवारी (१२ सप्टेंबर) चिंचोली येथे शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाठिकाणी घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिंचोली येथे सुरू असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाठिकाणी काहींचे भांडण सुरू होते. त्यावेळी चेतन देऊळकर व त्यांचे मित्र भांडण सोडविण्यासाठी गेले असता, चौघांनी शिवीगाळ केली तर एकाने चेतन यांच्या डोक्यात लोखंडी सळई मारली. दाखल केला आहे. तालुक्यातील चिंचोली येथे सुरू असलेल्या शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाठिकाणी काहींचे भांडण सुरू होते. त्यावेळी चेतन देऊळकर व त्यांचे मित्र…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथील बस स्थानकावर एसटी बसमध्ये बसत असताना मागील चाकाखाली आल्याने कमलबाई रामराव अंडाईत ही ८१ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली. या महिलेचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्रीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव येथील बस स्थानकावर रावेर एसटी आगाराची बऱ्हाणपूर ते सुरत ही बस (क्रमांक एमएच २०/ बीएल ३३९७) घेऊन चालक खेमचंद तेली (वय ४२) हे यावलकडून चोपड्याकडे जात होते. दरम्यान, बस स्थानकावर बस लावत असताना बसमध्ये बसण्याकरिता प्रचंड गर्दी होती. या दरम्यानच गर्दीमध्ये मागच्या चाकात कमलबाई रामराव अंडाईत (रा. अहमदाबाद, गुजरात) या अडकल्या आणि त्यांच्या दोन्ही पायांवरून बसचे मागील…
जळगाव : प्रतिनिधी पत्नी मुलांसह माहेरी गेलेली असताना घरी एकट्याच असलेल्या इरफान शेख सुलतान (२८, रा. तांबापुरा) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारी राहणारे वडील शुक्रवारी सकाळी इरफान यांना बोलविण्यासाठी गेले त्यावेळी ही घटना समोर आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामाच्या ठिकाणी टाईल्स फिनिशिंगचे काम करणारे इरफान शेख हे पत्नी व मुलांसह तांबापुरा परिसरात राहत होते. शेजारी त्यांचे आई-वडील देखील राहतात. तरुणाची पत्नी मुलांसह दोन दिवसांपासून माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे ते घरी एकटेच होते. गुरुवारी रात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. शुक्रवारी (१३ सप्टेंबर) सकाळी ८ वाजता त्यांचे वडील मुलाला कामावर…
यावल : प्रतिनिधी फुलगावजवळच्या हॉटेलवरून रात्रीच्या वेळी ट्रक चोरीस गेल्याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात चोरीत फिर्यादी ट्रक चालकाचाच सहभाग असल्याचे समोर आले असून, या ट्रक चालकासह अन्य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक अरबाज खान तस्लीम (वय २७, रा. पाळधी, ता. धरणगाव) हा त्याच्या ताब्यातील ट्रक (एम. एच. ४३ – /वाय ८०८७) भुसावळ-वरणगाव महामार्गाने आणत असताना वरणगावनजीक महामार्गावरील हॉटेल वेस्टर्नसमोर ५ सप्टेंबर रोजी रात्री तो थांबला होता. मात्र, रात्री ट्रक चोरीला गेल्याचे सकाळी त्याने मालकाला – कळविले. याप्रकरणी ८ रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे…

