जळगाव : प्रतिनिधी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी (६ ऑक्टोबर) पुन्हा भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्यामुळे दीपक कडू सूर्यवंशी (४५, रा. नशिराबाद) हे ठार झाले. हा अपघात रविवारी दुपारी नशिराबाद ते भुसावळ दरम्यान वैद्यकीय महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर झाला. द्वारदर्शनाहून परतत असताना सूर्यवंशी यांच्यावर काळाने झडप घातली. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील दीपक सूर्यवंशी हे गावातीलच एका मेडिकलवर कामाला होते. त्यांच्या नातेवाइकांचे निधन झाल्याने ते सासऱ्यांसह ऐनपूर, ता. रावेर येथे द्वारदर्शनासाठी गेले होते तेथे सासऱ्यांना सोडून ते दुचाकीने (एमएच १९, एएम १६६६) घरी परतत असताना नशिराबादजवळ भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यात सूर्यवंशी यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागीच ठार झाले.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका डॉक्टरचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून या डॉक्टरला संबंधित महिलेच्या पतीसह चार जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या २९ वर्षीय डॉक्टरचे आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय एका जणाला आला. त्यातून त्याच्यासह अन्य तीन जणांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रात्री डॉक्टरच्या घराजवळ जाऊन त्यांना लोखंडी रॉड व फायटरने मारहाण केली. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शनिवारी (५) ऑक्टोबर) मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल…
एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील कासोदा येथे खैरनार वाड्यात रविवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात आठ जण भाजल्याची घटना घडली आहे. यात आठपैकी चार जण गंभीर आहेत. त्यांना उपचारासाठी जळगावला रवाना करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल पुना मराठे (मानकीवाले) याच्या घरातील सिलिंडरमधील गॅस संपल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडून सिलिंडर आणले होते. या सिलिंडरचे रेग्युलेटर लावताना गॅस गळती सुरू झाली. गळती थांबत नसल्याचे पाहून अनिल याने ते सिलिंडर स्वयंपाक घरातून बाहेरच्या खोलीत फेकले. या घटनेमुळे सर्व कुटुंब घरातून बाहेर पळाले. घराशेजारी असलेल्या किराणा दुकानाचे मालक व काही ग्राहकांनी सिलिंडरवर गोणपाट टाकून रेग्युलेटर बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सिलिंडरचा स्फोट…
जळगाव : प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या सहा दुचाकींसह रवींद्र उर्फ राहुल पाटील व दीपक ज्ञानेश्वर पाटील या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. दोघांनी जळगाव जिल्ह्यासह पुणे व मुंबई येथूनही दुचाकी चोरलेल्या असून त्या चार दुचाकींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्याविषयी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सूचना दिल्या. त्यांनी तयार केलेल्या पथकाला रवींद्र पाटील व दीपक पाटील हे दुचाकी चोरी करून वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून दोघांना ताब्यात घेऊन सहा दुचाकी हस्तगत केल्या. ही कारवाई पोउनि राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार, विजयसिंग पाटील, सुधाकर…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. मुलांना शारीरिक कष्ट झाल्याने तुम्ही चिंतीत राहाल. आज विचारपूर्वक काम करा. ऑफिसमध्ये वरिष्ठांशी चर्चा होईल. त्याचा तुम्हाला बराच फायदा होईल. आज तुमचा बॉस तुम्हाला मोठी जबाबदारी देऊ शकतो. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सरकारी नोकरीशी संबंधित परीक्षा द्याल. एखाद्याला काही आश्वासन दिलं असेल तर ते पूर्ण करा. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सुखमय राहणार आहे. भविष्यासाठी तुम्ही आज काही गुंतवणूक करू शकाल. एखाद्या कामाबाबत आज विचारपूर्वकच निर्णय घ्या. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल. तुमची जीवनसाथी तुमच्या खांद्याला खांदा लावून चालेल. आज बाहेर फिरायला जाण्याचा प्लानिंग कराल. कार्यक्षेत्रात आज तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल, असं सूचक वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. तर महाराष्ट्राचं राजकारण दर तीन दिवसांनी बदलत आहे, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर राजकारणात कधी, कोण, काय भूमिका घेईल हे सांगता येत नाही, असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार का? असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांना केला असता त्यांनी सूचक वक्तव्य करत “पत्रकारांनी अलर्ट राहा. कारण तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देताना धावपळ होईल. महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने…
नंदुरबार : वृत्तसंस्था जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला. यामध्ये सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्या आहेत. या अपघातामुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आहे. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांकाचा ट्रक ए पी 31 पी जी 0869 या ट्रकने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100 हून अधिक मेंढ्यांना चिरडल्याची घटना घडली. त्यामुळे रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोंडाईबारी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतांना नुकतेच मुंबईतील चेंबूर परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. चेंबूर परिसरात असलेल्या सिद्धार्थ कॉलनीतील दुमजली घराला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. सध्या अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे ५.१५च्या दरम्यान आग लागली. या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. यात तळमजल्यावर दुकान होते आणि वरच्या मजल्यावर एक…
अकोला : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील भीमकुंड नदीत दोघा बहीणींना अज्ञातांनी फेकून दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. या दोघी बहिणी काल दुपारपासून घरी न आल्याने त्या हरविल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी काल दाखल केली होती. परंतू या बहिणींना नदीच्या पात्रात फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पाणबु्ड्यांच्या मदतीने नदीच्या पात्रात शोध सुरु केला आहे. रात्रीची वेळ असल्याने शोधकामात अडथळे येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा गावातल्या दोन अल्पवयीन मुलींना अकोल्यात भिकुंड नदीत फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मुलीच्या नातेवाईकांनीच हे कृत्य केल्याचा संशय देखील बुलढाणा पोलिसांना आहे. दरम्यान, काल दुपारपासून या…
पाचोरा : प्रतिनिधी जळगाव-पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात जखमी दुचाकीस्वार प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हडसननजीक गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बापू दलपत पाटील (५६, रा. वेरुळी खुर्द, ता. पाचोरा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. नांद्रा गावाहून वेरुळीकडे बापू पाटील व कृष्णा शिवाजी पाटील (वय ४३) हे दुचाकी क्रमांक (एम. एच. १९ सी. एल. ०४३३) येत होते. त्यावेळी पाचोऱ्याहून जळगावकडे जाणाऱ्या दुचाकीने (क्रमांक एम. एच. १९ बी. डब्ल्यू ११८५) समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बापू पाटील गंभीर जखमी झाले. त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात…

