Author: editor desk

पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा शहरात सुरु असलेल्या बांधकामाची भिंत अंगावर पडल्याने तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी झालेल्या या अपघातात उपसरपंच हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र मंगळवार १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्यासुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द येथील विलास रतीलाल कुमावत (वय ३९) हे येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळत स्वतः बांधकाम गवंडी काम करुन उदरनिर्वाह चालवित होते. रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील खिर्डी ते विवरा रस्त्यावरील शेती शिवारादरम्यान एकाने २३० फूट उंचीच्या ट्रान्समिशन टावरवर चढून गळफास घेतल्याची घटना १० रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विवरा येथील शेतकरी किरण पंढरीनाथ सोनवणे यांच्या गट क्रमांक १३१मधील ट्रान्समिशन विजेच्या टावर वर चढून एका तरुणाने आपल्या अंगावरील शर्टाच्या साह्याने गळफास घेत आपली जीवन यांचा संपवली. या टावर खाली पॅन्ट व कुदळ पोलिसांना आढळून आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांना धाव घेत पॅन्टच्या खिशात पॅनकार्ड वरून मयताची ओळख पटवली. या मृताचे नाव ब्रिजेश कुमार (वय २५) असे असून तो छत्तीसगड राज्यातील कोरिया…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन संसार थाटणाऱ्या मांडळ येथील आरोपीला मारवड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात मारवड पोलिसात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी बसने शिक्षणासाठी अमळनेर ये-जा करीत होती. तिची ओळख आरोपीसोबत झाली. त्यानंतर दि. १३ जून रोजी सकाळी ९ वाजता त्याने तिचे अपहरण केले. दोघेजण नागपूर आणि नंतर हैदराबाद येथे गेले. काही काळाने कोल्हापूर जिल्ह्यात नगाव येथे शेतीकाम करू लागले. अखेर पोलिसांनी त्यांना शिरोली, जि. कोल्हापूर येथील पोलिसांच्या मदतीने अटक केली. दोघांना मारवड येथे आणण्यात आले. मुलीच्या जबाबानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी भोईटेनगरमधील गौरी प्राइड अपार्टमेंटमधील शिक्षकाचे घर फोडून ३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भोईटेनगर परिसरातील रहिवासी मयूर बाळासाहेब देशमुख (३६ ) हे शिक्षक पत्नी व दोन मुलांसोबत शनिवारी अडावद येथे उत्तरकार्यासाठी गेले होते. चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत, घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. १ लाख ४० हजार रुपये किमतेचे ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ७० हजार रुपये रोख रक्कम, १४ हजार रुपये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील बाबा टावर्स मधील असलेल्या आकाश एज्युकेशनलसर्व्हिसेस लिमिटेडतर्फे (आकाश क्लासेस)राष्ट्रीय पातळीवरील अँथे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असून, यामधून वैद्यकीय-अभियांत्रिकीत करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांना मदतीचा हात दिला जाणार आहे अशी माहिती आकाश क्लासेसचे शाखा व्यवस्थापक पुंडरिक भारद्वाज यांनी मंगळवार दि.१० रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना भारद्वाज म्हणाले की, सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल. पाच विद्यार्थ्यांना अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटरमध्ये मोफत सहल, १५० सर्वोत्कृष्ट ५० विद्यार्थ्यांना रोख पुरस्कार आणि अन्य लाभ दिले जाणार आहेत.१९ ते २७ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. शंभर टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती उपलब्ध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे शहरात अपघातांच्या प्रमाण वाढलेले आहे. महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच बायपास व समांतर रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून कामास गती देण्यात यावी, अशी मागणी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे जळगाव दौऱ्यावर आले आहेत. आ. राजूमामा भोळे यांनी राज्यपालांची भेट घेवून जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. यात जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवर होणाऱ्या अपघातांकडे त्यांनी राज्यपालांकडे लक्ष वेधले. तसेच जळगाव औद्योगिक क्षेत्रातील विद्युत वितरण विभागाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुंबई येथे लेवा पाटीदार समाजाची बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीत विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यात आली. यात असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासह पाडळसे येथे भोरगाव पंचायत येथील लेवा भवनसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व प्रकल्पांसाठी निधी दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे, अशी माहिती आ. राजूमामा भोळे यांनी दिली आहे. मुंबईत लेवा पाटीदार समाजाच्या प्रतिनिधींसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमूख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री हंसराज अहिर, सहकार राज्यमंत्री अतूल सावे, जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, संजय गाते, भाजपचे पदाधिकारी विजय चौधरी, संजय केणेकर यांच्यासह लेवा पाटील समाजाचे…

Read More

मेष राशी एखाद्या अनुचित घटनेची भीती तुमच्या मनात राहील. न्यायालयीन खटल्यांसाठी चांगला वकील शोधा, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान किंवा तुरुंगात जावे लागू शकते. मनावर नकारत्मकतेला वर्चस्व गाजवू देऊ नका. देवाची प्रार्थना करत राहा. वृषभ राशी सजण्यात अधिक रस असेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला आराम आणि सुविधा मिळेल. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश आणि सन्मान मिळेल. नोकरीच्या शोधात तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल. शास्त्र आणि उद्योग व्यवसायात गुंतलेले लोक प्रगती करतील. व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. बांधकामाशी संबंधित कामे प्रगतीपथावर राहतील. मिथुन राशी कुटुंबातील सुख सोयींवर अधिक लक्ष असेल. आवडीची वस्तू खरेदी करून घरी आणाल. त्यामुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा सोन्याच्या व्यवसायात अग्रेसर आहे.त्यासाठी गोल्ड क्लस्टर’ करण्यासाठी प्रयत्न करावा असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ.शिरीष चौधरी , आ.सुरेश भोळे, आ.लता सोनावणे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपवन संरक्षक जमीर शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक आर. एस. लोखंडे, अधिक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे मंडळ, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी के. एम. तडवी, महाजनको प्रकल्प मुख्य अभियंता शशांक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा केले जाणार आहेत. याआधी जुलै आणि ऑगस्टचे एकत्रित 3000 रूपये बँक खात्यात जमा करण्यात आले होते. 19 ऑगस्टला पहिला हप्ता जमा करण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठ गाव-खेड्यापासून शहरापर्यंत महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. सुरुवातीला सरकारने अॅप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. पण ज्यांना अजून अर्ज भरता आलेले नाहीत त्यांच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे. कारण सरकारने आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यास बंद केले आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी…

Read More