मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप व्यस्त असेल. व्यवसायाच्या योजनांमध्ये अचानक बदल करावे लागतील. दिवसाच्या सुरुवातीला कामाची गती मंद राहिल. वेळेवर आश्वासने पूर्ण न केल्याने संबंध बिघडतील. कामाचा कंटाळा जास्त राहिल. कोणत्याही कामाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी तुम्ही सक्षम नसाल. कामात तुम्ही गुंतवणूक करत असाल तर यश मिळेल. आर्थिक फायदा गरजेनुसार होईल. वृषभ – आज तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. नोकरी व्यवसायातून आर्थिक लाभ होतील. पैशाशी संबंधित आर्थिक समस्या सुटतील. मन अस्वस्थ होईल. समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल. शारीरिक त्रासामुळे वैताग येईल. घरातील कामे वेळेवर पूर्ण कराल. शेजाऱ्यांशी संबंध सुधारतील. मुले त्यांच्या इच्छेनुसार काम करतील. मिथुन – आजचा दिवस अपेक्षेच्या विरुद्ध…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लाडकी बहिण योजना जोरदार सुरु असतांना नुकतेच राज्य सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लावण्याच्या निर्णयानंतर महायुती सरकारने सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ नोव्हेंबर २०२४ रोजी पासून करण्यात येणार आहे. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाची म्हणजे सातबारा उताऱ्यावर आईच्या नावाचा समावेश करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ नोव्हेंबर २०२४ रोजी पासून करण्यात येणार आहे. जर १ मे २०२४ रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर त्यावर त्या व्यक्तीच्या आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर वडिलांचे नाव लावणे बंधनकारक नाही आहे.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव लोकसभा मतदार संघाच्या खा.स्मिताताई वाघ व आ.राजुमामा भोळे सकाळी ७:३० वाजता जळगाव रेल्वे स्टेशनला उतरले. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर रोज ये-जा करणारे नोकरदार वर्ग तसेच कॉलेजचे विद्यार्थ्यांची परिक्षा होती. परंतू भुसावळ-इगतपुरी ७:१५ वाजताचा मेमो अचानक रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने सर्वांची गैरसोय झाली. यावेळी विद्यार्थ्यांना व नोकरवर्ग यांना चाळीसगाव व पाचोरा येथे जाण्यासाठी एकही रेल्वेगाडी उपलब्ध नव्हती. यावेळी ही बाबत आमदार राजूमामा भोळे आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी ही गोष्ट समजली. त्यांनी डीआरएम भुसावळ यांच्या सोबत बोलण करून गाडी नंबर (२२१८४) साकेत सुपर फास्ट एक्सप्रेस जळगाव स्टेशनला २ मिनिटाचा थांबा देऊन पुढील पाचोरा, चाळीसगाव स्टेशनला पण थांबा देण्याचे…
जळगाव : प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आसोदा, देवूळवाडा, पथरी, घार्डी आणि ममुराबाद येथील शेकडो तरुणांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. दरम्यान, जळगावातील आदित्य लॉन येथे पार पडलेल्या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. जळगावातील आदित्य लॉन येथे शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व इतर आघाडीची आज विस्तृत बैठक पार पडली. यावेळी आसोदा, देवूळवाडा, पथरी, घार्डी आणि ममुराबाद येथील शेकडो तरुणांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे. या तरुणांनी केला शिवसेनेत प्रवेश ! असोदा येथील दिनकर भिल, मंगल भिल, कैलास भिल, किशोर गायकवाड, सागर…
मुंबई : वृत्तसंस्था परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यव्यापी ‘काँग्रेस हटवा, आरक्षण वाचवा’ आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात “भारतात निष्पक्षता आल्यावर आरक्षण संपुष्टात येईल” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर हा वाद निर्माण झाला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर विविध राजकीय पक्षांनी टीका केली होती. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात अकोल्यात, तर पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मुंबईत आंदोलनाचे नेतृत्व केले. या व्यतिरीक्त ग्रामविकास मंत्री…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 25 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यात अजित पवार यांच्यासह बहुतांश विद्यमान आमदारांच्या नावांचा समावेश आहे. अजित पवार स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. राष्ट्रवादीने अद्याप या यादीची पुष्टी केली नाही, पण ही यादी फायनल असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची येथे एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 25 संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. अजित पवार यांनी नुकतेच बारामती विधानसभा मतदारसंघ सोडण्याचे संकेत दिले होते.…
पारोळा : प्रतिनिधी पारोळा पो. स्टे, च्या गुन्हे शोध पथकास गोपनिय माहिती मिळाली की, किशोर संजय चौधरी रा. तरवाडे ता. पारोळा ह. मु. सातपुर कॉलनी, नाशिक. हा नाशिक शहरातुन व इतर परीसरातुन दुचाकी चोरुन पारोळा पो. स्टे. हद्दीतील आडगाव, तरवाडे, शिवरे या परीसरात कमी किमतीत विकतो. तो पुन्हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यास पारोळा पो. स्टे. हददीत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावरुन पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी पारोळा पो. स्टे च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, पोहेकॉ/ प्रविण पाटील, पोना/ संदिप सातपुते, पोकों/अभिजित पाटील यांना तात्काळ किशोर संजय चौधरी याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई…
भुसावळ : प्रतिनिधी प्लॉटच्या वादातून दोघ भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यामध्ये मोठ्या भावाने लहान भावाच्या डोके भिंतीवर आपटून व बॅटने मारहाण करीत प्रदीप जयसिंग इंगळे (वय ४८) यांचा निघृण खून केला. ही घटना फॅक्टरीतील क्वार्टर श्री टाईप ४४ मध्ये घडली. यातील संशयीत सतिष जयसिंग इंगळे (वय ५१) याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेमुळे सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव फॅक्टरीत पॅकींग विभागात सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले प्रदीप इंगळे यांचे वडील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी फॅक्टरीच्या परिसरात मुलासह विभक्त राहतात. सतिष इंगळे हे बुधवारी…
पाचोरा : प्रतिनिधी नगरदेवळा शहरात अंगणात खेळत असताना सात वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. मृत चिमुकलीचे नाव काव्या राहुल मणियार (७) असे आहे. ती पहिलीत होती. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर अंगणात भावंडांसोबत खेळत होती. दरम्यान, सर्पदंश झाल्याने तिला नातेवाइकांनी तातडीने भडगाव येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मणियार कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शास्त्रीनगर भागात एका चहाच्या टपरीवर चार ते पाच टवाळखोरांनी एका बँक कर्मचाऱ्याला लोखंडी रॉड व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली. चौघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ३३ वर्षीय बँक कर्मचारी चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी गेला असता, तेथे ही घटना घडली. मंगळवारी मध्यरात्री बँक कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदेश सपकाळे, भावेश सपकाळे, भोजराज पवार (रा. शिवाजीनगर) व तेजस हटकर (रा. समतानगर) या चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास प्रवीण जगदाळे हे करत आहेत

