Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी बनावट कागदपत्रे व क्रमांक असलेली कार पाच लाखात विक्री करुन पियूष कमल किशोर मनियार (२६, रा. गणेशवाडी) या तरुणाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी संदेश चंद्रकांत काजळे (रा. सिडको, नाशिक) याच्याविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, संदेश काजळे याचा नाशिक येथे जुने वाहन विक्रीचा व्यवसाय आहे. पियुष मनियार यांना जुनी कार घ्यायची असल्याने त्यांनी संदेशशी संपर्क साधला. त्यानुसार संदेश व पियुष यांच्यात गोविंदा रिक्षा थांब्याजवळ ५ लाख रुपयात कारचा व्यवहार झाला. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधी कार बघणे, पैसे देणे, कागदपत्रे बनविणे अशी प्रक्रिया झाली. यात वाहनाचे कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वडील दरवाजा बंद करून प्रचाराला गेल्याने घरात बंद असलेल्या मुलीने गॅलरीला साडी बांधून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात चौथ्या मजल्यावरून पडल्याने प्रेरणा विजय गजरे (वय १९, मूळ रा. यावल, ह.मु, मुंदडानगर, जळगाव) या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. रामानंदनगरातील शंभर फुटी रस्त्याला लागून असलेल्या मुंदडानगरातील साई लक्ष अपार्टमेंटमध्ये विजय गजरे हे मुलगी प्रेरणा हिच्यासह काही दिवसांपूर्वीच वास्तव्याला आले होते. ते मूळचे यावलचे असून माजी नगरसेवक आहेत. मंगळवारी अमळनेर येथे उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. प्रेरणा ही मतिमंद असल्याने घरातून कुठेही निघून जाते म्हणून बाहेर जाताना त्यांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद केला होता.…

Read More

यावल : प्रतिनिधी रागाच्या भरात १९ वर्षांची एक तरुणी आपल्यासोबत तीन अल्पवयीन मुलींना घेऊन सोमवारी घरून निघून गेली होती. या चार मुली अचानक बेपत्ता झाल्याने गावात खळबळ उडाली होती. पालकांनी यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोध घेत या मुलींना कल्याण रेल्वेस्थानकात ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील एक १९ वर्षीय तरुणी व तिच्या दोन १६ वर्षीय व एक ८ वर्षीय, अशा तीन अल्पवयीन मैत्रिणी या कुटुंबाशी झालेल्या किरकोळ वादातून रागाच्या भरात सोमवारी आपल्या घरून निघून गेल्या होत्या. पोलिसांत माहिती मिळताच तपास पथकाने भुसावळ रेल्वे पोलिसांची मदत घेतली. नंतर भुसावळ रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या मुली मुंबईच्या…

Read More

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम घेऊन येणारा आहे. कुटुंबात एखाद्या कामाबाबत विचार विनिमय कराल. कार्यक्षेत्रात विचार करूनच तुमचं मत मांडा. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं संपूर्ण सहकार्य मिळेल. एखादं काम दीर्घ काळापासून सुरू असेल तर ते आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. घरात कुरबुरी होतील. काही कारणाने पत्नीशी वाद होतील. आईकडून एखादं जबाबदारीचं काम दिलं जाईल. एखाद्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत असाल तर तसं करू नका. नाही तर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला जाणार आहे. कुटुंबासोबत आज दिवस घालवाल. एखादी समस्या असेल तर ती बऱ्यापैकी दूर होईल. धार्मिक कार्यात रस घालाल. व्यापारात तुम्हाला…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरत आहे. तर चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी अनेक उमेदवार आपली उमेदवारी दाखल करीत असतांना आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कडून उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कडून चाळीसगाव विधानसभा 17 आज रोजी उमेदवारी अर्ज दाखल आर. पी. आय.( ए )पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.दिपक निकाळजे. राष्ट्रीय सचिव माननीय श्री.मोहनलाल पाटील साहेब माननीय सौ.सुनीता ताई चव्हाण महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.शशिकांत दारोळे साहेब जळगाव जिल्हाध्यक्ष श्री.अनिल महिराळे व सर्व वरिष्ठांचे आदेशाने आज रोजी श्री.शरद नामदेवराव सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमोल जावळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. मतदारांमध्ये परिवर्तनाबद्दल उत्साह असून, यावेळी जनता महायुतीला मतदान करून सत्ता परिवर्तन करणार असल्याचा विश्वास अमोल जावळे यांनी व्यक्त केला. त्यांच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे आणि माजी मंत्री आ. अर्चना चिटणीस, माजी खासदार उल्हास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात रावेरच्या पाराच्या गणपती मंदिरापासून झाली. फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये अमोल जावळे आणि महायुतीचे पदाधिकारी आरुढ झाले होते, त्यांनी मतदारांना अभिवादन केले. रॅलीत भाजपा कार्यकर्ते गळ्यात पक्षाचे रुमाल घालून सहभागी झाले…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी पाळधी येथील अतिशय शांत व संयमी असलेले तसेच ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे संपूर्ण काम पाहणारे तसेच जीपीएस मित्रपरिवाराचे सर्वेसर्वा अनिल आत्माराम महाजन यांची जीवनातून अचानक निवृत्ती झाल्याने संपूर्ण पाळधी परिसरामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने शोकाकुलांची उपस्थिती होती. अतिशय सर्वसाधारण परिस्थिती असलेले अनिल महाजन हे प्रतापराव पाटील यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते. मंत्री गुलाबराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांना शारीरिक त्रास जानवू लागला त्यानंतर प्रतापराव पाटील यांनी त्यांना तत्काळ जळगाव येथील दवाखान्यात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तात्काळ मुंबई येथे रवाना होण्याचा सल्ला…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सारबेटे येथे दुचाकी चालवताना कट मारल्याच्या वादातून एका कुटुंबातील पाच जणांना १५ लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सारबेटे येथील नाजिमखान मेवाती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपूर्वी सारबेटे येथील पेट्रोल पंपाजवळ फैजलखान शफीकखान याने गुलताजखा हनीफखा मेवाती यांना दुचाकीने कट मारल्याने त्यांच्यात वाद झाले होते. त्याचा राग मनात ठेवून शनिवारी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास सारबेटे बस स्थानकाजवळ गुलताजखा मेवाती हे उभे असताना ताहीर अब्दुल रेहमान खान याने त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी अन्य लोकांचा जमावही जमला. या इसमांनी लोखंडी पान्हे, टॉमी, रॉड आदी साहित्य आणून मारहाण सुरू केली. मेवाती यांच्या घरातील पाच जणांना बेदम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पत्नी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत, तर पती सुरज राजेंद्र भामरे (३५, रा. अयोध्यानगर) हे दुकानावर असताना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ६४ हजार ४५० रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. याप्रकरणी २७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्ण व्यावसायिक सुरज भामरे यांचे सराफ बाजार परिसरात सोने चांदीचे दुकान आहे. ते दुकानावर असताना व त्यांच्या पत्नी दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गेलेल्या असताना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातून ६४ हजार ४५० रुपये किमतीचे सोने – चांदीचे दागिने चोरून नेले. भामरे यांच्या पत्नी संध्याकाळी…

Read More

चोपडा : प्रतिनिधी चोपडा मतदारसंघात उद्धव सेनेला दोनच दिवसांत उमेदवार बदलण्याची वेळ आली असून, आधी घोषित राजू तडवी यांच्याऐवजी जि. प. चे माजी सभापती प्रभाकर सोनवणे यांना उद्धव सेनेकडून सोमवारी एबी फॉर्म देण्यात आला आहे. महाविकास आघाडीत उद्धव सेनेने चोपड्याच्या जागेसाठी शेवटपर्यंत आग्रह धरला होता. त्यात शुक्रवारी पक्षाकडून राजू तडवी हे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर वाद शमविण्यासाठी उद्धव सेनेकडून राजू तडवी यांना पक्षाकडून देण्यात आलेला एबी फॉर्म परत मागविण्यात आला आणि सोमवारी अखेर उद्धव सेनेने प्रभाकर सोनवणे यांना एबी फॉर्म दिला. त्यामुळे उद्धव सेनेकडून प्रभाकर सोनवणे हेच उमेदवार राहणार असल्याचे निश्चित झाले असून त्यांची लढत शिंदेसेनेचे प्रा. चंद्रकांत…

Read More