Author: editor desk

मुक्ताईनगर : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराची अर्जाची वेळ संपली असून जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी रोकड जप्त झाल्याच्या देखील कारवाई झाली नुकतेच मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यावर पोलिस व परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत चारचाकी वाहनातून चार लाख दहा हजार रुपयांची रोकड जप्त केल्याची घटना सकाळी घडली. दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सीमा तपासणी नाक्यावर मध्य प्रदेशातून मुक्ताईनगरकडे येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एम.पी.६८. सी २३७८ ची तपासणी केली असता ही रोकड आढळून आली. कारमधील व्यक्ती कागदपत्रे सादर करू न शकल्याने ही रोकड मुक्ताईनगर पोलिसात जप्त करण्यात आली आहे. ही रोकड मगन जांभळकर (वय ८०) आणि…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी नागरिकांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध खरेदी केली जात आहे. बच्चे कंपनीसाठी फटाक्यांची दुकानेही सज्ज झाली आहेत. दरम्यान, भुसावळ नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ३ नोव्हेंबरपर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. विक्रेत्यांनी १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचा फटाका विकल्यास कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी दिला आहे. भुसावळ न. पा.च्या कार्यक्षेत्रात २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते ३ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण मनाई केली आहे. निवासी भागात, मोकळ्या मैदानात व दवाखाने आणि शाळा, महाविद्यालय असलेल्या परिसरात फटाके फोडताना किती डेसिबल आवाज…

Read More

मेष राशी आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही वाटाल. आपल्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होईल आणि नोकरीत समाधान आणि आराम वाटेल. समाज आणि सार्वजनिक जीवनात आपली प्रतिष्ठा वाढेल. विपरीत लिंगाच्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटेल. मित्रांसोबत बाहेर फिरण्याची आणि नवे कपडे घालण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात सुखद क्षण अनुभवाल. वृषभ राशी आज अचानक तुमचा खर्च वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि इतरांचे मार्गदर्शनही घ्यावे लागेल. प्रिय व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. दुपारनंतर घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. आरोग्य सुधारलेले दिसेल. कामात यश मिळेल. नोकरीत सहकाऱ्यांचा चांगला सहकार्य मिळेल. शत्रूंवर विजय मिळवू शकाल. मिथुन राशी आज जमीनजुमल्याच्या कागदपत्रांच्या बाबत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार प्रभाकर गोटू सोनवणे यांना आज सकाळी ह्दयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्र्रिया देखील करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. 31 रोजी उमेदवार प्रभाकर सोनवणे हे चोपडा विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असतांना तालुक्यातील ममुराबाद येथे त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोनवणे यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सोनवणे यांच्यावर शस्त्रक्रिया केली असून त्यांची तब्येत उत्तम असून ते येत्या चार दिवसात प्रचारासाठी सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी प्रवीण पाटील जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. तर सर्वच उमेदवार आता आपल्या मतदार संघात जनसंपर्क सुरु झाला असून नुकतेच जळगाव ग्रामीण मतदार संघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. वसंतवाडी येथील राजू साईंदास चव्हाण ग्राम पंचायत सदस्य ,दशरथ जगराम चव्हाण शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सर्जन श्रावण चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतवाडी शाखा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रकाश प्रल्हाद चव्हाण ,मिथुन रामदास चव्हाण ,रविंद्र ज्योतिराम पवार ,लक्ष्मण सदा जाधव ,भगवान किशन चव्हाण ,अर्जुन श्रावण चव्हाण ,रणजीत मोती राठोड़ ,भाईदास ऊखा चव्हाण ,सुनील कालू चव्हाण ,भगवान किशन चव्हाण ,राजेश मदन चव्हात व रमेश वसराम राठोड़ यांनी शिवसेना उमेदवार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भारताचे प्रथम गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या प्रशस्त इमारतीमधील सरदार पटेल यांच्या पुतळ्याला आ. राजूमामा भोळे यांनी मध्यरात्री पुष्पहार अर्पण करून वंदन केले. या प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती. भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती जळगावच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महानगरपालिकेच्या इमारतीखाली सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रशस्त पुतळा उभारण्यात आला आहे. दि. ३१ ऑक्टोबर रोजी जयंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास आ. राजूमामा भोळे यांनी पुष्पहार अर्पण करून पुतळ्याला वंदन केले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य अतुलनीय असून देशाच्या हितासाठी त्यांनी काम केले. लोहपुरुष सरदार पटेल यांचे कार्य व…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील काही तरुणांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत व आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी रात्री प्रवेश केला. पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा देऊन वार्ड क्रमांक १९ मधील सुप्रीम कॉलनी परिसरातील तरुण हर्षल आमोदे, सौरभ दांडगे, नरेश मराठे, मोहित मोरे, गौरव पाटील, पवन पाटील, संकेत लाड, विशाल सरोदे, आकाश मोरे, विवेक पवने, कृष्णा साबळे, यश मेश्राम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र या आचारसंहितेत देखील राज्यात अनेक ठिकाणी पैशांचे घबाड आढळून येत आहेत. पुणे, मुंबईनंतर आता नाशिकमध्ये देखील पैशांची बॅग जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील नाकाबंदी दरम्यान 20 लाख 50 हजार तर उपनगर परिसरातील एका घरात 11 लाख रुपये सापडले आहेत. नाशिकच्या उपनगर परिसरात असलेल्या भालेराव मळा परिसरातील झोपडपट्टीत पैसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. घर झडतीत सापडलेल्या पैशांतून 21 वर्षीय तरुणाला आणि नाकाबंदी दरम्यान कारमध्ये सापडलेल्या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांची किंमत एकूण 31 लाख इतकी आहे. पोलिसांना सापडलेल्या पैशांचा…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून प्रचाराचा झंझावात सुरु झाला असून घर तेथे ‘धनुष्यबाण’ पोहचविण्याचे काम सुरु असून “कहो दिलसे, गुलाबराव पाटील फिरसे” हा नारा गावा – गावांमधील प्रचार रॅलीमध्ये गाजत आहे. युवक , जेष्ठ नागरिक , दिव्यांग बांधव हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये भेटत असून भक्कम विजयाची हमी देत आहे. “घरोघरी धनुष्यबाण” हे मिशन पोहचविण्याचे काम महायुतीचे कार्यकर्ते करीत असून गुलाबराव पाटील जनतेशी थेट संपर्क साधत असल्यामुळे त्यांना दिव्यांगांसह जेष्ठांचे आशीर्वाद व दुवा मिळतांना दिसत आहे. दिवाळीत धूम – धडाका ‘धनुष्यबाणाचा’ प्रचार जोरात धरणगाव तालुक्यातील वराड बु.,वराड खु., हिंगोणे बु., हिंगोणे खु., कल्याणे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलेले असताना त्र्यंबक नगरात दीपक सखाराम खांडेलकर यांच्याकडे तब्बल वीस लाख रुपयांची धाडसी घरफोडीची घटना बुधवारी (दि. ३०) सायंकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार दीपक खांडेलकर त्र्यंबक नगरातील साखरवाडी भागात वास्तव्याला आहेत. २२ ऑक्टोबर रोजी ते कुटुंबासह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेलेले होते. बुधवारी दुपारी ते घरी पोहोचले असता घराचा दरवाजा व कडी कोयंडा तुटलेला होता. कपाटात ठेवलेल्या पाटल्या, कंगन, नेकलेस, टॉप, तीन अंगठ्या साखळी, ब्रेसलेट आदी २५ तोळ्याचे सोन्याचे दागिने व तीस हजार रुपयांची रोकड गायब झाल्याचे लक्षात आले. खांडेलकर यांनी लागलीच रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. अपर पोलिस अधीक्षक अशोक नकाते उपअधीक्षक…

Read More