Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर मतदार संघाचे आमदार राजूमामा उर्फ सुरेश दामू भोळे यांनी सोमवार दि. २८ ऑक्टोबर रोजी आपला नामांकन अर्ज तहसीलदार कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत विनय गोसावी यांच्याकडे दाखल केला. यानंतर जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा निर्धार व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव शहर मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राजूमामा भोळे यांना पक्षातर्फे तिकीट मिळाले आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव शहरात केलेल्या विकास कामांच्या बळावर या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केलेली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना खा. स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महानगर…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव येथील आजवरच्या सर्व गर्दिचे उच्चांक मोडीत काढत भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी आज हजारो जनसमुदायाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिताताई वाघ, पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील, पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडेसर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, शिवसेनेचे उमेश (पप्पूदादा) गुंजाळ, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवनराजे सोनवणे, भाजपा जनजाती मोर्चाचे प्रदेश संयोजक किशोर काळकर, धनगर समाजाचे नेते नवनाथ ढगे, जिल्हा सरचिटणीस मधुबाऊ काटे यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील व चाळीसगाव तालुक्यातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केल्यासून प्रचाराचा धूनधडाका लावला आहे. भोकर – कानळदा जि. प. गटातील आव्हाणे, खेडी , वडनगरी, फुपनगरी, कानळदा कुवारखेडे व नांद्रा बु या गावांमध्ये आज प्रचार संपन्न झाला. या भागातील गावा – गावांमधील मतदार हे स्वयंस्फुर्तीने गुलाबराव पाटील यांना रॅलीमध्ये भेटत असून भक्कम पाठींबा दर्शवित आहे. गुलाबराव पाटील यांच्या भव्य अश्या प्रचार रॅलीत धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक निघत आहे. त्यांच्या सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर महाराज, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, रॉ. काँ. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी ‘धनुष्यबाणाचा’…

Read More

मेष राशी आज शेअर्स, लॉटरी, ब्रोकरेजमधून अचानक आर्थिक लाभ होईल. काही महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल. काही शुभ कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत पदोन्नतीसह महत्त्वाची जबाबदारी मिळेल. उद्योगधंद्यात नवीन सहकारी मिळतील. घरात चैनीच्या वस्तू आणतील.आज आर्थिक स्थितीत मोठे चढ-उतार होतील. वृषभ राशी आजच्या दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल. उद्योगधंद्यात अधिक व्यस्तता राहील. सत्तेत असलेल्या व्यक्तीशी जवळीक वाढेल. व्यवसायातील अडथळे दूर होतील. काही जुन्या कोर्ट केसेसमधून दिलासा मिळेल. आज व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुमच्या आवडीचे महागडे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशी आजच्या दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल. राजकारणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना जनतेचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहे. तर नुकतेच महायुतीतील भाजपने तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या तिसऱ्या यादीमध्ये आणखी 25 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जाहीर कऱण्यात आलेल्या तीन याद्यानुसार आतापर्यंत भाजपने महायुतीमध्ये सर्वाधिक 146 उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या या तिसऱ्या यादीमध्ये मुर्तिजापूर – हरीश पिंपळे, कारंजा -सई डहाके, तिवसा- राजेश वानखडे, मोर्शी- उमेश यावलकर, आर्वी-सुमित वानखेडे, काटोल- चरणसिंग ठाकूर, सावनेर – आशीष देशमुख, नागपूर मध्य – प्रवीण दटके, नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले, नागपूर उत्तर – मिलिंद माने, साकोली – अविनाश ब्राह्मणकर, चंद्रपूर – किशोर…

Read More

चोपडा : प्रतिनिधी शहरातील पं. स. समोरील डेअरीतून घेतलेल्या दुधात प्लास्टिक सापडल्याचे सांगत तसा व्हिडीओ व्हायरल केला. तसेच डेअरी मालकाला धमकी देऊन ७५ हजारांची खंडणी घेतल्याप्रकरणी ऋषी संजय पाटील (२७) व बिडगाव येथील शिक्षक संजय विक्रम पाटील (दोघे बिडगाव, ह. मु. साने गुरुजी कॉलनी, चोपडा) या पिता पुत्राविरोधात चोपडा शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील डेअरीतून ऋषी पाटील याने दि. १९ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दूध घेतले. ऋषी याने घरी दूध तापवले असता, दुधावर प्लास्टिकसदृश साय आली. ऋषी याने त्याचा व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर व्हायरल केला. तो व्हिडीओ डेअरीचे संचालक प्रल्हाद…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी बस ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने ट्रॅव्हल्स चालकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना चोपडाई-कोंढावळ तपासणी नाक्याजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा बसडेपोत चालक असलेल्या भटू निळकंठ पाटील (४६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २५ रोजी सायंकाळी पुणे येथून चोपडा बस (एमएच०९/ईएम ९६५३) घेऊन निघाले होते. २६ रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास फागणेजवळ बस जात असताना पुढे असलेल्या विनोद ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला (एमएच०९/सीव्ही २७०९) ओव्हरटेक करत असताना चालकाने बाजू न देता जोरात गाडी पुढे घेतली. समोरून ट्रक असल्याने एसटी चालक भटू पाटील यांना अचानक ब्रेक लावला. त्यामुळे उभा असलेला एक प्रवासी खाली पडला. ट्रॅव्हल्स चोपडाई-कोंढावळ तपासणी नाक्याजवळ उभी असताना बस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चोरीचा प्रयत्न करीत असताना घरातील सदस्यांना जाग आल्याने पळून जाण्यासाठी शहाकुब शेख ताजोद्दीन (२२, रा. कासमवाडी) याने पहिल्या मजल्यावरून उडी मारली, मात्र दुखापत झाल्याने पळता आले नाही व तो पोलिसांच्या हाती लागला. हा प्रकार रविवारी पहाटे गणेशवाडी परिसरात घडला. या प्रकरणी शहाकूबविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेल्डिंग वर्कशॉपचे संचालक असलेले चेतन अशोक डहाके हे गणेशवाडी परिसरात राहतात. शनिवारी रात्री घरात झोपलेले असताना पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना कोणीतरी शिरल्याची कुणकुण लागली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्याने तेथून पळून जाण्यासाठी पहिल्या मजल्यावर उडी मारली. त्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पळून जाता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बसमध्ये चढत असताना अंगणवाडी सेविका विजया विजय हिवराळे (४२, रा. धामणगाव, ता. जळगाव) यांच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व पर्समधील एक हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (२६ ऑक्टोबर) नवीन बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजया हिवराळे या जळगावात कामानिमित्त आल्या होत्या. त्यानंतर त्या जळगावातील नवीन बसस्थानक परिसरातून जामनेर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि पर्समधील एक हजार रुपये, असा एकूण ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील रसलपूर येथील दोन्ही अल्पवयीन मुले पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहेत. भुसावळ रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून रेल्वेगाडीत बसत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रसलपूर येथील दोन अल्पवयीन मुले आहेत. २२ रोजी पहाटे घरातील कुटुंब उठल्यानंतर मुलगा दिसला नाही. त्याच्या मित्राकडे तपास करण्यासाठी गेले असता तो नसल्याचे निर्देशनास आले. दोन्ही कुटुंबीयांनी शोधाशोध केली. यातील एकाच्या मोबाइलवर संपर्क केला असता होऊ शकला नाही. दरम्यान, भुसावळ रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता २२ रोजी रेल्वेत बसताना दिसत…

Read More