• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुक्ताईनगरात २ कोटी रुपयांचा गुटखा ट्रकसह जप्त

editor desk by editor desk
December 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
मोठी कारवाई : जिल्ह्यात १८ लाखांचा गुटखा पकडला !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी

तालुक्यातील मुक्ताईनगर -बऱ्हाणपूर रस्त्यावरील पूर्णाड फाट्याजवळ मुक्ताईनगर पोलिस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे दोन कोटी रुपयांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलिसात पो. हे. कॉ. रवींद्र अभिमान पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून साकारउल्ला अब्दुल अजीज (३०, रा. इमाम नगर, हरयाणा) व कैफ फारुख खान (१९, रा, ढळायत राजस्थान), तारीफ लूकमान खान (२३, रा. इमाम नगर, हरयाणा) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी बऱ्हाणपूरकडून मुक्ताईनगरकडे माल ट्रकमधून (एन.एल. ०१/ एजे १७२५) महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक करत होते. ५ एचके व रॉयल १००० सुगंधित तंबाखू गुटखा वाहतूक करत असताना पोलिस पथकाने कारवाई केली.

या कारवाईत एकूण १०२ पिवळ्या रंगाच्या गोण्यांमध्ये एक कोटी ३४ लाख ८८ हजार ४८० रुपये किमतीचा प्रत्येकी ५ रुपये किमतीच्या गुटख्याच्या पुड्या आढळल्या. तसेच ४३ लाख ७७ हजार ६०० रुपये किमतीच्या एकूण ३२ पांढऱ्या रंगाच्या मोठ्या गोण्यांमध्ये ६० प्लास्टिक पन्नीचे पाऊचवर पाऊचमध्ये आढळली.याचबरोबर ३० लाख किमतीचा ट्रक, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ५ हजार रुपये किमतीचा दुसरा मोबाईल तसेच १५ हजार रुपये रोख असा एकूण दोन कोटी आठ लाख ८२ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी तपास करीत आहेत. दरम्यान, पर राज्यातून नेहमीच मोठ्या प्रमाणात गुटखा येत असतो. याला पायबंद घालण्यासाठी करडी नजर असावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम गंभीर

Next Post

तीन वाळूचे वाहन महसूलने केले जप्त

Next Post
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

तीन वाळूचे वाहन महसूलने केले जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !
Uncategorized

खळबळजनक : राज्यातील माजी मंत्र्यांच्या घरात भीषण स्फोट : साहित्य जळून खाक !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group