भुसावळ : प्रतिनिधी शहरातील द्वारका नगरात भरदुपारी संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वर्षा अक्षय गुंजाळ (२४) असे मयताचे नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी आणि महिलेचा पती अक्षय गुंजाळ याला मनमाड येथून ताब्यात घेतले. त्याला भुसावळ न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त शहरात लगबग सुरू असताना व सर्व दिवाळीची तयारी करत असताना शहरातील द्वारका नगर सात नंबर पोलिस चौकीच्या मागे येथे खुनाची घटना घडली. २४ वर्षीय विवाहिता वर्षा अक्षय गुंजाळ रा. उल्हासनगर, ह. मु. द्वारका नगर, भुसावळ हिचा पतीसोबत वाद झाला. त्यानंतर अक्षय याने वर्षा हिला लोखंडी रॉडने मारहाण…
Author: editor desk
पारोळा : प्रतिनिधी वायरमन विकास रमेश पाटील (३२) हे रविवारी सायंकाळी पाचोरा-भडगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथून काम आटोपून पाचोरा येथील घर काही अंतरावर असताना निर्मल सीड्सजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यात त्यांचा एक पाय तुटून अपघातस्थळपासून २० फूट दूर फेकला गेला होता. डोक्यास व शरीरास गंभीर दुखापत झाल्याने ते गेल्या दोन दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होते. मंगळवारी दुपारी त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
चोपडा : प्रतिनिधी भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दि. ३० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील देवगाव-देवळी गावाच्या खडकी नाल्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील खाचणे येथील भानुदास पुंडलिक पाटील (वय ६४) खासगी कामानिमित्त दुचाकीने (एम. एच. १९ एजे ४३९७) अमळनेरकडे येत असताना देवगाव देवळी फाट्याजवळ चोपड्याहून बदलापूरकडे जाणाऱ्या एस. टी. बसने (एम. एच. २० बीएल २५३८) दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. अपघातात भानुदास पाटील रस्त्यावर दूरवर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला, चेहऱ्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयताच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून बसचालक शेख…
यावल : प्रतिनिधी यावल भुसावळ रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर रोजी एका दाम्पत्याच्या दुचाकीचे टायर फुटून अपघात घडला होता. यात पती जागीच ठार झाला होता तर पत्नी गंभीर जखमी झाली होती. गंभीर जखमी असलेल्या हेमलता जगदीश अत्तरदे यांचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मंगळवारी शिरसाड गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, यावल भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर पेट्रोल पंपाच्या समोर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भुसावळकडून यावलकडे दुचाकी क्रमांक एम. एच.१९, एन. २४३३ द्वारे जगदीश वासुदेव अत्तरदे (वय ५३) व त्यांची पत्नी हेमलता जगदीश अत्तरदे (वय ४५) हे पती-पत्नी येत होते. दरम्यान, पेट्रोल पंपाच्या जवळ त्यांच्या दुचाकीचे पुढील टायर…
मेष राशी आज मनोरंजक आणि नियोजित गोष्टींमध्ये व्यस्त राहणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये मधुर अनुभवांची आदान-प्रदान होईल. त्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. आज तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या टीमसोबतींसोबत मिळून जे काही काम कराल ते यशस्वी होईल. तुमच्यापेक्षा अनुभवी आणि हुशार लोकांकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही खूप आनंदी राहाल. तुमचे पैशांच्या बाबतीत जे काही वाद होते ते आज सुटतील. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ आहे. वृषभ राशी आज तुमचे काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज आहे. नवीन कामाची सुरुवात टाळा. घरी आणि कामाच्या ठिकाणी जीभेवर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी जोडीदाराबरोबर शॉपिंगला जाऊ शकता. आज भाग्य 89%…
मुंबई : वृत्तसंस्था शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानंतर गेल्या 36 तासांपासून ते अज्ञातवासात गेले होते. यानंतर आता वनगांचा कुटुंबयाशी संपर्क झाला . मध्यरात्री तीन वाजता श्रीनिवास वनगा हे घरी येऊन पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा हे तिकीट नाकारल्यामुळे डिप्रेशनमध्ये घर सोडून गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून आरामाची गरज असल्याने वनगा पुन्हा नातेवाईकांकडे गेले. श्रीनिवास वनगा यांची वर्षा बंगल्यावर जाण्याची इच्छा नसल्याचे पत्नीने स्पष्ट केले आहे गेल्या 36 तासांपासून बेपत्ता असलेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा शोध लागला आहे. महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून या काळात समाजमाध्यमांवर कुठलीही पोस्ट करतांना अथवा प्रतिक्रिया देतांना तसेच पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियावर आचारसंहिता काळात आक्षेपार्ह पोस्ट करणार्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार असून अशी पोस्ट करणार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सोशल मिडियावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या काळात फेसबुक, व्हॉट्सप, ट्विटर, गुगल, शेअरचॅट, टिकटॉक, बिग टीव्ही यासारख्या माध्यमातून खोटी माहिती देणे, अफवा पसरवणे, सोशल मीडियावर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभेसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले असून आज जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी भाजपचे माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी देखील उमेदवारी दाखल केल्याने मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी भाजपचे माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी दि.२९ रोजी दुपारी तहसील कार्यालयात आपली अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली होती. मयूर कापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे त्यामुळे जळगाव शहर भाजपला दुसरा धक्का बसला आहे.
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी मंत्री तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि त्यांच्या कामाची तडफ व जनसंपर्क यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक विचारधारा आहे, सर्वसामान्यांना विकासासाठी एकसमान न्याय धेण्याचे काम केले आहे.भगव्या झेंड्याची शान आणि धनुष्यबाणासाठी सर्वांनी कार्यतत्पर राहण्याचे आवाहन केले. यांनी केला सेनेत प्रवेश शिवसेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अमोल कंखरे, दिनेश धनगर, राजू धामोळे, भैय्या कंखरे, चेतन पाटील, भोला सूर्यवंशी, आनंद सूर्यवंशी, विशाल धनगर,…
जळगाव : प्रतिनिधी वाघ नगरात मंगळवारी रात्री दहा वाजता पूर्व वैमनस्यातून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केला. यात एकाने गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली ती अक्षय सिताराम तायडे (वय २६) याच्या मांडीला चाटून गेल्याची चर्चा होती. तर अक्षय सुरेश लोखंडे (वय २१, दोन्ही रा. समता नगर) याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार झाला आहे. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाघ नगर स्टॉप परिसरात अक्षय तायडे व अक्षय लोखंडे हे दोघं दुचाकी लावून उभे असताना रात्री १० वाजेच्या सुमारास आठ ते दहा जणांचे टोळके त्याठिकाणी आले. त्यांनी दोघांवर हल्ला चढवला. यावेळी टोळक्यातील एकाने…

