जळगाव : प्रतिनिधी शहरातील कालिंका माता चौकात बुधवारी सायंकाळी सात वाजता भरधाव डंपरच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाला होता. संतप्त जमावाने डंपर पेटवून, महामार्ग बंद केला होता. यासह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात १०० ते १५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जखमी झालेले पोलिस कॉन्स्टेबल राहुल घेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री ११ वाजता जमावातील शंभर ते दीडशे अनोळखी व्यक्तींविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघ हे करीत आहेत. जळगाव शहरातील कालिंका माता चौकामध्ये चालक शुभम विश्वनाथ भोलाणे याने…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका महिलेला तिच्याच नातेवाइकांनी बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तिघांनी महिलेच्या पतीलादेखील लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हे.कॉ. गणेश पाटील हे करीत आहेत.
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील अकलूद येथे शुक्रवारी सकाळी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बसच्या धडकेत ५५ वर्षीय इसम ठार झाला. हा अपघात पहेलवान ढब्याजवळ चालक बस मागे घेत असताना घडला. घटनेनंतर बस चालक तेथून पसार झाला. या घटनेची माहिती फैजपूर पोलिसांना देण्यात आल्यावर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अकलूद या गावाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे. शुक्रवारी सकाळी या स्कूलची बस (एमएच २१/ बीएच ०६१३) घेऊन चालक हा गावाजवळील पहेलवान यांच्या ढाब्यासमोर होता. बस मागे घेत असताना या बसची धडक लागल्याने पंडित मोहन बादशाह (५५, रा. कासवे) हे जागीच…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील विवेकानंद नगरात राहणारे डॉ. प्रकाश बुधा चित्ते यांच्या घरातून सोन्याची ४ लाखांची बिस्किटे व २० लाखांची रोकड, असा एकूण २४ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. हा ऐवज त्यांच्याकडे कामाला असलेल्या मोलकरणीनेच चोरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संशयित आरोपी छायाबाई संग्राम विसपुते (वय ३९, रा. रामेश्वर कॉलनी) या मोलकरणीवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, विवेकानंद नगरातील श्री संतुलन हॉस्पिटल येथे डॉ. प्रकाश बुधा चित्ते (वय ४३) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांच्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर राहत्या घरात मे २०२४ ते डिसेंबर २०२४ पर्यंत संशयित महिला छायाबाई संग्राम विसपुते हिने वेळोवेळी घरातून २० लाख…
जळगाव : प्रतिनिधी ऑनलाइन फसवणुकीतून दोन जणांनी गमावलेल्या १ कोटी २४ लाख रुपयांपैकी ६९ लाख रुपयांची – रक्कम परत आणण्यात जळगाव सायबर पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते हे उपस्थित होते. या घटनांपैकी पहिल्या घटनेत जळगाव शहरातील संतकुमार उईके यांना १८ जुलै रोजी एका व्हॉटसअॅप ग्रुपवरुन एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष दिले. त्यात टप्प्याटप्प्यात १ कोटी ६ लाख रुपये नेटबँकींगव्दारे उईके यांनी भरले. मात्र, त्याचा परतावा आला नव्हता. सायबर पोलिसांनी उईकेयांनी ज्या खात्यात रक्कम…
मेष आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगला नसणार. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करावे लागतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळाल्यास एखाद्या शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. कुटुंबातील सदस्यांसोबत फिरायला जाऊ शकता. वृषभ आजचा दिवस सुखाचा असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमच्याबद्दल वाईट वाटू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे अधिक असेल, परंतु आपण त्या सहजपणे पार पाडाल. एखादा मित्र तुमच्याकडे पैशांशी संबंधित काही मदत मागू शकतो. मिथुन आजचा दिवस कठोर परिश्रम करण्याचा असेल. व्यवसायात इच्छित लाभ मिळाल्याने आनंदी व्हाल. आपल्या आजूबाजूला काही वाद विवाद होत असतील तर त्यात गप्प बसले पाहिजे. एखादी कायदेशीर बाब तुम्हाला बराच काळ त्रास देत असेल तर तीही दूर…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. ही बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त १ रूपयात होत असतानाही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजेंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या फसवणूक प्रकरणाला आला बसावा यासाठी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले आहेत. प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आली आहे. यामुळे आता कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे तर गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यामध्ये खटके उडू लागले आहे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे बीडच्या मस्साजोग प्रकरणावरून आता सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत खटके उडण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटलेत. त्याच मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचे नाव या प्रकरणात आल्यामुळे प्रकरणाची…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील तोंडापूर-वाकोद रस्त्यावरील तोंडापूरपासून चार किलोमीटर अंतरावर भारुडखेडे गावाजवळ रस्त्याच्या कडेला बिबट्या मादी गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृतावस्थेत सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, तोंडापूर-भारुडखेडे रस्त्यावर सदाभाऊ रामभाऊ मोकासरे यांच्या शेताच्या बंधाऱ्यात ती पडून होती. ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरताच मोठी गर्दी जमली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच तेही घटनास्थळी हजर झाले. पंचनामा करून मृत मादी बिबट्याला जामनेर येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी संजय खाचणे व त्यांच्या टीममार्फत शवविच्छेदन करण्यात आले. मृत बिबट्याचे वय ३ वर्षे असून, तो बिबट्या विद्युत तारेच्या प्रवाहाच्या धक्क्याने मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचेही निदर्शनास आले. या…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मेहुणबारे तालुक्यातील दहिवद व खडकीसिम येथून तब्बल १६ बकऱ्या चोरीस गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चोरट्याने ज्याला कमी दरात बकऱ्या विक्री केल्या होत्या, त्याच्या मुसक्या आवळल्या. हुसेन समशुभाई खाटीक (हांडेवाडी फाटा मंजूर, अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब युवराज पवार (दहिवद) यांच्या एकूण ५३ हजार रुपये किमतीच्या ५ बकऱ्या व प्रवीण तुळशीराम पाटील (खडकीसिम) यांच्या ८९ हजार रुपये किमतीच्या एकूण ११ बकऱ्या रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरी नेल्याच्या घटना नुकत्याच घडल्या होत्या. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला संबंधित शेतकऱ्यांनी बकऱ्या चोरीच्या फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात…

