Author: editor desk

जामनेर : प्रतिनिधी भारत गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून नेरी येथील एकाकडून दोघांनी २ लाख ३४ हजार ९०० रुपये लुबाडल्याची तक्रार बुधवारी पोलिसात दाखल झाली आहे. तक्रारदाराने १३ ते १८ डिसेंबर दरम्यान ही रक्कम ऑनलाइन प्रणालीद्वारे दोघांना पाठविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष पंढरीनाथ वाघोडे (नेरी बदक. ता. जामनेर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना मनोजकुमार सोनी असे नाव सांगणाऱ्या इसमाने सांगितले की, जामनेर येथील भारत गॅसची डिलरशिप रिक्त असून, ती तुम्हाला मिळू शकते. ही डिलरशिप फक्त उज्ज्वला गॅससाठी असून, तुम्हाला मासिक २० हजार गोडाऊन व ऑफिस भाडे दिले जाईल. सोनी यांनी मागणी केलेली कागदपत्रे त्यांनी व्हाट्स अॅपवर पाठविली. पढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दोन लाखांची लाच घेणाऱ्या बहाळ (ता. चाळीसगाव) येथील ग्रामपंचायतीचा सरपंच, लिपीक व पंटर अशा तीन जणांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. बहाळ गावातच गुरुवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच राजेंद्र महादू मोरे (५७), ग्रामपंचायत लिपीक शांताराम तुकाराम बोरसे (५०) व पंटर सुरेश सोनू ठेंगे (४०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ७० वर्षीय तक्रारदार यांची बहाळ रथाचे, ता. चाळीसगाव येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर ग्रामपंचायत, बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून ही जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता होती. त्यामुळे तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीविरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला. त्यानंतर सरपंच राजेंद्र…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहरातील एका ठेकेदाराला लोखंडी सळईचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४० लाख ९६ हजार ९२० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गौरव अनिल मनवानी (वय २५) हे रेल्वे विभागात ठेकेदारीचे काम करतात. १४ डिसेंबर रोजी त्यांना श्रीकांत मिश्रा असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फोन करत ‘तुम्हाला लोखंडी सळईचे कंत्राट मिळाले आहे. मात्र, त्यासाठी काही रक्कम भरावी लागेल’ असे सांगितले. १४ ते २३ डिसेंबरच्या दरम्यान मनवानी यांनी संशयिताला वेगवेगळ्या बँक खात्यांतून ‘एनईएफटी’च्या स्वरूपातून एकूण ४० लाख ९६ हजार…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी शहरातील एरंडोल येथील महादेव मंदिर परिसरात गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील घरात गळफास घेऊन महिलेने आपल्या नऊ वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सपना प्रकाश माळी (३३) आणि केतकी माळी (९) अशी या मृत माय- लेकींची नावे आहेत. घटनास्थळी गादीवर वही आढळून आली आहे. त्यात सपना हिने आपल्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असा उल्लेख केला आहे. एरंडोल येथे जहांगीरपुरा भागातील महादेव मंदिर परिसरात सपना माळी ही माहेरी राहत होती. आठ वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला होता. गुरुवारी दुपारी तिसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून लावलेला होता. सपना हिचा…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच पुणे येथील राजगुरू नगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी सुनील मकवाने आणि दूर्वा सुनील मकवाने (दोघी रा. राजगुरूनगर), अशी मृत मुलींची नावे आहेत. अजय दास (वय ५४, पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे. मुकवाने दाम्पत्य मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कार्तिकी व दूर्वा या दोन्ही बहिणी बुधवारी दुपारी घराजवळच खेळत होत्या. अचानक त्या गायब झाल्या. सायंकाळी खेड पोलिसांत मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे वयाच्या रस्थ्या वर्षी गुरुवारी रात्री कालवश झाले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थक्रषी गमावला आहे. मनमोहन सिंग यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील व सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. मनमोहन सिंग यांच्यामागे पत्नी गुरशरण कौर व तीन कन्या असा परिवार आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी दोनदा देशाचे पंतप्रधानपद भूषविले. गेल्या…

Read More

मेष राशी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी भरपूर संधी उपलब्ध होतील. दिनचर्या सांभाळाल. सामूहिक कार्य पुढे नेतील. योजना राबवण्यात यश मिळेल. व्यवसायात प्रगतीसह विस्तार होईल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. वृषभ राशी कुटुंबातील सदस्यांच्या आनंदात वाढ होईल. राजकारणात भाषण करताना काळजी घ्याल. वैद्यकीय वर्ग चांगली कामगिरी करेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात रुची वाढेल. कष्ट करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने नोकरदार वर्ग नाराज राहील. मिथुन राशी मित्रमंडळ महत्त्वाच्या प्रयत्नांना चालना देईल. कुटुंबीयांच्या भेटीगाठी होतील. राजकारणात वर्चस्व वाढेल. स्पर्धेला सामोरे जाणे आनंददायी ठरेल. बिझनेस ट्रिपला जावे लागू शकते. इमारत बांधकामाशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळेल. कर्क राशी तुमच्या उणिवा इतरांसमोर उघड होऊ देऊ नका. व्यवसायात संबंधित…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असतांना नुकतेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या प्रकरणावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सद्यस्थितीत राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत. जाग येण्यासाठी हे सरकार आणखी किती वाट पाहणार? असा संतप्त सवाल यांनी या प्रकरणी सरकारला केला आहे. कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. त्यातच पुण्यातील राजगुरूनगर येथेही दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटना घडल्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा सु्व्यवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. विजय वडेट्टीवार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी नेहमीच चोरीच्या घटना घडत असतात तर जळगाव शहरापासून नजीक असलेले झुरखेडा येथील बागेश्वर धाम यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले असूण या ठिकाणी लाखो भाविक कथेस्थळी दाखल झाले आहे याठिकाणी जिल्हा पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावला असल्यावर देखील या ठिकाणी चोरी करणाऱ्या संशयित महिलांना एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून नजीक असलेल्या झुरखेडा येथे बागेश्वर धाम सरकार धीरेद्न शास्त्री यांची कथा होत आहे. याठिकाणी राज्यातील अनेक भागातून लाखो भाविक दाखल झाले असून आज दि. २६ रोजी याठिकाणी काही महिल्याच्या गळ्यातील पोत व सोन्याच्या दागिने या ठिकाणी चोरीला गेल्याची घटना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कांचननगर भागात गुप्ती घेऊन दहशत माजवत असलेल्या एका हद्दपार आरोपीच्या मंगळवारी रात्री शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रवींद्र सोनवणे (वय २६, रा. कांचननगर) असे त्याचे नाव आहे. गणेशवर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमुळे त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, काही दिवसांपासून जिल्ह्यात अनधिकृतीरीत्या प्रवेश करून तो कांचननगर भागात राहत होता. मंगळवारी रात्री ११ वाजेदरम्यान गणेश हा कांचननगर भागात गुप्ती घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना माहिती मिळाली. त्यानंतर शनिपेठ पोलिस स्टेशनचे…

Read More