धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आव्हाणी येथे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी महसूल कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी लक्ष्मण बाविस्कर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यानुसार धरणगाव पोलिसात सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. धरणगाव पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवली. अक्षय भास्कर पाटील, उज्ज्वल कैलास पाटील गणपत पुंडलिक नन्नावरे, जितेंद्र लक्ष्मण नन्नावरे, विशाल विजय सपकाळे, किरण त्रंबक पाटील, ज्ञानेश्वर गुलाब पाटील (पाळधी, बांभोरी) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या गुन्ह्यातील वाळूचे ट्रॅक्टर जप्त करून आरोपी विजय जनार्दन तायडे यास अटक करण्यात आली आहे.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पॅथॉलॉजी लॅबवर कामाला असलेल्या आदित्य संतोष शार्दुल (१९) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता हरिविठ्ठल नगरातील श्यामनगरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा आईसोबत श्यामनगरात वास्तव्याला होता. तो एका पॅथॉलॉजी लॅबवर कामाला होता. त्याची आईही लॅबवरच कामाला आहे. दोघं वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबवर कामाला होते. आई कामावर होती, तर आदित्य हा शुक्रवारी घरीच होता. शेजारील नातेवाईक त्याच्या घरी गेले असता, तो गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला. रामानंद नगर पोलिसांनी पंचनामा केला. त्याच्या खिशात चिठ्ठी वगैरे काहीच नव्हते, त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू…
अमळनेर : प्रतिनिधी रस्त्यात का उभा राहतो, या कारणावरून दोघा जणांनी तिघांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना २६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गांधली येथील बसस्थानकावर घडली. यात एकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याला ६ टाके पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव रवींद्र बोरसे हा रस्त्यात उभा असताना रोहिदास खंडू पाटील याने शिवीगाळ केली. याबाबत जाब विचारण्यासाठी रवींद्र नीलकंठ बोरसे व चेतन बोरसे हे रोहिदासच्या घरी गेले असता त्याचा मुलगा वैभव रोहिदास पाटील याने हातातल्या लोखंडी रॉडने डोक्यावर वार केला. भांडण आवरायला गौरव व चेतन ही मुले आली असता वैभवने दोघांनाही रॉडने मारहाण केली. रवींद्र बोरसे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल…
रावेर : प्रतिनिधी शहरातील अल्पवयीन मुलाचा नात्यातीलच एका २५ वर्षांच्या युवतीने लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या युवतीने अल्पवयीन मुलाला मागील सहा महिन्यांपासून सोशल मीडियाद्वारे अश्लील संदेश पाठवत होती. हा प्रकार उघड झाल्यावर मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मुलगा अकरावीत शिकतो. नात्यातील एका मुलीने जुलैपासून सोशल मीडियाद्वारे या मुलाला अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. ही घटना संबंधित अल्पवयीन मुलाच्या आईवडिलांच्या लक्षात आली. तसेच युवतीने या मुलाकडून अडीच हजार रुपये आणि काही वस्तू मागितल्या होत्या. तसेच धमकीही दिली होती. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव करत आहेत
रावेर : प्रतिनिधी पोलिसांनी वाळूच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणात तीन ट्रॅक्टर जप्त केले आहे. त्यातून तीन ब्रास वाळूही जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिसांच्या पथकाने नेहते गावाजवळ शुक्रवारी रात्री केली. मिळालेल्या माहितीनुसार, नेहते गावातील स्मशानभूमी जवळील रोडवर तापी नदीपात्रातून अवैध गौण खनिजाचे उत्खनन करून तीन अनोळखी इसम हे लाल रंगाचे ट्रॅक्टर (क्र. एम. पी. ३२/१७०८), विना नंबरचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉली, निळ्या रंगाचे ट्रॅक्टर (क्र एम. एच. १९ /ए. पी ८८०९) व लाल रंगाची विना नंबरची ट्रॉली अशा तीन ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळू चोरी करताना आढळून आले. रावेर पोलिस स्टेशनचे फौजदार मनोज महाजन, पो. कॉ. सचिन घुगे, पो. कॉ. प्रमोद पाटील, पो.…
मेष आपल्या सभोवतालचे लोक आपल्याला हानी पोहोचवण्याचा विचार करू शकतात आणि आपल्या संयमाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. उत्तम संधी आपल्या वाट्याला येत आहेत आणि त्यापैकी प्रत्येकामध्ये आपल्या प्रेम जीवनाला बळ देण्याची क्षमता आहे. आरोग्याच्या दृष्टीने परिस्थिती आपल्या बाजूने काम करताना दिसू शकते. वृषभ आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक आणि मोकळे राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याकडे जे आहे ते आत्मसात करा. आर्थिकदृष्ट्या, आपण आपली सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी एखाद्या जुन्या मित्राची मदत घेऊ शकता, परंतु सुटका शोधणे कठीण आहे. आरोग्याची स्थिती चांगली नसेल, म्हणून आवश्यक खबरदारी घ्या. मिथुन राशी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रासंदर्भात काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या काही समस्या आज…
बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्यतीन आरोपींना तातडीने अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. बीडमध्ये काळा आक्रोश उसळला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांचा मोर्चा निघालाय. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा दाखल झाला आहे. काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. सर्वत्र काळे कपडे घातलेले आणि काळे झेंडे घेतलेले लोक दिसत आहेत. या काळ्या आक्रोशात महिला, ज्येष्ठ नागरीक, तरुण मोठ्या संख्येने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज अंत्यसंस्कार होत असून त्यांचे पार्थिव पंतप्रधान निवासस्थानातून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले आहे. येथे नेते आणि कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. डॉ.सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर आणि मुलगी दमन सिंग यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. राहुल गांधी, सोनिया आणि प्रियंका यांच्याशिवाय काँग्रेसच्या इतर नेत्यांनी मनमोहन यांना श्रद्धांजली वाहिली. दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेस मुख्यालयातून निगमबोध घाटाकडे अंत्ययात्रा निघेल. 11.35 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. केसी वेणुगोपाल म्हणाले- माजी पंतप्रधानांचे स्मारक बांधण्यासाठी सरकारला जमीनही मिळू शकली नाही.…
जळगाव : प्रतिनिधी रेणुकानगर येथील कुटुंब अंत्ययात्रेनिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे बंद असलेले घर फोडून, खासगी वाहनचालकाच्या घरातून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. या संदर्भात गुरुवारी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र पुंडलिक पाटील (वय ४९, रा. रेणुकानगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. २३ ते २५ डिसेंबर दरम्यान ते शिरपूर तालुक्यातील घोडसगाव येथे अंत्ययात्रेसाठी गेले होते. बंद घर असताना अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटातून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली – आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल गुलाब माळी करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी कालंका माता चौक व अजिंठा चौकातील अतिक्रमण हटविल्यानंतर महापालिकेने शुक्रवारी इच्छा देवी चौक, आकाशवाणी चौक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय या मार्गावरील अतिक्रमण हटविले. अतिक्रमणात व्यवसाय करणाऱ्यांच्या हातगाड्या उचलून ट्रॅक्टरमध्ये टाकून महापालिकेत नेण्यात आल्या. शहरातील मुख्य चौक व रस्त्यावर अतिक्रमण दिसायलाच नको म्हणून आयुक्तांनी कडक मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी अतिक्रमण हटविलेल्या कालंका माता चौकात शुक्रवारी शुकशुकाट होता तर अजिंठा चौकात किरकोळ हातगाड्या लागलेल्या होत्या, मात्र या चौकात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी दिसून आली. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर व सहकाऱ्यांचे पथक शुक्रवारी सकाळीच इच्छा देवी चौकात धडकले. पोलिस चौकीच्या दिशेने…

