• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी आदळली : एकाचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
November 28, 2024
in क्राईम, चाळीसगाव
0
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी आदळली : एकाचा दुर्देवी मृत्यू

भडगाव : प्रतिनिधी

ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी जाऊन आदळल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. बापू सोमनाथ जगताप (५७) असे मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव येथील मेन्स पार्लरचे संचालक बापू सोमनाथ जगताप हे मोटरसायकलने व त्यांचे दोन सुपुत्र मुन्ना जगताप व विकी जगताप हे दुसऱ्या दुचाकीने नगरदेवळा येथे आयोजित नातेवाइकांच्या विवाह समारंभासाठी जात होते.
कजगाव-भडगाव मार्गावरील साईबाबा मंदिराच्या पुढे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह दोन ट्रॉली रस्त्यात उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. समोरून पडणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे तसेच ट्रॅक्टरला दर्शक अथवा रेडियम नसल्याने ट्रॅक्टर व ट्रॉली दिसून आली नाही. त्यामुळे बापू जगताप यांची दुचाकी ट्रॉलीवर जाऊन आदळली.

या अपघातात जगताप हे गंभीर जखमी झाले. काही अंतरावर असलेले दोन्ही मुलं तेथे पोहचल्यानंतर त्यांना वडिलांचा अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका मागवत जगताप यांना उपचारासाठी चाळीसगाव येथे हलविले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात आई, पत्नी, दोन मुलं सुना असा परिवार आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

भुसावळ : टेंट हाउसच्या गोडाऊनला आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

Next Post

झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांसोबत बालविवाह मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन

Next Post
झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांसोबत बालविवाह मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन

झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांसोबत बालविवाह मुक्त भारत अभियानाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group